Monsoon Session: अजित पवारांच्या प्रश्नावर तानाजी सावंत गडबडले! नेमकं काय घडलं?
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एक प्रश्न उपस्थित केला. पालघरमधल्या बालकांच्या हत्तीरोगावरुन त्यांनी सरकारला प्रश्न विचारला. लगोलग त्याचं उत्तर देणं आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना मिळालं नाही.
मुंबई : नवं सरकार सत्तेत आलंय. त्यानंतर आता पहिलंच अधिवेशन होतंय. ज्या परिस्थिती सरकार तयार झालं ते पाहता विरोधक सरकारला काट्यावर धरणार हे निश्चित होतं. त्यानुसारच सध्या अधिवेशन रंगताना दिसतंय. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी एक प्रश्न उपस्थित केला. पालघरमधल्या बालकांच्या हत्तीरोगावरुन त्यांनी सरकारला प्रश्न विचारला. लगोलग त्याचं उत्तर देणं आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना मिळालं नाही. पुढच्या तासाभरात उत्तर देतो, असं सावंत म्हणालेत. प्रश्न राखून ठेवावा, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. अखेर हा प्रश्न राखून ठेवण्यात आला. पण अजितदादांच्या प्रश्नाचं उत्तर देताना आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांची चांगलीच तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालं.
अजित पवार यांचा प्रश्न
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधिमंडळात एक प्रश्न उपस्थित केला.पालघरमधल्या बालकांच्या हत्तीरोगावरुन त्यांनी सरकारला प्रश्न विचारला. पालघरमधल्या बालकांच्या हत्तीरोगावरुन विरोधकांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना घेरलं. अजित पवार यांनी पालघरमध्ये किती जागा रिक्त आहेत?, असं विचारलं
सावंत यांची तारांबळ
अजित पवार यांनी प्रश्न विचारताच तानाजी सावंत यांची गडबड झाली.दादांच्या प्रश्नाचं लगोलग त्याच आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना उत्तर देता आलं नाही. आपण महत्वाचा प्रश्न उपस्थित केलाय. पण मी अधिक माहिती घेतो आणि तासाभरात त्याचं उत्तर देतो, असं सावंत म्हणाले. माहिती एक तासात मिळेल असं वाटतं नाही. जर तसं झालंच तर हा प्रश्न आपण सोमवारी सभागृहात मांडू, असंही सावंत म्हणाले आहेत.
अजितदादांचा प्रतिप्रश्न!
तासाभरात उत्तर देतो असं म्हटल्यावर विरोधक आक्रमक झाले. त्यांनी याच मुद्द्यावरून त्यांना कोंडीत पकडलं. आम्ही इतका महत्वाचा प्रश्न मांडला अन् आरोग्य मंत्र्यांना त्याचं उत्तर माहिती नसावं, असं म्हणत अजितदादांनी नाराजी व्यक्त केली आहे. मंत्र्यांना त्यांच्याच विभागातील प्रश्न माहित नसावेत का? असा प्रतिसवाल त्यांनी विचारला आहे.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी विधानसभेच्या कामकाजावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरल्याचं पाहायला मिळालं. आता आज दुसरा दिवस आहे. विविध मुद्द्यांवरून विरोधक सरकारला प्रश्न विचारत आहेत. असाच काहीसा प्रत्यय अजित पवार यांच्या या प्रश्नावरून येतोय.