सोनिया गांधींकडे रिलायन्सचे शेअर्स, इटलीत साडे सात कोटींचं घर
रायबरेली : United Progressive Alliance (UPA) च्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी गुरुवारी रायबरेली (Rae Bareli Lok Sabha Constituency) या त्यांच्या पारंपरिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज (nomination from) दाखल केला. अर्ज भरताना त्यांनी दिलेल्या शपथपत्रानुसार, त्यांच्याकडे केवळ 60 हजार रुपये कॅश आहे आणि 16.59 लाख रुपये फिक्स डिपॉझिटमध्ये आहेत. सोनिया गांधींनी रिलायन्स हायब्रिड बाँडसह विविध शेअर्समधअये […]
रायबरेली : United Progressive Alliance (UPA) च्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी गुरुवारी रायबरेली (Rae Bareli Lok Sabha Constituency) या त्यांच्या पारंपरिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज (nomination from) दाखल केला. अर्ज भरताना त्यांनी दिलेल्या शपथपत्रानुसार, त्यांच्याकडे केवळ 60 हजार रुपये कॅश आहे आणि 16.59 लाख रुपये फिक्स डिपॉझिटमध्ये आहेत.
सोनिया गांधींनी रिलायन्स हायब्रिड बाँडसह विविध शेअर्समधअये 2,44,96,405 ची गुंतवणूक केली आहे. त्यांच्याकडे 28,533 रुपये मूल्याचे करमुक्त बाँड आहेत. सोनिया गांधींनी याशिवाय पोस्टल सेविंग्स, विमा पॉलिसी, राष्ट्रीय बचत योजना (एनएसएस) मध्येही 72,25,414 रुपयांची गुंतवणूक केली आहे.
सोनिया गांधींकडे दिल्लीजवळील डेरामंडी गावात शेतजमीन आहे, ज्याची किंमत 7 कोटी 29 लाख 61 हजार 793 रुपये आहे. तर इटलीमध्ये 7 कोटी 52 लाख 81 हजार 903 रुपये किंमतीचं वारसाहक्काने मिळालेलं घर आहे. शपथपत्रातील माहितीनुसार, मुलगा राहुल गांधींकडून सोनिया गांधींनी पाच लाख रुपयांचं कर्जही घेतलंय. सोनिया गांधींकडे 59 लाख 97 हजार 211 रुपये किंमतीचे दागिनी आहेत, ज्यात 88 किलोग्रॅम चांदीचाही समावेश आहे.