Kolhapur Lok sabha result 2019 : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ निकाल
कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदार संघात शिवसेनेचे संजय मंडलिक विजयी झाले. देशातील तिसऱ्या टप्प्यात म्हणजे 23 एप्रिल रोजी मतदान झालं. लोकसभा निवडणुकीत याठिकाणी 70.70 टक्के मतदान झालं. 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत या मतदारसंघात मतदानाच्या टक्केवारीत फारसा फरक जाणवला नाही. कारण गेल्यावेळी याच मतदार संघात 71.04 टक्के इतकं मतदान झालं होतं. लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून विद्यमान खासदार धनंजय […]
कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदार संघात शिवसेनेचे संजय मंडलिक विजयी झाले. देशातील तिसऱ्या टप्प्यात म्हणजे 23 एप्रिल रोजी मतदान झालं. लोकसभा निवडणुकीत याठिकाणी 70.70 टक्के मतदान झालं. 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत या मतदारसंघात मतदानाच्या टक्केवारीत फारसा फरक जाणवला नाही. कारण गेल्यावेळी याच मतदार संघात 71.04 टक्के इतकं मतदान झालं होतं. लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून विद्यमान खासदार धनंजय महाडिक आणि शिवसेनेचे संजय मंडलिक यांच्यात लढत झाली.
दोन्ही उमेदवार तुल्यबळ असल्यानं मतदानापासून उमेदवारांसह कार्यकर्त्यांचीची धाकधूक शिगेला पोहोचली. शिवसेना-भाजपकडून प्राध्यापक संजय मंडलिक तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडून धनंजय महाडिक रिंगणात आहेत. दोन्ही बाजूनं ताकदीनं निवडणूक लढवण्यात आली.
पक्ष | उमेदवार | निकाल |
---|---|---|
भाजप/शिवसेना | संजय मंडलिक (शिवसेना) | विजयी |
काँग्रेस/ राष्ट्रवादी | धनंजय महाडिक (राष्ट्रवादी) | पराभूत |
अपक्ष/इतर | डॉ. अरुणा माळी (VBA) | पराभूत |
या लढतीला महत्व का आहे?
काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांना उघड-उघड आपला पाठिंबा दर्शवला. एवढंच नाही तर छुप्या पद्धतीनं सगळी यंत्रणा मंडलिक यांच्या बाजूनं उभा केली. लढत संजय मंडलिक विरुद्ध धनंजय महाडिक असली तर प्रत्यक्षात चर्चा बंटी आणि मुन्नाची झाली. त्यातच ‘आमचं ठरलंय’ आणि ‘मी बी ध्यानात’ ठेवलंय ही दोन वाक्य प्रचारात लोकप्रिय ठरली.
शिवेसना-भाजप युतीनं राज्यातील प्रचाराचा नारळ याच कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून फोडला. शिवसेनेच्या इतिहासात या मतदारसंघात कधीच सेनेचा खासदार याठिकाणाहून निवडून आला नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती की एक वेळ तरी कोल्हापूरमधून शिवसेनेचा खासदार संसदेत गेला पाहिजे.
दुसरीकडे थोरल्या पवारांनी म्हणजे शरद पवारांनी इकडे विशेष लक्ष दिलं होतं.कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादीची हक्काची असलेली सोडायची नाही. त्यामुळं वैयक्तीक भेटीगाठीसह पवारांनी जाहिर सभांचा सपाटा लावला.
मतदानाची आकडेवारी पाहिली तर 2014 साली या मतदारसंघात 71.04 टक्के इतकं मतदान झालं होतं. तर यावेळी 70.70 टक्के मतदान झालं.
विधानसभा मतदारसंघ निहाय मतदानाची टक्केवारी
मतदार संघ २०१४ २०१९
चंदगड ६७.५९ टक्के ६५.८७ टक्के
राधानगरी ७४.४६ टक्के ७०.६९ टक्के
कागल ७८.२४ टक्के ७५.२४ टक्के
कोल्हापूर दक्षिण ६७.६६ टक्के ७०.५७ टक्के
करवीर ६८.७९ टक्के ७५.४२ टक्के
कोल्हापूर उत्तर ६५.२० टक्के ६६.०७ टक्के
एकूण टक्केवारी पाहता 2014 च्या तुलनेत सुमारे एक टक्का घट झाली.
यावेळी कोल्हापूर लोकसभा मतदार संघात १८ लाख ७४ हजार ३४५ मतदार आहेत. गेल्या निवडणुकीपेक्षा ३० हजार मतदार जास्त होते. यापैकी ६ लाख ३५ हजार ३२७ पुरुषांनी मतदान केलं. तर ५ लाख ९२ हजार २७७ महिलांनी मतदान केलं. तर इतर २ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये चंदगड विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी मतदान झाल्याचं दिसून आलं.
यंदाच्या निवडणुकीचं वैशिष्ट्ये, कुणा-कुणाच्या सभा झाल्या?
कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून युतीनं महाराष्ट्रातील प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सभेला संबोधित केलं. तपोवन मैदानावर झालेल्या या सभेला रेकॉर्ड ब्रेक गर्दी जमवण्यात युती यशस्वी झाली. त्यानंतर चंद्रकांतदादा पाटील आणि शिवसेनेच्या नेत्यांनी मतदारसंघ पिंजून काढला.त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या आणखी दोन सभा देखील याठिकाणी झाल्या.
तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार या मतदारसंघात विशेष लक्ष घालून बसले होते. राष्ट्रवादीची अख्खी टीम संपूर्ण महाराष्ट्रात आणि एकटे शरद पवार कोल्हापूर मतदार संघात असं चित्र पाहायला मिळालं. त्यानंतर धनंजय महाडिक आणि हसन मुश्रीफ यांनी प्रचाराची धुरा सांभाळली.