उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यासाठी महाविकास आघाडीतील नेत्याचीच चाल, चंद्रकांत पाटलांचा दावा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chandrakant Patil on Uddhav Thackerays MLC) यांच्या विधानपरिषदेच्या नियुक्तीवरुन राजकीय वातावरण तापलं आहे.
पुणे : राज्यात कोरोनामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे. मात्र तिकडे राजकीय आखाडा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chandrakant Patil on Uddhav Thackerays MLC) यांच्या विधानपरिषदेच्या नियुक्तीवरुन तापला आहे. महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहे. त्यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नवीन राजकीय गुगली टाकली.
“उद्धवजींच्या विधानपरिषदेचा प्रस्ताव राज्यपालांकडे असून ते निर्णय घेतील. मात्र महाविकास आघाडीतील काहींना राज्यपालांनी हा प्रस्ताव मान्य करु नये, असं वाटतंय. उद्धवजींनी आमदार होऊ नये म्हणजे त्यांना राजीनामा द्यावा लागेल, असं काहींना वाटत आहे” असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला. ते पुण्यात टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.
‘महाविकास आघाडीचं राजकारण’
एक दिवसाचा राजीनामा देऊन पुन्हा त्यांना शपथ घेता येणार नाही. त्यानंतर मग ज्याच्यासाठी प्रयत्न चालू होते, त्यांना पुढे करता येईल, असं महाविकास आघाडीचं राजकारण सुरु आहे, असाही दावा चंद्रकांत पाटलांनी केला.
उद्धवजी मुख्यमंत्री कायम राहू होऊ नये, या वातावरणात आघाडीत कोण बैठका घेत आहे, दिल्लीत कोण बैठका घेत आहे, असं म्हणत त्यांनी महाविकास आघाडीकडे बोट दाखवलं.
“आघाडीमध्ये ताळमेळ नाही. राज्यपाल नियुक्त सदस्यचा ठराव करण्याचं कायदेशीर ज्ञान नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ठराव केला. मात्र ते घटनात्मक पद नसून ते राजकीय पद आहे. घटनेनुसार मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जो ठराव होतो तोच ठराव असतो”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
‘राज्यपाल कोट्यातून आमदार होऊ शकत नाहीत’
“राज्यपाल कोट्यातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आमदार होण्यास आमचा विरोध नाही (Chandrakant Patil on CM Uddhav Thackeray). त्याची घटनात्मक चर्चा व्हायची ती होईल. मात्र ते शक्यच नाही. घटनात्मकदृष्ट्या तसं होऊ शकत नाहीत”, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील काही दिवसापूर्वी म्हणाले होते.
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे अजून दोन महिने आहेत (Chandrakant Patil slams CM Uddhav Thackeray). राज्यपाल कोट्यातून आमदार होण्याचा ठराव मंत्रिमंडळाने मे किंवा जूनमध्ये केला असता तरी चालणार होते. आता कोरोनाविरुद्धची लढाई लढायचे सोडून हा ठराव करण्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक का बोलवावी लागली? आपण आमदार नाही म्हणून मुख्यमंत्री बेचैन आहेत का?”, असा खोचक सवालही चंद्रकांत पाटील यांनी विचारला होता.
(Chandrakant Patil on Uddhav Thackerays MLC)
संबंधित बातम्या
मुख्यमंत्री राज्यपाल कोट्यातून आमदार होऊच शकत नाही, चंद्रकांत पाटलांचं घटनेकडे बोट
आपण आमदार नाही म्हणून मुख्यमंत्री बेचैन आहेत का? : चंद्रकांत पाटलांचा सवाल
मुख्यमंत्रीपदाचा पेच सोडवण्यासाठी फडणवीस, चंद्रकांत दादांनी पुढाकार घ्यावा : संजय काकडे