भाजप यूपीत सपा-बसपावर भारी पडण्याची चिन्हं, पण महाराष्ट्रात जागा घटणार
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी मतदारांनी त्यांचा उमेदवार निश्चित केलाय. जानकारांच्या मते, यावेळीही सत्तेची चावी उत्तर प्रदेश जिंकणाऱ्या पक्षाच्याच हातात असेल. पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वी टाइम्स नाऊ आणि व्हीएमआरच्या ओपिनियन पोलमध्ये उत्तर प्रदेशात हैराण करणारे आकडे समोर आले आहेत. 543 जागांचा विचार करता एनडीएला 279, यूपीएला 149 आणि इतर पक्षांना 115 जागा मिळत आहेत. म्हणजेच एनडीए […]
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी मतदारांनी त्यांचा उमेदवार निश्चित केलाय. जानकारांच्या मते, यावेळीही सत्तेची चावी उत्तर प्रदेश जिंकणाऱ्या पक्षाच्याच हातात असेल. पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वी टाइम्स नाऊ आणि व्हीएमआरच्या ओपिनियन पोलमध्ये उत्तर प्रदेशात हैराण करणारे आकडे समोर आले आहेत. 543 जागांचा विचार करता एनडीएला 279, यूपीएला 149 आणि इतर पक्षांना 115 जागा मिळत आहेत. म्हणजेच एनडीए बहुमताचा आकडा गाठत आहे. कारण, इतर पक्ष आणि यूपीए मिळूनही बहुमताचा आकडा गाठू शकत नाहीत. 272 हा बहुमताचा आकडा आहे.
उत्तर प्रदेशात भाजपला मोठं नुकसान होणार आहे. पण सपा आणि बसपा यांच्या आघाडीपेक्षा दुप्पट जागा भाजपला मिळण्याचा अंदाज आहे. सर्व्हेनुसार, भाजपला 20 जागांचा तोटा होऊ शकतो. तर सपा-बसपा 27 आणि काँग्रेसला तीन जागा मिळू शकतात.
या सर्व्हेनुसार, काँग्रेसच्या मतांच्या आकडेवारीमध्येही वाढ झालेली पाहायला मिळते. तर भाजपला गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी जास्त मतं मिळतील. एकत्र लढणाऱ्या सपा आणि बसपाच्या मतांच्या टक्केवारीमध्ये घट होत आहे. व्हीएमआरच्या सर्व्हेनुसार, भाजपला 45.1 टक्के, सपा-बसपा 37.7 टक्के आणि काँग्रेसला 11.01 टक्के मतं दाखवण्यात आली आहे.
एनडीएने उत्तर प्रदेशात 2014 च्या निवडणुकीत 80 पैकी 73 जागांवर विजय मिळवला होता. या निवडणुकीत काँग्रेसला दोन आणि सपाला पाच जागा मिळाल्या होत्या. बसपाला 2014 च्या निवडणुकीत खातंही उघडता आलं नव्हतं. 2014 मध्ये भाजपला 43.3 टक्के लोकांनी मतदान केलं होतं. तर सपा-बसपा आणि आरएलडीला संयुक्तपणए 42.65 टक्के मतं मिळाली होती. काँग्रेसच्या वाट्याला 8.4 टक्के मतं होती.
महाराष्ट्रातलं चित्र काय?
2014 च्या निवडणुकीत महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीने 48 पैकी 42 जागा जिंकल्या होत्या. पण यावेळी चित्र बदलणार असल्याचं दिसतंय. व्हीएमआरच्या सर्व्हेनुसार, शिवसेना-भाजपच्या वाट्याला 38, तर काँग्रेस-राष्ट्रवादी 10 जागा जिंकणार असल्यां दिसतंय. म्हणजेच युतीच्या चार जागा कमी होत आहेत. विशेष म्हणजे युतीच्या मतांची टक्केवारीही 2014 च्या तुलनेत कमी झाली आहे. 2014 ला युतीला 51.3 टक्के मतं मिळाली होती. तर यावेळी 48.15 टक्के मतं मिळण्याचा अंदाज आहे. या सर्व्हेनुसार, वंचित बहुजन आघाडीला एकही जागा मिळताना दिसत नाही.
मोदींच्या गुजरातमध्येही नुकसान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं गृहराज्य गुजरातमध्ये भाजपने 2014 ला सर्वच्या सर्व 25 जागा जिंकल्या होत्या. पण या सर्व्हेनुसार, चार जागा कमी होताना दिसत आहेत. काँग्रेसच्या वाट्याला या चार जागा जात आहेत.
भाजपच्या जागा घटणार : सर्व्हे
पश्चिम बंगाल आणि ओदिशाचा अपवाद वगळता जवळपास प्रत्येक राज्यात भाजपच्या जागा कमी होणार आहेत. राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश, कर्नाटक, झारखंड, बिहार, पंजाब, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, दादरा नगर हवेली, गोवा, गुजरात, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू या राज्यांमध्ये भाजपच्या जागांमध्ये घट झाल्याचं चित्र आहे.
सर्व्हे कसा झाला?
देशभरातील 960 ठिकाणी 14,301 मतदारांची मतं जाणून घेण्यात आली.