कोल्हापूर : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. गोकुळचे ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांच्या चिरंजीवी हॉटेलचा उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते झालं. इथं बोलताना अजित पवार यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना गृहखात्याबाबत महत्वाचा सल्ला दिलाय.
देवेंद्र फडणवीस यांच्याकडं गृहखातं आहे. फडणवीसांनी त्या पोलीस खात्यात आदरयुक्त दबदबा निर्माण केला पाहिजे, असं अजित पवार म्हणालेत.
भाजपत अनेक नेते जाणार असल्याचे दावे करण्यात येत आहेत. मात्र असे दावे अनेक वर्ष करण्यात येत आहेत. ज्या वेळेस हे दावे खरे ठरतील. त्यावेळेस या दाव्यांना महत्त्व असेल, असं अजित पवार म्हणालेत.
महागाई , बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न यांच्यावर दुर्लक्ष करण्यासाठी असे दावे केले जात आहेत. अशा पद्धतीने बातम्या देऊन ते नेमकं काय साध्य करतात. हे अजून पर्यंत कळलेलं नाही. अशा बातम्यांमुळे पेट्रोल दरवाढ कमी होणार आहे का सिलेंडरच्या किमती कमी होणार आहेत का तरुणांना रोजगार मिळणार आहेत का? ज्यांच्या हातात सरकार असतं त्यांनी प्रशासनावर एक जरब बसवली पाहिजे. पोलीस खातं ज्यांच्याकडे आहे त्या देवेंद्र फडणवीस यांनी त्या पोलीस खात्यात आदर युक्त दबदबा निर्माण केला पाहिजे, अजित पवार यांनी म्हटलं आहे.
शेतकऱ्यांच्या घरापर्यंत दारापर्यंत कुठलीही मदत पोहोचलेली नाही सरकारने जाहीर केलेला गोष्टींची अंमलबजावणी केलेली नाही. सरकार विरोधात तोच असंतोष जनतेच्या मनामध्ये आहे. जागा वाटपासंदर्भात जे दावे केली जात आहेत. त्यामध्ये काहीही तथ्य नाही. अजूनही तिन्ही पक्षातील दोन दोन व्यक्ती येऊन चर्चा करणार आहे ती चर्चा झालेली नाही. जागा वाटपासंदर्भात वरिष्ठ पातळीवर अंतिम निर्णय होईल त्यावेळी सर्वांना अधिकृत माहिती दिली जाईल, असं अजित पवार म्हणालेत.