शरद पवार नावाचा व्हायरस नष्ट करणं गरजेचं, तेच आम्ही करतोय; कुणी केली टीका?
Gunratna Sadavarte Criticized on Sharad Pawar : शरद पवार यांचा व्हायरस असा उल्लेख कुणी केला? वाचा...
कोल्हापूर : शरद पवार हे व्हायरस आहेत. तो व्हायरस नष्ट करणं गरजेचं आहे. शरद पवार नावाचा व्हेरियंट अनेक सहकारी क्षेत्रात पसरलेला आहे. या व्हायरसला बाजूला हटवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असं म्हणत अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. ते कोल्हापूरमध्ये माध्यमांशी संवाद साधत होते.
राष्ट्रवादी हा कौटुंबिक पक्ष आहे. राष्ट्रवादी हा दोन-तीन जिल्ह्यातील पक्ष आहे. ST विलनीकारणाचे भाष्य शरद पवार यांनी केलं होतं. पण ST च्या आर्थिक नाड्या आमच्या हातात आल्याकी शरद पवार संपतील. शरद पवार खल्लास!, असं सदावर्ते म्हणालेत.
कोल्हापूरमध्ये झालेल्या दंगलीवरही अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोल्हापूर या पावनभूमीत काही घटना घडल्या. जे गुन्हे दाखल होतात ते गुन्हे दाखल होण्याचं प्रमाण कमी झालं. पूर्वी जाणीवपूर्वक जेलमध्ये डांबले जात होत. ते आता बंद झालं आहे, असं सदावर्ते म्हणालेत.
दाऊद इब्राहिमचा विचार आम्ही या राज्यात चालू देणार नाही. जे जे वाईट असेल त्याला आम्ही धडा शिकवणारच आहोत. लँड जिहाद, लव्ह जिहाद विरोधात आमचा लढा सुरू आहे, असंही ते म्हणालेत.
लँड जिहाद, लव्ह जिहाद नंतर व्हाट्सएप जिहाद सुरू झाला आहे. या विषयी मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिणार आहे. व्हाट्सएप जिहाद यावर कारवाई करावी आणि या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी करणार आहे. असदुद्दीन ओवैसी यांचे असे अनेक व्हाट्सएप ग्रुप आहेत. ओवैसी निगेटिव्ह स्टेटमेंट करून देशात दुफळी माजवत आहेत, असं सदावर्ते म्हणालेत.
संजय राऊत यांच्यासारखी मी पत्रकारिता मी पाहिलेली नाही. त्यांना काय बोलायचं ते त्यांना काळत नाही. त्यांच्या बोलण्याला मी केराची टोपली दाखवतो, असं ते म्हणालेत.
माध्यमं होती म्हणून मी वाचलोय. नाहीतर माझा पुण्यातच एन्काऊंटर झाला असता. एसटी विलीनीकरणाच्या बाबतीत दोन महत्त्वाच्या मागण्या सरकारनं पूर्ण केल्या. अपेक्षा आहे उरलेल्या दोन महत्त्वाच्या मागण्या लवकरच पूर्ण होतील, असंही सदावर्ते म्हणालेत.