बॅनरवर मिशन 150 लिहून जागा झोळीत पडत नाहीत त्यासाठी…; मुंबई महापालिका निवडणुकीवरून पेडणेकरांचा भाजपाला खोचक टोला

पुन्हा एकदा शिवसेनेच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी भाजपावर घणाघात केला आहे. त्यांनी मुंबई महापालिकेसाठी भाजपकडून तयार करण्यात आलेल्या मिशन 150 वर टीकास्त्र डागले आहे.

बॅनरवर मिशन 150 लिहून जागा झोळीत पडत नाहीत त्यासाठी...; मुंबई महापालिका निवडणुकीवरून पेडणेकरांचा भाजपाला खोचक टोला
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Oct 03, 2022 | 2:40 PM

मुंबई : पुन्हा एकदा शिवसेनेच्या (Shiv Sena) नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी (Kishori Pednekar) भाजपावर (BJP) घणाघात केला आहे. त्यांनी मुंबई महापालिकेसाठी भाजपकडून तयार करण्यात आलेल्या मिशन 150 वर टीकास्त्र डागले आहे. केवळ बॅनरवर मिशन 150 लिहून झोळीत 150  जागा पडत नाहीत. त्यासाठी लोकांशी नाळ जोडलेली हवी. मात्र भाजपकडून शिवसेनेशी मतदारांसोबत जोडली गेलीली नाळ तोडण्याचा प्रयत्न होत आहे. अशी टीका किशोरी पेडणेकर यांनी केली आहे.

नेमकं काय म्हणाल्या पेडणेकर?

मुंबई महापालिकेसह राज्यातील काही महत्त्वाच्या शहरातील महापालिकेच्या निवडणुका पुढील काही दिवसांमध्ये होणार आहेत. त्यासाठी भाजपकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. यावरून मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. केवळ बॅनरवर मिशन 150 लिहून झोळीत 150  जागा पडत नाहीत. त्यासाठी मतदारांशी नाळ जुळलेली हवी, मात्र भाजपकडून खोटे बोलून, आभास निर्माण करून शिवसेनेची मतदारांबरोबर जुळलेली नाळ तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशी टीका किशोरी पेडणेकर यांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा

काय आहे भाजपाचे ‘मिशन 150’?

मुंबईसह राज्याच्या काही प्रमुख शहरातील महापालिकेच्या निवडणुका येत्या काळात होणार आहेत. यासाठी भाजपाकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. भाजपाकडून बूथ पातळीवरचे नियोजन सुरू आहे. तसेच शिंदे गट आणि भाजपाच्या युतीबाबत देखील चर्चा सुरू आहे. मुंबई महापालिकेत पूर्ण बहुमताने सत्ता आणण्याचा निर्धान पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे. त्यासाठी भाजपकडून मिशन दिडशेचा प्लॅन आखण्यात आला आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये मुंबई महापालिकेत दिडशे जागा जिंकून भाजपाचा झेंडा रवायचाच असा निर्धार या मिशन अतंर्गत करण्यात आला आहे.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.