गोकुळ निवडणुकीला स्थगिती देण्यास सत्तारुढ गटाचा अट्टाहास का? सतेज पाटलांचा सवाल

| Updated on: Apr 19, 2021 | 4:54 PM

गोकुळ दूधसंघातील सत्तारुढ गटाने सर्वोच्च न्यायालयात निवडणूक स्थगितीबाबत याचिका दाखल केली आहे. (Kolhapur Gokul Election Satej Patil )

गोकुळ निवडणुकीला स्थगिती देण्यास सत्तारुढ गटाचा अट्टाहास का? सतेज पाटलांचा सवाल
सतेज पाटील
Follow us on

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोकुळ दूधसंघाची निवडणूक (Kolhapur Gokul Doodh Sangh Election) कशी घेतली जाईल, याची माहिती राज्य सरकारने हायकोर्टाला दिली आहे. मात्र सत्तारुढ गटाने आत्मविश्वास गमावल्याने त्यांची कोर्टकचेरी सुरु आहे, अशी टीका काँग्रेसचे दिग्गज नेते आणि कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी केली आहे. निवडणुकीला स्थगिती देण्यास सत्तारुढ गटाचा अट्टाहास का? असा सवालही सतेज पाटलांनी विचारला. (Kolhapur Gokul Doodh Sangh Election Congress Satej Patil reaction after Supreme Court hearing)

गोकुळ दूधसंघातील सत्तारुढ गटाने सर्वोच्च न्यायालयात निवडणूक स्थगितीबाबत याचिका दाखल केली आहे. यावर सुनावणी घेताना आज सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला 26 एप्रिलपर्यंत या संदर्भात म्हणणं मांडण्याचे आदेश दिले आहेत. सुनावणीनंतर पालकमंत्री सतेज पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.

“स्थगिती देण्यास अट्टहास का?”

या निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात केवळ 3700 मतदार आहेत. तालुक्याच्या ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. 35 बूथ या प्रक्रियेसाठी असणार असून प्रत्येक बूथमध्ये 100 मतदान असणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल, कर्नाटक आणि पंढरपूर पोटनिवडणूक पार पडली. मग या निवडणुकीला स्थगिती देण्यास सत्तारुढ गटाचा अट्टहास का? असा सवाल सतेज पाटील यांनी केला. सर्वोच्च न्यायालयात सरकारच्या वतीने योग्य ती बाजू मांडणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

कधी होणार निवडणूक?

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. कोरोना परिस्थितीमुळे गेल्या वर्षभरापासून लांबलेली ही निवडणूक 2 मे रोजी होणार आहे. मतदानाला काही दिवस बाकी असले, तरी या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकारण गेल्या दोन महिन्यांआधीच तापायला सुरुवात झाली होती.

गोकुळ निवडणुकीचा उत्साह शिगेला

गोकुळ बचाव समितीच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षांपासून सत्ताधारी महाडिक गटाविरुद्ध भूमिका घेणाऱ्या पालकमंत्री सतेज पाटील या निवडणुकीसाठी चांगलीच तयारी केलीय. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संजय मंडलिक यांच्यासह जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांना एकत्र आणत सतेज पाटील यांनी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीची घोषणा केली. मात्र अवघ्या चार दिवसात त्यात फूट पडली. आमदार पी एन पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांनी आघाडीची साथ सोडण्याचा निर्णय जाहीर केला. गोकुळ निवडणुकीत सत्ताधाऱ्यांसोबत राहणार असल्याचं सरुडकरांनी स्पष्ट केलं.

गोकुळ दूध संघ का आहे महत्त्वाचा?

दूध संघाचा जिल्ह्यात आणि राज्यात लौकिक

रोज 30 ते 35 लाख लिटर दुधाचं संकलन

मुंबई पुण्यासह अनेक मोठ्या शहरात गोकुळ दुधाला मागणी

गोकुळची रोजची कोट्यवधीची उलाढाल

गोकुळ दूध संघावर सत्ता म्हणजे जिल्ह्यात वर्चस्व असा अलिखित प्रघात

कसा असेल निवडणूक कार्यक्रम?

6 ते 20 एप्रिल – उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा कालावधी
22 एप्रिल – उमेदवारांना चिन्हांचे वाटप
2 मे – मतदान
4 मे – मतमोजणी

संबंधित बातम्या :

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचं बिगुल अखेर वाजलं, 2 मे रोजी मतदान

सत्ताधारी गटातील संचालक विरोधकांच्या गळाला, गोकुळ दूध संघ निवडणुकीत चुरस

(Kolhapur Gokul Doodh Sangh Election Congress Satej Patil reaction after Supreme Court hearing)