लिंगायत समाजाचे धर्मगुरु ते खासदार, कोण आहेत स्वामी जयसिद्धेश्वर?

MP Jaisidhesvar Swami | मुळात जयसिद्धेश्वर यांचा 2014 पर्यंत राजकारणाशी काडीचाही संबंध नव्हता. सोलापूर जिल्ह्यात लिंगायत समाजाची संख्या मोठी आहे. स्वामी जयसिद्धेश्वर हे लिंगायत समाजाचे धर्मगुरू असल्याने येथील मतदारांमध्ये त्यांच्याविषयी आदराची भावना आहे.

लिंगायत समाजाचे धर्मगुरु ते खासदार, कोण आहेत स्वामी जयसिद्धेश्वर?
स्वामी जयसिद्धेश्वर, भाजप खासदार
Follow us
| Updated on: Aug 29, 2021 | 8:10 AM

मुंबई: भाजपने 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सोलापूर लोकसभा मतदारसंघात एक अनपेक्षित राजकीय खेळी खेळली होती. तत्कालीन खासदार शरद बनसोडे यांचा पत्ता कापून भाजपने स्वामी जयसिद्धेश्वर यांना लोकसभेची उमेदवारी दिली. विशेष म्हणजे या निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांना राजकीय धुरिणांना धूळ चारत स्वामी जयसिद्धेश्वर यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघात विजय मिळवला होता.

कोण आहेत स्वामी जयसिद्धेश्वर?

स्वामी जयसिद्धेश्वर यांचा जन्म 1 जून 1955 रोजी झाला. 1978 मध्ये त्यांनी बनारस हिंदू विश्वविद्यालयातून बी.ए. पूर्ण केले. तर 1981 मध्ये याच विद्यालयातून त्यांचे एम.ए. पूर्ण झाले. पुढे त्यांनी धर्मशास्त्रात पी.एचडी करेपर्यंत 1988 साल उजाडले. त्यांना कन्नड, मराठी, तेलुगू, हिंदी यासह अनेक भाषा ज्ञात आहेत. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी हे अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव संस्थानचे संस्थापक आहेत. राजकारणात येण्यापूर्वी स्वामी जयसिद्धेश्वर यांनी आयुष्यभर संत साहित्याच्या प्रसाराचे काम केले.

स्वामी जयसिद्धेश्वर यांचा राजकीय प्रवास

मुळात जयसिद्धेश्वर यांचा 2014 पर्यंत राजकारणाशी काडीचाही संबंध नव्हता. सोलापूर जिल्ह्यात लिंगायत समाजाची संख्या मोठी आहे. स्वामी जयसिद्धेश्वर हे लिंगायत समाजाचे धर्मगुरू असल्याने येथील मतदारांमध्ये त्यांच्याविषयी आदराची भावना आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा 2009 पासून अनुसूचित जातींसाठी राखीव आहे. 2009 मध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे या मतदारसंघातून निवडून आले होते. 2014 मध्ये भाजप सोलापूर मतदारसंघात नव्या चेहऱ्याच्या शोधात होता. त्यावेळीही स्वामी जयसिद्धेश्वर यांनी लोकसभेची उमेदवारी मिळवण्याचे प्रयत्न केले होते. मात्र, तेव्हा स्वामी जयसिद्धेश्वर यांचे जात प्रमाणपत्र वैध नसल्याने त्यांचे नाव मागे पडले. त्यांच्याऐवजी शरद बनसोड यांना उमेदवारी मिळाली आणि ते जिंकून आले.

मात्र, 2019 मध्ये स्वामी जयसिद्धेश्वर यांनी सुरुवातीपासूनच लोकसभेच्या उमेदवारीसाठी जोर लावला. सोलापूरचे तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी स्वामी जयसिद्धेश्वर यांना उमेदवारी मिळवण्यासाठी विशेष जोर लावला. भाजपनेही सोलापूरमधील लिंगायत समाजाचे प्राबल्य ओळखून त्यांनी उमेदवारी दिली. या निवडणुकीत स्वामी जयसिद्धेश्वर यांना 5 लाख 15 हजार 798 तर शिंदे यांना 3 लाख 60 हजार 738 मते मिळाली. तिसऱ्या स्थानावरील आंबेडकर 1 लाख 58 हजार 887 मतांपर्यंत मजल मारू शकले.

जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे खासदारकी संकटात

स्वामी जयसिद्धेश्वर यांनी खासदारकी जात प्रमाणपत्रामुळे सुरुवातीपासून वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. जय सिद्धेश्वरशिवाचार्य यांनी सादर केलेलं बेड जंगम जातीचं प्रमाणपत्र बोगस असल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर जात पडताळणी समितीनेही स्वामी जयसिद्धेश्वर स्वामींचा जातीचा दाखला बनावट असल्याचं सांगत तो रद्द केला होता. त्यामुळे स्वामी जयसिद्धेश्वर यांची खासदारकी धोक्यात आली होती. सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयाने याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचेही आदेश दिले होते.

'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.