वैभव नाईकांकडून तीन दिवसात वचपा, कट्टर राणे समर्थकाचा शिवसेनाप्रवेश

कट्टर राणे समर्थक असलेल्या कुडाळ पंचायत समिती सदस्या निलिमा वालावलकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

वैभव नाईकांकडून तीन दिवसात वचपा, कट्टर राणे समर्थकाचा शिवसेनाप्रवेश
Follow us
| Updated on: Nov 01, 2020 | 2:40 PM

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गात शिवसेना आमदार वैभव नाईक आणि भाजप आमदार नितेश राणे यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. नाईकांच्या मतदारसंघातील कुडाळच्या सभापतींना भाजपात आणून राणेंनी सुरुंग लावल्याचा प्रकार ताजा असतानाच अवघ्या तीन दिवसात वैभव नाईक यांनी वचपा काढला. कट्टर राणे समर्थक पंचायत समिती सदस्याला शिवसेनेत प्रवेश देत नाईकांनी राणेंवर पलटवार केला. (Kudal Panchayat Samiti member joins Shivsena Vaibhav Naik took revenge of Nitesh Rane)

कट्टर राणे समर्थक असलेल्या कुडाळ पंचायत समिती सदस्या निलिमा वालावलकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. वालावलकर या कुडाळ पंचायत समितीच्या पिंगुळी मतदारसंघातील विद्यमान सदस्या आहेत. त्यांना शिवसेनेत प्रवेश देऊन आमदार नितेश राणेंना वैभव नाईक यांनी धक्का दिला आहे.

महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत कुडाळमधे हा पक्ष प्रवेश करण्यात आला. या प्रवेशामुळे नारायण राणेंना हा मोठा धक्का मानला जात आहे.

कोणत्या राजकीय घडामोडी?

कुडाळ पंचायत समितीच्या सभापती नूतन आईर यांनी 29 ऑक्टोबरला कणकवलीत नितेश राणेंच्या उपस्थितीत भाजपमधे प्रवेश केला. त्यामुळे कुडाळ पंचायत समितीत आता भाजपची सत्ता आली.

नितेश राणे यांनी शिवसेनेच्या दोन्ही आमदारांवर टीका केली होती. शिवसेनेचे दोन्ही आमदार बिनकामाचे असून काठावर पास झाले आहेत. मात्र 2024 च्या निवडणुकीत शिवसेनेचा सुपडा साफ होईल आणि जिल्ह्यात भाजपचेच आमदार खासदार निवडून येतील, असा दावाही नितेश राणेंनी केला होता.

नितेश राणेंच्या टीकेला उत्तर देताना वैभव नाईक म्हणाले, “शिवसेनेचे आमदार हे दोन्ही निवडणुकीत एकाच पक्षातून एकाच चिन्हावर निवडून आले. मात्र नितेश राणेंना निवडून न येण्याच्या भीतीमुळे पक्ष बदलावा लागला. ते जर भाजपमध्ये नसते तर त्यांची काय अवस्था झाली असती, ते नितेश राणेंना खासगीत विचारा” अशी खोचक टीका वैभव नाईक यांनी केली. (Kudal Panchayat Samiti member joins Shivsena Vaibhav Naik took revenge of Nitesh Rane)

कुडाळ पंचायत समितीच्या सभापतींच्या दालनात त्यांचे पती ठेकेदारी चालवत होते. हे आपल्या कानावर आल्यानंतर आपण सभापतींना असले धंदे शिवसेनेत चालणार नाहीत, राजीनामा द्या, असे सांगितले होते. त्याचा राग आल्यामुळे त्यांनी पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला, असा दावाही वैभव नाईक यांनी केला.

संबंधित बातम्या :

वैभव नाईकांच्या मतदारसंघात शिवसेनेला सुरुंग, नितेश राणेंच्या उपस्थितीत कुडाळच्या सभापती भाजपात

“नितेश राणेंना खासगीत विचारा…” कुडाळ सभापतींच्या भाजपप्रवेशानंतर वैभव नाईकांचे प्रत्युत्तर

(Kudal Panchayat Samiti member joins Shivsena Vaibhav Naik took revenge of Nitesh Rane)

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.