Aamcha Tharlay | कोल्हापुरात ‘आमचं ठरलंय विकास आघाडी’ची जुळवाजुळव
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून कोल्हापुरात 'आमचं ठरलंय' या कॅम्पेनचे बोर्ड जागोजागी लावण्यात आले होते. (Kolhapur Aamcha Tharlay Vikas Aghadi)
कोल्हापूर : कोल्हापुरात ‘आमचं ठरलंय विकास आघाडी’ची स्थापना होण्याचे संकेत मिळत आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राज्यभर ‘आमचं ठरलंय’ पॅटर्न गाजला होता. (Kolhapur Aamcha Tharlay Vikas Aghadi)
कसबा बावडा मधील प्रमोद पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी निवडणूक आयोगाकडे अधिकृत नोंदणीसाठी अर्ज केला आहे. नोंदणीची प्रक्रिया अंतिम टप्यात असून लवकरच त्याला मान्यता मिळण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून कोल्हापुरात ‘आमचं ठरलंय’ या कॅम्पेनचे बोर्ड जागोजागी लावण्यात आले होते.
काय आहे ‘आमचं ठरलंय’ पॅटर्न?
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांच्याविरोधात भूमिका घेतली होती. “आमचं ठरलंय” असं म्हणत त्यांनी शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या पाठीशी आपली ताकद उभी केली. त्याचा फटका महाडिक यांना बसला आणि त्यांना तब्बल दोन लाख 75 हजार मतांनी पराभवाचा सामना करावा लागला.
शिवसेना खासदार संजय मंडलिक यांच्या विजयात सतेज पाटलांच्या ‘आमचं ठरलंय’ची महत्त्वाची भूमिका होती. त्यानंतर विधानसभेला याचा दुसरा अंक पाहायला मिळाला.
हेही वाचा : सरकारच्या सूचना पाळून उत्सव साजरा करण्याची हीच ती वेळ, ‘लालबागचा राजा’च्या निर्णयावर शेलारांची नाराजी
काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी घेतलेल्या कार्यकर्ता संवाद मेळाव्याला शिवसेना खासदार संजय मंडलिक यांनी उपस्थिती लावली होती. याच मेळाव्यात सतेज पाटील यांनी आपण विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर करत कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून पुतणे ऋतुराज पाटील यांची उमेदवारी जाहीर केली होती. या उमेदवारीला खासदार मंडलिक यांनी जाहीर पाठिंबा तर दिलाच, पण त्याआधी ऋतुराज पाटील यांना शिवसेनेत येण्याचं आमंत्रणही दिलं होतं. (Kolhapur Aamcha Tharlay Vikas Aghadi)
VIDEO : टॉप 9 न्यूज- 2 July 2020 https://t.co/dMFnwjU9tX
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 2, 2020
संबंधित बातम्या
सतेज पाटलांची घोषणा, पुतण्या ऋतुराजला उमेदवारी, काँग्रेसच्या मेळाव्यात शिवसेना खासदार मंचावर
‘आमचं ठरलंय’ वरुन मुन्ना-बंटी मतदानादिवशीही आमने-सामने
वेळ नेहमीच अनुकूल नसते, सतेज पाटलांचं ‘आमचं ठरलंय’ पवारांच्या जिव्हारी
(Kolhapur Aamcha Tharlay Vikas Aghadi)