Kolhapur Assembly ByElection : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, कधी होणार मतदान?

आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालाय. निवडणूक आयोगाने पोडनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलाय. त्यामुळे आता आता राज्यात पुन्हा एकदा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु होण्याची शक्यता आहे.

Kolhapur Assembly ByElection : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, कधी होणार मतदान?
कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुूकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 12, 2022 | 7:09 PM

मुंबई : आमदार चंद्रकांत जाधव (Chandrakant Jadhav) यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या कोल्हापूर उत्तर (Kolhapur North) विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणुकीचा (by-Election) कार्यक्रम जाहीर झालाय. निवडणूक आयोगाने (Election Commission) पोडनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलाय. त्यामुळे आता आता राज्यात पुन्हा एकदा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 17 मार्चपासून उमेदवारी अर्ज दाखल केले जातील, 12 एप्रिल रोजी मतदान पार पडेल, तर 16 एप्रिलला मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाने चार राज्यातील पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलाय. त्यात पश्चिम बंगाल, छत्तीसगड, बिहार आणि महाराष्ट्राचा समावेश आहे.

कशी असेल पोटनिवडणुकीची प्रक्रिया?

17 मार्च – उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात

24 मार्च – उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस

25 मार्च – उमेदवारी अर्जांची छानणी

28 मार्च – उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख

12 एप्रिल – मतदान

16 एप्रिल – मतमोजणी

काँग्रेसकडून जाधव यांच्या पत्नीला उमेदवारी?

चंद्रकांत जाधव हे काँग्रेसचे आमदार होते. त्यामुळे महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जागेवर काँग्रेसकडून जाधव यांच्या पत्नी जयश्री यांना उमेदवारी देण्यात येण्याची शक्यता आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महाविकास आघाडी प्रयत्नशील आहे. त्यासाठी आघाडीच्या नेत्यांसोबतच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेणार असल्याचं पालकमंत्री सतेज पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगितलं होतं.

भाजप पोटनिवडणूक लढण्याची शक्यता

दरम्यान, भाजपही ताकदीने मैदानात उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपकडून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव, माजी नगरसेवक सत्यजित कदम, जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे आणि दौलत देसाई यांची नावं चर्चेत आहेत. पोटनिवडणूक लढवण्याबाबत भाजपची नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीत उमेदवारीबाबत सविस्तर चर्चा झाली. त्यावेळी कदम यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे त्यांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केल्याचंही पाहायला मिळतंय.

कोण होते चंद्रकांत जाधव?

चंद्रकांत जाधव हे 2019 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. पहिल्याच निवडणुकीत त्यांनी शिवसेनेचे दोन वेळ आमदार राजेश क्षीरसागर यांचा पराभव करत विजय मिळवला होता.

चंद्रकांत जाधव यांचा अल्प परिचय

>> यशस्वी उद्योजक म्हणून चंद्रकांत जाधव यांची महाराष्ट्रभर ओळख

>> 2019 मध्ये पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले, काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली

>> कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून सलग दोन वेळा निवडून आलेले राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचा चंद्रकांत जाधव यांच्याकडून पराभव

>> भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशीही जाधव यांचे होते घनिष्ठ संबंध

>> चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी कोल्हापूर महानगर पालिकेत भाजपच्या नगरसेविका म्हणून होत्या कार्यरत

>> शांत मितभाषी आणि प्रामाणिक लोकप्रतिनिधी अशी ओळख त्यांनी निर्माण केली

इतर बातम्या :

‘आरोप सिद्ध झाल्याशिवाय नवाब मलिकांचा राजीनामा नाही’, जयंत पाटील यांचा पुनरुच्चार, भाजपवर निशाणा

‘परमेश्वराने मला दूरदृष्टी दिली आणि मी भाजपमध्ये आलो’, खासदार सुजय विखे-पाटलांची काँग्रेसवर टोलेबाजी

Non Stop LIVE Update
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड.
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल.
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?.
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?.
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?.
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?.