राहुल गांधींच्या चेहऱ्यावर लेझर लाईट, सुरक्षेत मोठी चूक?
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सुरक्षेबाबत मोठी चूक झाल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. त्याबाबत काँग्रेसने गृहमंत्री राजनाथ सिंह यांना पत्र पाठवलं आहे. अमेठीतील रोड शो दरम्यान राहुल गांधींच्या चेहऱ्यावर लेझर लाईट पाडल्याचं पाहायला मिळालं, असं या पत्रात म्हटलं आहे. राहुल गांधी यांनी काल उत्तर प्रदेशातील अमेठी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला. यावेळी रोड […]
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सुरक्षेबाबत मोठी चूक झाल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. त्याबाबत काँग्रेसने गृहमंत्री राजनाथ सिंह यांना पत्र पाठवलं आहे. अमेठीतील रोड शो दरम्यान राहुल गांधींच्या चेहऱ्यावर लेझर लाईट पाडल्याचं पाहायला मिळालं, असं या पत्रात म्हटलं आहे. राहुल गांधी यांनी काल उत्तर प्रदेशातील अमेठी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला. यावेळी रोड शोदरम्यान त्यांच्या चेहऱ्यावर लेझर लाईट पाडल्याचं काँग्रेसने म्हटलं आहे. राहुल गांधी यांना विशेष सुरक्षा असते. मात्र काल फॉर्म भरल्यानंतर राहुल गांधी ज्यावेळी माध्यमांशी संवाद साधत होते, त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर हिरव्या रंगाची लेझर लाईट पाडण्यात आला. सातवेळा ही लाईट पाडण्यात आली.
काँग्रेसने या पत्रात राहुल गांधींची आजी इंदिरा गांधी आणि वडील राजीव गांधी यांच्या हत्येचा उल्लेख करत, राहुल यांच्या सुरक्षेत ढिसाळपणा झाल्याचं म्हटलं आहे.
काँग्रेसच्या फोटोग्राफरच्या कॅमेऱ्याची लाईट – एसपीजी गृहमंत्रालयाने याबाबत आपल्याकडे कोणतीही तक्रार आलं नसल्याचं म्हटलं आहे. मात्र तरीही विशेष सुरक्षा यंत्रणा अर्थात एसपीजीला याबाबतच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान एसपीजीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, “ व्हिडीओ क्लीप पाहिली असता, राहुल यांच्या चेहऱ्यावर जी हिरवी लाईट दिसते, ती काँग्रेसच्या फोटोग्राफरच्या कॅमेऱ्याची आहे. याबाबतची माहितीही राहुल गांधींच्या स्टाफला दिली आहे”