आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सिंथेटिक ट्रॅकवर नेत्यांनी गाड्या घातल्या! माफी मागा, भाजप आमदाराची मागणी

| Updated on: Jun 28, 2021 | 11:30 PM

गाड्या थेट ट्रॅकवर उभ्या करण्यात आल्यामुळे क्रिडाप्रेमींमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. त्यावरुन भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे.

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सिंथेटिक ट्रॅकवर नेत्यांनी गाड्या घातल्या! माफी मागा, भाजप आमदाराची मागणी
भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे
Follow us on

पुणे : पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडी परिसरातील आंतरराष्ट्रीय क्रिडा विद्यापीठात कोट्यवधी रुपये खर्च करुन उभारण्यात आलेल्या सिंथेटिक ट्रॅकवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी थेट गाड्या घातल्या. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, क्रीडामंडी सुनील केदार, क्रिडा राज्यमंत्री अदिती तटकरे यांच्या गाड्यांचा समावेश होता. या गाड्या थेट ट्रॅकवर उभ्या करण्यात आल्यामुळे क्रिडाप्रेमींमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. त्यावरुन भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. (Leaders of Mahavikas Aghadi built cars on synthetic tracks of international Track Balewadi)

बालेवाडी परिसरात उभारण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिडा विद्यापीठाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी शरद पवार, सुनील केदार, अदिती तटकरे पोहोचले होते. त्यावेळी त्या मंत्र्यांचा ताफा थेट स्टेडियमच्या ट्रॅकवर उभ्या करण्यात आल्या होत्या. स्टेडियममधील क्रीडा अधिकाऱ्यांच्या चुकीच्या नियोजनामुळेच मंत्र्यांच्या गाड्या उभ्या करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. स्टेडियमवरील या संपूर्ण प्रकारामुळे क्रीडाप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

‘महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माफी मागावी’

या संपूर्ण प्रकारावर भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार टीका केलीय. खेळाडूंची उंची वाढवायचं सोडून त्यांची ऊर्जा कमी करण्यांच काम करत आहेत. क्रिडा मंत्र्यांनीही यावर हास्यास्पद स्पष्टीकरण दिलं जात आहे. या घटनेमुळं खेळाडूंच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माफी मागावी अशी मागणी आमदारांनी केली आहे.

क्रीडा आयुक्तांचं स्पष्टीकरण काय?

“सिमेंट ट्रॅकवर गाड्या पार्क करण्याची परवानगी देण्याचं कारण म्हणजे पवार साहेबांच्या पायाचा काहीतरी प्रॉब्लेम होता. त्यांना चालायला त्रास होऊ नये, म्हणून संमती देण्यात आली होती.” असं स्पष्टीकरण महाराष्ट्राचे क्रिडा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी दिलं आहे. दुर्दैवाने गाड्या रेसिंग ट्रॅकवर उभ्या केल्या गेल्या. त्याबद्दल आपण माफी मागतो. अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, असं आश्वासनही बकोरिया (Om Prakash Bakoria) यांनी ‘एएनआय’शी बोलताना दिलं.

केंद्रीय क्रीडा मंत्र्यांची नाराजी

केंद्रीय क्रीडा मंत्री किरन रिजिजू यांनीही नाराजी व्यक्त केली होती. देशात क्रीडा सुविधा कमी आहेत. सर्वच स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची देखभाल नीट करण्याची गरज आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं होतं.

संबंधित बातम्या :

Pune VVIP Car Park | शरद पवार साहेबांच्या पायाच्या त्रासामुळे गाड्या रेस ट्रॅकवर, क्रीडा आयुक्तांचं स्पष्टीकरण

Ambil Odha : बिल्डरवर कारवाई करा, अन्यथा पोलीस आयुक्तांविरोधात मानवी हक्क आयोगाकडे जाणार, प्रकाश आंबेडकरांचा इशारा

Leaders of Mahavikas Aghadi built cars on synthetic tracks of international Track Balewadi