Marathi News Politics Last Photo of Vinayak Mete After accident watch shiv sangram leader Vinayak mete passed away in car accident on mumbai Pune express Highway check all funeral updates and time in Marathi
Vinayak Mete No more : रक्तबंबाळ चेहरा, बेशुद्ध अवस्था! विनायक मेटे यांचा अखेरचा फोटो समोर, कारचाही चक्काचूर
Shiv sangram Vinayak mete passed away : विनायक मेटे यांचा रक्तबंबाळ झालेला चेहरा दिसून आलाय. त्यांना एका स्ट्रेचरवर झोपवण्यात आलं होतं. त्यांना शुद्ध नव्हती.
शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete News) यांच्या गाडीचा अपघात (Vinayak Mete Accident News) झाला आहे. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर झालेल्या भीषण अपघातात विनायक मेटे यांच्या झालेल्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाला मोठा हादरा बसला आहे. ते 52 वर्षांचे होते. या अपघातात गंभीररीत्या जखमी झालेल्या विनायक मेटे यांच्या निधनाने अनेकांना धक्का बसला आहे. या अपघाताआधीचा मृत्यूपूर्वीचा विनायक मेटे (Vinayak Mete Passed Away) यांचा अखेरचा फोटो समोर आला आहे. या मध्ये विनायक मेटे यांचा रक्तबंबाळ झालेला चेहरा दिसून आलाय. त्यांना एका स्ट्रेचरवर झोपवण्यात आलं होतं. त्यांना शुद्ध नव्हती. पिवळ्या रंगाचा एक शर्ट विनायक मेटे यांनी घातलेला होता. त्याच्या शर्टाच्या खिशाला भारताचा झेंडा तिरंगाही होता. हनुवटीला आणि चेहऱ्याच्या खालच्या बाजूला मोठं रक्त लागल्याचंही दिसून आलं होतं. तसंच शर्टावरही रक्ताचे डाग लागल्याचं दिसून आलंय. या अपघातामुळे विनायक मेटे यांच्या निधनामुळे प्रचंड हळहळ व्यक्त केली जातेय.
पाहा फोटो :
#VinayakMete : विनायक मेटे यांना मृत्यूनं गाठलं! मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर अपघात, ठार! वयाच्या 52 व्या वर्षी निधन, राजकीय वर्तुळाला मोठा धक्का pic.twitter.com/C4YiSDsMju
विनायक मेटे हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढले होते. त्यांनी मोठा लढा मराठा आरक्षणासाठी उभा केला होता. दरम्यान, आता विनायक मेटे यांच्या झालेल्या अपघाती मृत्यूमुळे संपूर्ण मराठा समाजाच्या काळजाला चटका लागला असल्याची भावना व्यक्त केली जाते आहे.
विनायक मेटे यांच्या निधनावर चंद्रकात पाटील यांची प्रतिक्रिया :
अपघातानंतर विनायक मेटे यांना नवी मुंबईच्या कामोठा येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथं त्याच्यावर उपचार केले जाणार होते. पण सुरुवातीला आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार विनायक मेटे यांचं निधन झाल्याचं वृत्त समोर आलं. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाकडूनही याला अधिकृत दुजोरा देण्यात आलं. विनायक मेटे यांच्या हाताला, पायाला जबर मार लागल्याचं सांगण्यात आलं होतं.
मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर खोपोली इथल्या बातम बोगद्याजवळ विनायक मेटे यांच्या वाहनाचा अपघात झाला होता. या अपघातात विनायक मेटे यांच्यासह असलेले त्यांच्या सहकारीही जबर जखमी झाले होते. तर कारचा चक्काचूर झाला होता. पहाटे साडे पाच वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या अपघातानंतर लगेचच विनायक मेटे यांना रुग्णालयात आणण्यात आलं. कामोठ्यातील एमजीएम रुग्णालयातील क्रीटीकेअरमध्ये त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. पण तिथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.