Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रवादीत इनकमिंग सुरुच, कोल्हापुरातील माजी आमदार ‘घड्याळ’ बांधणार

कोल्हापुरातील हातकणंगले मतदारसंघातील जनसुराज्य पक्षाचे माजी आमदार राजीव आवळे राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत

राष्ट्रवादीत इनकमिंग सुरुच, कोल्हापुरातील माजी आमदार 'घड्याळ' बांधणार
Follow us
| Updated on: Nov 05, 2020 | 12:25 PM

कोल्हापूर : राष्ट्रवादीमध्ये दिग्गज नेत्यांच्या पक्षप्रवेशाचे सत्र सुरुच आहे. एकनाथ खडसे यांच्यापाठोपाठ आणखी एक माजी आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. माजी आमदार राजीव आवळे (Rajiv Awale) मुंबईत राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधणार आहेत. आवळे हे कोल्हापुरातील हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून जनसुराज्य पक्षाचे माजी आमदार आहेत. (Kolhapur Hatkanangale Ex MLA Rajiv Awale to join NCP)

राजीव आवळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचे निश्चित केले आहे. आवळेंच्या पक्षप्रवेशानंतर हातकणंगले मतदारसंघात राष्ट्रवादीचे बळ वाढण्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.

दुसरीकडे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत प्रवीण सिंह पाटील मुरुगुडमध्ये मेळावा घेत शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत. तर काही दिवसांपूर्वीच माजी जिल्हा परिषद सदस्य योगीराज गायकवाड यांनीही राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला.

कोण आहेत राजीव आवळे?

इचलकरंजी नगरपालिकेचे नगराध्यक्षपद भूषवलेला सर्वात तरुण चेहरा अशी राजीव आवळे यांची ख्याती आहे. वयाच्या अवघ्या 28 व्या वर्षी त्यांनी पद काबीज केलं होतं. नगराध्यपदाच्या खुर्चीवर विराजमान असतानाच आवळेंनी वडगाव मतदारसंघाच्या निवडणुकीत उतरुन कोल्हापूरच्या राजकीय क्षेत्राचं लक्ष वेधून घेतलं होतं. वडगाव हा काँग्रेसचा गड मानला जात होता. माजी मंत्री जयवंतराव आवळे यांचं 25 वर्ष एकहाती वर्चस्व असलेल्या बालेकिल्ल्याला राजीव आवळेंनी सुरुंग लावला होता.

राजीव आवळे 2004 मध्ये जनसुराज्य पक्षाच्या चिन्हावर हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून आमदारपदी निवडून आले होते. कुंभोज मतदारसंघातून त्यांच्या पत्नी स्मिता आवळे या जिल्हा परिषदेवर निवडून आल्या. हातकणंगले मतदारसंघावर आवळेंचं वर्चस्व होतं. मात्र  काही वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार डॉ. सुजित मिणचेकर यांनी राजीव आवळे यांचा गड खालसा केला होता. (Kolhapur Hatkanangale Ex MLA Rajiv Awale to join NCP)

दरम्यान, राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर आवळे यांचं राजकीय पुनर्वसन कसं होणार, याकडे त्यांच्या समर्थकांचे डोळे लागले आहेत. मात्र हातकणंगले मतदारसंघातील राजकीय समीकरणं बदलण्याची ही नांदी मानली जात आहे.

संबंधित बातम्या :

अजित पवारांच्या उपस्थितीत भाजपचा माजी आमदार ‘व्हाया काँग्रेस’ राष्ट्रवादीत

आणखी एक माजी आमदार राष्ट्रवादीच्या गळाला, अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

(Kolhapur Hatkanangale Ex MLA Rajiv Awale to join NCP)

'...तेव्हा कोकणाला काय दिलं?', एकच सवाल अन् राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
'...तेव्हा कोकणाला काय दिलं?', एकच सवाल अन् राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल.
मुंबईतील वाहतुकीचे पर्याय अधिक सक्षम होणार! फडणवीसांची मुंबईसाठी घोषणा
मुंबईतील वाहतुकीचे पर्याय अधिक सक्षम होणार! फडणवीसांची मुंबईसाठी घोषणा.
'माझ्या वक्तव्यावर मी ठाम', मंगेशकर कुटुंबीयांवर वडेट्टीवारांचा घणाघात
'माझ्या वक्तव्यावर मी ठाम', मंगेशकर कुटुंबीयांवर वडेट्टीवारांचा घणाघात.
मुंबईकरांनो 'या' मार्गावरून प्रवास करताय? मेगाब्लॉकमुळे 334 लोकल रद्द
मुंबईकरांनो 'या' मार्गावरून प्रवास करताय? मेगाब्लॉकमुळे 334 लोकल रद्द.
एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात परिवहन मंत्र्यांकडून मोठी अपडेट
एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात परिवहन मंत्र्यांकडून मोठी अपडेट.
रुग्णला अमृत पाजलं का? शिंदेंच्या आमदारानं डॉक्टरला झापलं,ऑडिओ व्हायरल
रुग्णला अमृत पाजलं का? शिंदेंच्या आमदारानं डॉक्टरला झापलं,ऑडिओ व्हायरल.
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण; तिसरा अहवाल सरकारला सादर, काय म्हटलंय?
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण; तिसरा अहवाल सरकारला सादर, काय म्हटलंय?.
इम्तियाज जलील - उद्धव ठाकरेंची भेट; अंबादास दानवेंनी सांगितलं कारण
इम्तियाज जलील - उद्धव ठाकरेंची भेट; अंबादास दानवेंनी सांगितलं कारण.
सर्वांना हिशेब इथेच होणार, 'त्या' आठवणीने नितेश राणे भावुक
सर्वांना हिशेब इथेच होणार, 'त्या' आठवणीने नितेश राणे भावुक.
एसटी कर्मचाऱ्यांची थट्टा सुरूच, इतिहासात पहिल्यांदाच अर्धाच पगार अन्
एसटी कर्मचाऱ्यांची थट्टा सुरूच, इतिहासात पहिल्यांदाच अर्धाच पगार अन्.