मुंबई : सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. बलात्काराचा आरोप केलेल्या रेणू शर्मा (Renu Sharma) यांनी मुंडेंविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे. कौटुंबिक कारणास्तव तक्रार मागे घेत असल्याचं रेणू शर्मा यांनी पोलिसांना लेखी दिलं आहे. त्यानंतर रेणू शर्मांनी आपल्यालाही ब्लॅकमेल केल्याचा आरोप करणारे भाजप नेते कृष्णा हेगडे (Krishna Hegde) यांनी समाधान व्यक्त केले. (Krishna Hegde on Renu Sharma withdrawing Rape accusation against Dhananjay Munde)
“रेणू शर्मा यांनी धनंजय मुंडेंविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली असल्यास मी खुश आहे. सत्याचा नेहमीच विजय होतो.
सत्यमेव जयते… रेणू शर्मा रिलेशनशीपसाठी माझ्याही मागे लागली होती. पण हे प्रकरण संपलंय, त्यामुळे त्यांच्याविरोधात मला काहीही सांगायचं नाही. बॉलिवूडमध्येही मीटूचे अनेक प्रसंग घडले होते. खऱ्या पीडितांसोबत आपण कायम उभं राहायला पाहिजे, पण या प्रकरणात मला आणखी काही बोलावंसं मला वाटत नाही.” अशी प्रतिक्रिया भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना दिली.
“मी रेणू शर्मा यांना दोनदा भेटलो आहे. रेणू मला वारंवार संपर्क करुन रिलेशनशिपबाबत विचार असत” असा आरोप कृष्णा हेगडे यांनी केला होता. कोणा महिलेला बदनाम करुन मला काही मिळणार नाही, मात्र दोन तीन जणांशी ती असं वागली आहे. म्हणून आता तक्रार नोंदवली. माझ्यासाठी हा राजकीय मुद्दा नाही. धनंजय मुंडे यांना मी ओळखतही नाही” असं कृष्णा हेगडेंनी स्पष्ट केलं होतं.
पहिलं राजकीय मीटू : हेगडे
“मी कोणत्या महिलेवर उगाचच आरोप कशाला करु? धनंजय मुंडे, मनीष धुरी यांच्याबाबतही असं झालं आहे. हे हनी ट्रॅपचं जाळं आहे. आपल्या जाळ्यात पकडून लुटायचं. आज धनंजय मुंडेंच्या बाबतीत झालं आहे. उद्या माझ्याबाबतही झालं असतं, असे कृष्णा हेगडेंनी सांगितले.
“मनीष धुरी यांचाही कॉल आला होता, ते सुद्धा तसंच सांगत होते. ते डायरेक्ट पैसे मागत नाहीत. ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये कोणी असतं, सिंगर असतात, तेव्हा म्युझिक अल्बमसाठी पैशाची गरज असते,” असेही कृष्णा हेगडे म्हणाले. (Krishna Hegde on Renu Sharma withdrawing Rape accusation against Dhananjay Munde)
लांबूनच आभार मानतो
मी धनंजय मुंडेंना ओळखतो. त्यांना 2012 मध्ये एकदाच भेटलो होतो. पण ते माझे मित्र नाहीत. त्यामुळे त्यांच्या राजकीय मदतीसाठी धावून जाण्याचा प्रश्नच येत नाही, असंही ते म्हणाले. रेणू शर्मा यांनी हेगडे यांचा आदर करत असल्याचं सांगितलं. त्याबाबत हेगडे यांना विचारले असता, त्या माझ्या आदर करतात. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. पण आदर दुरूनच करा. मीही त्यांचे लांबूनच आभार मानतो, असंही ते म्हणाले.
संबंधित बातम्या :
धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा, रेणू शर्मांकडून बलात्काराची तक्रार मागे
मनसेच्या मनीष धुरींनाही रेणू शर्माचे कॉल, कृष्णा हेगडेंनी वात पेटवली
हेगडेंकडूनच माझ्याशी बोलायला सुरुवात, सरनाईकांच्या वाढदिवसाच्या पार्टीत भेटलो; रेणू शर्मांचा दावा
(Krishna Hegde on Renu Sharma withdrawing Rape accusation against Dhananjay Munde)