VIDEO | शौमिका महाडिकांची गोकुळ दूध संघाच्या चिलिंग सेंटरला अचानक भेट, अधिकाऱ्यांना धरलं धारेवर
सरप्राईज व्हिजिटच्या वेळी कामांमधील त्रुटींवरून शौमिकांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांना धारेवर धरलं. शौमिका महाडिक यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर अधिकाऱ्यांची बोलती बंद झाल्याचं पाहायला मिळालं.
कोल्हापूर : कोल्हापुरात गोकुळ दूध संघाच्या उदगाव चिलिंग सेंटरला संचालिका शौमिका महाडिक (Shoumika Mahadik) यांनी अचानक भेट दिली. कामांमधील त्रुटींवरून अधिकारी-कर्मचाऱ्यांना शौमिका महाडिक यांनी धारेवर धरल्याची माहिती आहे. याचा व्हिडीओ समोर आला असून शौमिका महाडिक यांचा आक्रमक स्वभाव पाहायला मिळत आहे.
नेमकं काय घडलं?
कोल्हापूरच्या उदगाव चिलिंग सेंटरमधील कामाचा शौमिका महाडिक यांनी आढावा घेतला. गोकुळमधील विरोधी महाडिक गटाच्या आक्रमक संचालिका अशी शौमिका महाडिक यांची ओळख आहे. सरप्राईज व्हिजिटच्या वेळी कामांमधील त्रुटींवरून शौमिकांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांना धारेवर धरलं. शौमिका महाडिक यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर अधिकाऱ्यांची बोलती बंद झाल्याचं पाहायला मिळालं.
पाहा व्हिडीओ :
कोल्हापुरात गोकुळ दूध संघाच्या उदगाव चिलिंग सेंटरला संचालिका शौमिका महाडिक यांनी सरप्राईज व्हिजिट, कामांमधील त्रुटींवरून अधिकारी-कर्मचाऱ्यांना धारेवर धरलं pic.twitter.com/qo3IU8ts2q
— Anish Bendre (@BendreAnish) August 29, 2021
कोण आहेत शौमिका महाडिक?
शौमिका महाडिक या कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा असून सध्या झेडपी सदस्य आहेत. त्या भाजपच्या कोल्हापूर महिला जिल्हाध्यक्षपदी आहेत. शौमिका महाडिक यांचे पती अमल महाडिक हे भाजपचे माजी आमदार असून दीर माजी खासदार धनंजय महाडिक हे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. शौमिका महाडिक या माजी आमदार महादेव महाडिक यांच्या स्नुषा.
मे महिन्यात झालेल्या गोकुळ दूधसंघाच्या निवडणुकीत महाडिक गटाकडून शौमिका महाडिक 43 मतांनी विजयी झाल्या. महिला प्रवर्गात शौमिका अमल महाडिक आणि विरोधी गटाच्या अंजना केदारी रेडेकर यांच्यात चुरस होती. शौमिका यांना पहिल्यांदाच उमेदवारी देण्यात आली होती आणि पहिल्याच फटक्यात त्यांनी बाजी मारली.
संबंधित बातम्या :
“मीच जाणती, बाकी सारे इमॅच्युअर, असा दावा नाही” भाजप पदाधिकाऱ्याचा पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा