Municipal election 2022 : कोल्हापूर महापालिका आरक्षण सोडत जाहीर, कोणाला-कोणता प्रभाग, वाचा सविस्तर?
आगामी कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठीचे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिला आरक्षण आज निश्चित झाले. कोल्हापूर महापालिकेतील 31 प्रभागातील 92 जागांसाठीचे आरक्षण जाहीर झाले आहे. आरक्षणाकडे सर्व कोल्हापूरवाशीयांचे लक्ष लागून राहिले होते. महापालिकेची सदस्यसंख्या 92 आहे. तर महिला आरक्षण असल्याने महिलांची सदस्यसंख्या 46 एवढी झाली आहे.
कोल्हापूर : राज्यात महापालिका निवडणुकांचे (Municipal Elections) वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारविरुद्ध भाजप अशी रंगतदार लढत आगामी पालिका निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने 14 महापालिकांना 31 मेपर्यंत प्रभागनिहाय आरक्षण (Ward wise reservation) सोडत जाहीर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सोडत प्रक्रिया पार पडली. अशावेळी राज्यातील महापालिकांची आरक्षण सोडत कशी असेल, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. सर्व राजकीय पक्षांसह इच्छुक उमेदवारांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई, नवी मुंबई, वसई विरार, उल्हासनगर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, नागपूर, सोलापूर, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, कल्याण डोंबिवली आणि ठाणे महापालिकांचा समावेश आहे. चला तर जाणून घेऊया कल्याण डोंबिवली पालिकेचं इत्यंभूत वॉर्डनिहाय आरक्षण असे असणार आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेची सोडत
आगामी कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठीचे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिला आरक्षण आज निश्चित झाले. कोल्हापूर महापालिकेतील 31 प्रभागातील 92 जागांसाठीचे आरक्षण जाहीर झाले आहे. आरक्षणाकडे सर्व कोल्हापूरवाशीयांचे लक्ष लागून राहिले होते. महापालिकेची सदस्यसंख्या 92 आहे. तर महिला आरक्षण असल्याने महिलांची सदस्यसंख्या 46 एवढी झाली आहे.
महापालिकेचे नाव : कोल्हापूर
एकूण प्रभाग : 31 नगरसेवक संख्या : 92 त्रिसदस्य प्रभाग : 30 द्विसदस्य प्रभाग : 01 अनुसूचित जातीसाठी आरक्षित प्रभाग : 06 अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित होणारे प्रभाग : 06 अनुसूचित जमाती प्रभाग संख्या: 01 सर्वसाधारण महिला प्रभाग: 40 खुला प्रभाग 39 /40
अनुसूचित जाती (महिला)
प्रभाग क्रमांक – 7 अ, 4 अ, 9 अ,13 अ, 28 अ, 30 अ,
अनुसूचित जाती आरक्षित प्रभाग
प्रभाग क्रमांक – 15 अ, 19 अ, 21 अ, 5 अ , 1 अ, 18 अ
अनुसूचित जमाती
प्रभाग क्रमांक – 2 अ
सर्वसाधारण आरक्षित प्रभाग
प्रभाग क्रमांक – 1 क, 2 क, 3 ब, 3 क, 4 क, 5 क, 6 क, 7 क, 8 क, 9 क, 10 ब, 10 क, 11 क, 12 ब, 12 क, 13 क, 14 क, 15 क, 16 क, 17 क, 18 क, 19 क, 20 क, 21 क, 22 क, 23 क, 24 क, 25 क, 26 क, 27 क, 28 क, 29 क, 30 क, 31 ब
सर्वसाधारण साधारण महिला आरक्षित प्रभाग
प्रभाग क्रमांक – 1 ब, 2 ब, 3 अ, 4 ब, 5 ब , 6 अ, 6 ब, 7 ब, 8 अ, 8 ब, 9 ब, 10 अ, 11 अ, 11 ब, 12 अ, 13 ब, 14 अ, 15 ब, 16 अ, 16 ब, 17 अ, 18 ब, 19 ब, 20 अ, 21 ब, 22 अ, 22 ब, 23 अ, 24 अ, 24 ब, 25 अ, 25 ब, 26 अ, 27 अ, 27 ब, 28 ब, 29 अ, 30 ब, 31 अ.
सध्याचे पक्षीय बलाबल
काँग्रेस- 30 राष्ट्रवादी- 15 शिवसेना- 04 ताराराणी आघाडी- 19 भाजप- 13 एकूण जागा – 81