13 वर्षीय मुलीला फूस लावून पळवलं? लव्ह जिहाद? नितेश राणे आज ‘या’ शहरात!

हिंदुत्ववादी संघटना आक्रमक होण्याची शक्यता असल्याने पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

13 वर्षीय मुलीला फूस लावून पळवलं? लव्ह जिहाद? नितेश राणे आज 'या' शहरात!
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 02, 2022 | 10:38 AM

भूषण पाटील, कोल्हापूरः कोल्हापुरात 13 वर्षीय मुलगी (Missing) गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असल्याने वातावरण चांगलंच तापलंय. या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवण्यात आल्याचा आरोप केला जातोय. यामागे लव्ह जिहाद (Love Jihad) असल्याचं म्हटलं जातंय. या पार्श्वभूमीवर आज भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) कोल्हापुरात येत आहेत. राणे यांची आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे.

लव्ह जिहादवरून नेहमीच आक्रमक भूमिका घेणारे नितेश राणे कोल्हापुरात येणार असल्याने शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे.

शहरातील जुना राजवाडा पोलीस ठाण्यासंबंधी असलेल्या मुलाने 13 वर्षीय मुलीला पळवून नेल्याचा आरोप केला जातोय. या प्रकरणी मुलाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय.

अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याच्या घटनेला 18 दिवस उलटले आहेत. मात्र तिचा अद्याप शोध लागलेला नाही. याबाबत वेगाने तपास करण्याची विनंती कुटुंबियांनी केली आहे.

मुलीचे नातेवाई आक्रमक झाल्यानंतर पोलिसांना सदर प्रकरणात दोन दिवसात कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय. आम्हाला न्याय द्या, अन्यथा राज्यभरात सर्वत्र आंदोलन करू, असा इशाराही मुलीच्या नातेवाईकांनी दिला आहे.

हे लव्ह जिहादचं प्रकरण असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. या घटनेच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटना आज कोल्हापुरात जन आक्रोश आंदोलन करत आहेत. आंदोलनात आमदार नितेश राणे सहभागी होणार आहेत.

कोल्हापूरच्या भवानी मंडपातून जुना राजवाडा पोलीस ठाण्यावर नितेश राणे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चानंतर नितेश राणे पत्रकार परिषददेखील घेणार आहेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.