Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bhaskar Jadhav | टांझानियातील दारे सलामचा काउन्सिलर भास्कर जाधवांना का भेटला? स्टोरी फारच इंटरेस्टिंगए!

Chiplun : शुक्रवारी दुपारच्या सुमारासा गुहागरचे शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी ही पोस्ट केली आहे. आपल्या मतदारसंघातील वेगवेगळ्या उपक्रमात भाग घेणारे आमदार म्हणूनही भास्कर जाधव ओळखले जातात.

Bhaskar Jadhav | टांझानियातील दारे सलामचा काउन्सिलर भास्कर जाधवांना का भेटला? स्टोरी फारच इंटरेस्टिंगए!
भास्कर जाधव आणि टांझानियाचा झेंडा
Follow us
| Updated on: Jan 14, 2022 | 10:07 PM

मुंबई : गुहागरचे शिवसेना आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांची टांझानिया देशातील दारे सलाम शहाराचा काऊन्सिलर असलेल्या एका तरुणानं भेट घेतली आहे. ही भेट नेमकी कशासाठी होती, याची गोष्टही इंटरेस्टिंग आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आफ्रिका खंडातील टांझानिया देशात असलेल्या दारे सलाम या शहराचा असलेला कॉन्सिलर हा तर चक्क कोकणातला निघालाय. खुद्द भास्कर जाधव यांनीच ही माहिती दिली आहे. आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन भास्कर जाधव यांनी या भेटीबाबत सविस्तर पोस्ट लिहिली असून अनेकांना चिपळूणमधील एक तरुणा टांझानिया देशातील एका शहाराचा काऊन्सिलर आहे अशी माहिती नव्यानं झाली आहे. दारे सलामच्या या काऊन्सिलरचं नाव आहे शारीक चौगुले. तो टांझानियातील एका शहाराचा काऊन्सिरल झाला तरी कसा, हे देखील भास्कर जाधव यांनी सागितंलय.

काय आहे इंटरेस्टिंग गोष्ट?

भास्कर जाधव यांनी फेसबुक पोस्ट करत म्हटलंय की,…

माझे खूप जुने आणि अत्यंत जवळचे चिपळूण येथील सहकारी कै. लियाकतभाई चौगुले यांचा मुलगा शारीक हा काही वर्षांपूर्वी टांझानिया या आफ्रिका खंडातील देशामध्ये व्यवसायानिमित्त गेला आणि तिथेच स्थिरावला. त्या देशाचे त्याने नागरिकत्व घेतले आणि तेथील दारे सलाम या शहराचा तो कौन्सिलर झाला. असे असले तरी तो त्याच्या मातृभूमीला आणि त्याला या पदापर्यंत पोहोचण्यासाठी योगदान देणाऱ्यांना तो विसरला नाही. भारतात आल्यानंतर आज (शुक्रवारी) तो मला भेटण्यासाठी आला होता. टांझानियाची ओळख असलेली मफलर त्याने माझ्या खांद्यावर घातली.. विदेशात जाऊन कौन्सिलर होण्यापर्यंतचा त्याचा प्रवास मी जाणून घेतला व त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यानिमित्ताने लियाकतभाईंच्या आठवणींनादेखील उजाळा मिळाला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. विक्रांत जाधव आणि सहकारी श्री. फैसल कासकर उपस्थित होते.

शुक्रवारी दुपारच्या सुमारासा गुहागरचे शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी ही पोस्ट केली आहे. आपल्या मतदारसंघातील वेगवेगळ्या उपक्रमात भाग घेणारे आमदार म्हणूनही भास्कर जाधव ओळखले जातात. त्यांनी मूळच्या चिपळुणातील असलेल्या पण आता टांझानियात स्थायिक झालेल्या या तरुणाच्या भेटीचा फोटोही फेसबुकवरु शेअर केला आहे. दरम्यान, काही दोन एक वर्षांपूर्वी आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर यांचीही अशीच एक इंटरेस्टिंग गोष्ट समोर आली आहे. आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर हे वराड या आपल्या मूळ गावी आले होते. त्यांच्या येण्यानं कोकणतील लोकांच्या ऊर अभिमानानं भरुन गेला होता. आर्यलंडनंतर आता टांझानियासोबतही कोकणाचं कनेक्शन असल्यानं गावभर चर्चा जाली नाही, तरच नवल!

पाहा फेसबुक पोस्ट :

संबंधित बातम्या :

Ratnagiri | भास्कर जाधव यांच्या हाती बसची स्टेअरिंग, शहरात मारला फेरफटका

Bhaskar jadhav vs rane : कोकणात काही भागात नाचे आहेत नाचे, जाधवांच्या नक्कलेवर राणेंची फिरकी

तेव्हा कुठे गेला होता तुझा राधासुता धर्म?, तर दोन हात करण्याची तयारी ठेवावी लागेल, भास्कर जाधव कडाडले

'...तेव्हा कोकणाला काय दिलं?', एकच सवाल अन् राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
'...तेव्हा कोकणाला काय दिलं?', एकच सवाल अन् राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल.
मुंबईतील वाहतुकीचे पर्याय अधिक सक्षम होणार! फडणवीसांची मुंबईसाठी घोषणा
मुंबईतील वाहतुकीचे पर्याय अधिक सक्षम होणार! फडणवीसांची मुंबईसाठी घोषणा.
'माझ्या वक्तव्यावर मी ठाम', मंगेशकर कुटुंबीयांवर वडेट्टीवारांचा घणाघात
'माझ्या वक्तव्यावर मी ठाम', मंगेशकर कुटुंबीयांवर वडेट्टीवारांचा घणाघात.
मुंबईकरांनो 'या' मार्गावरून प्रवास करताय? मेगाब्लॉकमुळे 334 लोकल रद्द
मुंबईकरांनो 'या' मार्गावरून प्रवास करताय? मेगाब्लॉकमुळे 334 लोकल रद्द.
एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात परिवहन मंत्र्यांकडून मोठी अपडेट
एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात परिवहन मंत्र्यांकडून मोठी अपडेट.
रुग्णला अमृत पाजलं का? शिंदेंच्या आमदारानं डॉक्टरला झापलं,ऑडिओ व्हायरल
रुग्णला अमृत पाजलं का? शिंदेंच्या आमदारानं डॉक्टरला झापलं,ऑडिओ व्हायरल.
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण; तिसरा अहवाल सरकारला सादर, काय म्हटलंय?
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण; तिसरा अहवाल सरकारला सादर, काय म्हटलंय?.
इम्तियाज जलील - उद्धव ठाकरेंची भेट; अंबादास दानवेंनी सांगितलं कारण
इम्तियाज जलील - उद्धव ठाकरेंची भेट; अंबादास दानवेंनी सांगितलं कारण.
सर्वांना हिशेब इथेच होणार, 'त्या' आठवणीने नितेश राणे भावुक
सर्वांना हिशेब इथेच होणार, 'त्या' आठवणीने नितेश राणे भावुक.
एसटी कर्मचाऱ्यांची थट्टा सुरूच, इतिहासात पहिल्यांदाच अर्धाच पगार अन्
एसटी कर्मचाऱ्यांची थट्टा सुरूच, इतिहासात पहिल्यांदाच अर्धाच पगार अन्.