कोल्हापुरातील लोकप्रतिनिधींना कोरोनाचा विळखा, आधी ऋतुराज पाटील, आता आणखी एका काँग्रेस आमदाराला कोरोनाची लागण
कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांना कोरोनाची लागण झाली (Congress MLA Chandrakant Jadhav corona positive) आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वी कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. (Congress MLA Chandrakant Jadhav corona positive)
“माझी कोविड-19 चाचणी करण्यात आली होती. माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने कोल्हापुरात उपचार सुरू आहेत. माझी तब्येत ठीक आहे, काळजी करु नये. पण माझ्या संपर्कात आलेल्यानी योग्य ती काळजी घ्यावी,” अशी विनंती चंद्रकांत जाधव यांनी केली आहे.
कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यापासून चंद्रकांत जाधव हे कोरोना सेंटरमधील सुविधा, रुग्णांना तसेच डॉक्टरांना येणाऱ्या अडचणी, महापालिकेचे नियोजन याची वारंवार तपासणी करत होते.
हेही वाचा – कोल्हापुरात कोरोना सेंटरमध्ये गणरायाचे आगमन, मंत्री हसन मुश्रीफांच्या हस्ते प्रतिष्ठापना
काही दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर शुक्रवारी ऋतुराज पाटील यांनाही कोरोनाची लागण झाली होती. जाधव हे या दोघांच्याही संपर्कात आले होते. त्यामुळे खबरदारी म्हणून त्यांना कोरोनाची चाचणी करुन घेतली होती. या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यांनी फेसबुकवर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली.
दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत प्रकाश आवाडे, ऋतुराज पाटील आणि चंद्रकांत जाधव अशा 3 आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे. तर माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांचाही रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाचा विळखा लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांपर्यत पोहचल्याने चिंता वाढली आहे. (Congress MLA Chandrakant Jadhav corona positive)
संबंधित बातम्या :
कोल्हापूरचे काँग्रेस आमदार ऋतुराज पाटील यांना कोरोनाची लागण
युवा आमदार ऋतुराज पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसमध्ये मोठी जबाबदारी