कोल्हापूर : आमदार चंद्रकांत जाधव (Chandrakant Jadhav) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक पार पडतेय. काँग्रेसकडून चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव (Jayashree Jadhav) यांना उमेदवारी देण्यात आलीय. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांच्यासह ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफही प्रयत्नशील होते. मात्र, भाजपनं आपला उमेदवार देत ही निवडणूक प्रतिष्ठेची केलीय. तर आम आदमी पक्षानेही आपला उमेदवार उतरवलाय. कोल्हापूर उत्तरची जागा राखण्यासाठी काँग्रेस तर कोल्हापुरातील एक तरी जागा मिळवण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सतेज पाटलांवर जोरदार हल्ला चढवत थेट जयश्री जाधव यांना भाजपकडून लढण्यास सांगा, असं म्हटलंय!
अजूनही 24 तास बाकी आहेत. जयश्रीताईंना भाजपकडून लढण्यास सांगा. आता माझ्या सहीने ए बी फॉर्म देतो. नानाला अर्ज मागे घ्यायला सांगतो, असं जाहीर आवाहनच चंद्रकात पाटील यांनी केलंय. महत्वाची बाब म्हणजे चंद्रकांत पाटील यांनी निवडणूक लागण्यापूर्वीही जयश्री जाधव यांना भाजपकडून तिकीटाची ऑफर दिली होती. मात्र, जयश्री जाधव यांनी विनम्रपणे ती नाकारात काँग्रेसकडूनच निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.
ही तर फक्त झलक आहे,
पाडव्यानंतर पिक्चर बघा !@BJP4India @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @NanaKadam1771 @dbmahadik #कोल्हापूर #पोटनिवडणूक#SatyajitKadam #Kolhapur #BJP #KolhapurNorth #AssemblyByeElection #KolhapurElection pic.twitter.com/ILQbPAWIvn— Chandrakant Patil (@ChDadaPatil) March 23, 2022
चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सजेत पाटील आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली. ‘बिंदू चौकात स्टेज बनवतो, सतेज पाटील यांनी समोर यावं. 50 वर्षात काँग्रेसनं काय केलं ते त्यांनी मांडावं. आम्ही 7 वर्षात काय केलं ते सांगतो. काश्मीर भारतात राहण्याबाबत जो अडसर होता तो नाहीसा झाला. 370 कलम रद्द करणं आवश्यक होतं. ते नरेंद्र मोदींनी केलं. महाराष्ट्रातील 5 वर्षाची यादी आम्ही देतो, तुम्ही 50 वर्षाची यादी द्या. 1 लाख 76 हजार कोटीचं मेट्रोचं काम आम्ही राज्यात आणलं. कोल्हापूर महापालिका एकदा ताब्यात द्या. पुण्यासारखी महापालिका करतो, असा दावाच पाटील यांनी केलाय.
जीत की और बढते ‘कदम’!
कोल्हापूर उत्तर या विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी भाजपा आणि मित्रपक्षांचे अधिकृत उमेदवार सत्यजित नाना कदम यांनी अर्ज दाखल केला.याप्रसंगी ही गर्दी पाहूनच विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असेल.सत्यजित कदम यांच्या विजयावर आता फक्त शिक्कामोर्तबच राहिलंय! pic.twitter.com/P6MxwOoUKz— Chandrakant Patil (@ChDadaPatil) March 23, 2022
सतेज पाटील यांनी कोल्हापूर टोलची पावती फाडली. पण आम्ही कंत्राटदाराला पैसे देऊन कामयचा टोल घालवला. कोल्हापूर विमानतळाची अवस्था काय होती? स्वत:चं विमानही घेऊन येता येत नव्हतं. आच विमानतळाची जी स्थिती आहे ते तुमच्यामुळे झालं का? देवेंद्र फडणवीस यांनी लॉबीत उभा राहून विमानतळाच्या विस्तारासाठी पैसे दिले. अंबाबाई, जोतिबा, नृसिंहवाडी मंदिराच्या विकासासाठी भरभरुन पैसे दिले, असंही पाटील यांनी यावेळी आवर्जुन सांगितलं. स्वत:ची विधान परिषद बिनविरोध काढली म्हणजे उत्तरची निवडणूक बिनविरोध काढाल असं वाटलं का? असा सवालही पाटील यांनी केलाय.