भाजपच्या काळात मंदिराच्या अध्यक्षांनी देवीच्या पैशावर डल्ला मारला, रोहित पवारांचा भाजपवर गंभीर आरोप

महाविकास आघाडी विरुद्ध भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. काँग्रेस उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडी सरकारकडून आज दसरा चौकात युवा मेळावा घेण्यात आला.

भाजपच्या काळात मंदिराच्या अध्यक्षांनी देवीच्या पैशावर डल्ला मारला, रोहित पवारांचा भाजपवर गंभीर आरोप
रोहित पवार, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेसImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 05, 2022 | 12:12 AM

कोल्हापूर : आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीची (Kolhapur By Election) रणधुमाळी जोरात सुरु आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) विरुद्ध भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. काँग्रेस उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडी सरकारकडून आज दसरा चौकात युवा मेळावा घेण्यात आला. यावेळी आमदार रोहित पवार (Rohit Pawar), आमदार धीरज देशमुख, आमदार प्रणिती शिंदे, आमदार ऋतराज पाटील, युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई उपस्थित होते. यावेळी रोहित पवार, प्रणिती शिंदे, ऋतुराज पाटील यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि अन्य भाजप नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला.

‘महिलांना कमी लेखता ही तुमची विचारसरणी’

भाजपच्या सत्तेच्या काळात मंदिरातील अध्यक्षांनी देवीच्या पैशावर डल्ला मारला, साडीमध्ये पैसे खाल्ले. जे लोक देवीला सोडत नाहीत त्यांच्यासोबत आम्ही राहणार नाही, ही सर्वसामान्यांची भूमिका आहे. यापुढील काळात युवकांसाठी काम करावंच लागेल. इथल्या मुलांमध्ये क्षमता आहे, फक्त त्यांना संधी दिली पाहिजे. कोल्हापूरमध्ये आयटी पार्क व्हावं यासाठी सतेज पाटील, हसन मुश्रीफ यांचे प्रयत्न सुरु आहेत. भविष्याकडे पाहताना इतिहासात सुद्धा डोकावून पाहिलं पाहिजे. निवडणुकीत विकासाचे मुद्दे असले पाहिजेत. पण तुम्ही काय करताय? महिलांना कमी लेखता ही तुमची विचारसरणी. शाहुंच्या नगरीत हे विचार पटणारे आहेत का? असा सवाल रोहित पवार यांनी केला.

‘चंद्रकांतदादा… कोल्हापूरकर विसरणार नाहीत’

रोहित पवार यांनी आपल्या भाषणात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावरही जोरदार हल्ला चढवला. 2019 ला अपयश आले तेव्हा चंद्रकांत पाटील म्हणाले होते की कोल्हापूरकर कधी सुधारणार नाहीत. हे कोल्हापूरकर विसरणार नाहीत. मला वाटलं या निवडणुकीत चंद्रकांत पाटील उमेदवार असतील. दादा तुम्हीच तसं म्हणाला होता, संधी होती मग का उभे राहिले नाहीत? असा खोचक सवालही रोहित पवार यांनी केलाय. तसंच, लोकशाही मार्गानं कोल्हापूरकर तुम्हाला हिसका दाखवतील, इशा इशाराही रोहित पवारांनी दिलाय.

‘ईडी आता सामान्यांच्या मागे लागणार म्हणे…’

उत्तर प्रदेशचा निकाल तुमच्या बाजूनं लागला म्हणून तुम्ही महाराष्ट्राला वेगळ्या चष्म्यातून पाहताय. फक्त पक्षासाठी ही निवडणूक करत असाल तर निकाल काँग्रेसच्या बाजूने लागणार हे लक्षात ठेवा, असा इशाराही रोहित पवार यांनी भाजपला दिला. त्याचबरोबर आता ईडी सर्वसामान्य लोकांच्या मागे लागणार असं मला कळाल्याचं सांगत रोहित यांनी भाजपला चिमटाही काढला.

इतर बातम्या :

मुंबई महापालिकेवर सर्वच राजकीय पक्षांचा डोळा! असं काय आहे मुंबई महापालिकेत? जाणून घ्या सविस्तर

Raj Thackeray : मशिदीवरील भोंग्याला राज ठाकरेंचा विरोध, मनसेत नाराजी; पुण्यात पहिला राजीनामा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.