Gram Panchayat Election 2022: पत्नी लोकनियुक्त सरपंच, पती सदस्य, कांबळे दाम्पत्याची कोल्हापूरात चर्चा
सरपंच पदासाठी अनुसूचित जाती (महिला) आरक्षण होते. खेडे गावात तीन उमेदवारांनी सरपंच पदासाठी अर्ज दाखल केला होता
मुंबई : काल राज्यातील ग्रामपंचायत (Gram Panchayat) निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. महाविकास आघाडी (MVA), भाजप (BJP) या दोन पक्षांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळाली. कोल्हापूरच्या (Kolhapur) राजकारणात एक वेगळीचं झलक पाहायला मिळाली. पत्नी लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आली, तर पती सदस्य म्हणून एकाचवेळी निवडून आला. त्यामुळे कोल्हापुरात कांबळे दांम्पत्याची जोरदार चर्चा आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी (Shahuwadi) तालुक्यातील काल निकाल लागल्यानंतर कार्यकर्त्यांनी गावात गुलालाची उधळण करीत जल्लोष केला.
कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी तालुक्यातील 43 ग्रामपंचायतींचा काल निकाल जाहीर झाला. खेडे गावातील दाम्पत्य अनिता कांबळे आणि बाबाराम कांबळे राजकीय रिंगणात मोठ्या फरकाने विजय मिळविला आहे. त्यामुळे संपुर्ण भागात त्यांची चर्चा आहे.
सरपंच पदासाठी अनुसूचित जाती (महिला) आरक्षण होते. खेडे गावात तीन उमेदवारांनी सरपंच पदासाठी अर्ज दाखल केला होता. परंतु अनिता बाबाराम कांबळे यांचा विजय झाला आहे.
बाबाराम कांबळे हे छोटासा व्यवसाय संभाळत शेती करतात. तर त्यांच्या पत्नी अनिता कांबळे या घरच्या शेतीमध्ये बाबाराम कांबळे यांना मदत करतात.
आम्हाला मतदारांनी निवडून दिल्याबद्दल आम्ही गावकऱ्यांचे आभार मानतो. त्याचबरोबर ग्रामपंचातीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही प्रयत्न करु अशी प्रतिक्रिया बाबाराम कांबळे आणि त्यांच्या पत्नी अनिता कांबळे यांनी दिली.