Kohlhapur: कोल्हापूरच्या परिवहन कार्यालयातील छ. शिवाजी महाराज, आंबेडकराचे फोटो हटवले, शिवसैनिकांची निदर्शनं
कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो काढल्याने शिवसैनिक संतप्त झाले आहेत. शिवसैनिक प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या दारात निदर्शनं करत आहेत.

कोल्हापूर : कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj), डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो काढल्याने शिवसैनिक संतप्त झाले आहेत. शिवसैनिक प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या दारात निदर्शनं करत आहेत. नूतनीकरण करतेवेळी दोन्ही महापुरुषांचे फोटो प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून काढण्यात आले होते. नूतनीकरण पूर्ण होऊन सहा महिने झाले तरी दोन्ही महापुरुषांचे फोटो लावले नसल्याने शिवसेनेची निदर्शने केली. दोन्ही महापुरुषांचे फोटो नाहीत मात्र राष्ट्रपती आणि पंतप्रधानांचे लावल्याने शिवसैनिकांनी संताप व्यक्त केलाय. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांचे फोटो भाजप कार्यकर्त्यांनी दिल्याचा शिवसैनिकांचा दावा आहे. शिवसैनिक छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar) यांचे फोटो प्रादेशिक परिवहन कार्यालयात लावणार आहेत.
नेमकं काय घडलंय?
कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो काढण्यात आले आहेत. नूतनीकरण करताना दोन्ही महापुरुषांचे फोटो प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून काढण्यात आले होते. नूतनीकरण पूर्ण होऊन सहा महिने झाले तरी दोन्ही महापुरुषांचे फोटो लावलेले नाहीत.
शिवसैनिक आक्रमक
कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो काढल्याने शिवसैनिक संतप्त झाले आहेत. शिवसैनिक प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या दारात निदर्शनं करत आहेत. महापुरुषांचा फोटो हटवून आता सहा महिने झाले आहेत. तरी अजूनही लावण्यात आलेला नाही. तो लवकरात लवकर लावण्यात यावा, अशी आमची विनंत आहे, असं आंदोलनकर्यांनी केली आहे. या आंदोलनावेळी शिवसैनिकांनी या दोन्ही महापुरूषांचे फोटो घेऊन आले आहेत आणि परिवहन खात्याने जरी हे फोटो हटवले तरी आम्ही फोटो लावणारच, या भूमिकेवर ठाम आहेत. शिवसैनिक छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो प्रादेशिक परिवहन कार्यालयात लावणार आहेत.



छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आमचे श्रद्धास्थान आहेत. त्यांचा अपमान आम्ही खपवून घेणार नाही. या दोन महापुरुषांचा फोटो लावला जात नाहीय. मात्र राष्ट्रपती आणि पंतप्रधानांचे फोटो लावले जातात. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांचे फोटो हे भाजप कार्यकर्त्यांनीच या कार्यालयाला दिले आहेत, असा दावाही शिवसैनिकांनी केला आहे. या आंदोलनावेळी शिवसैनिकांनी या दोन्ही महापुरूषांचे फोटो घेऊन आले आहेत आणि परिवहन खात्याने जरी हे फोटो हटवले तरी आम्ही फोटो लावणारच, या भूमिकेवर ठाम आहेत.