Video Special Report | दसरा मेळाव्यातली नेत्यांपेक्षा जास्त गाजलेली भाषण
ठाकरे आणि शिंदेंपैकी कुणाचं भाषण चांगलं झालं, यावरुन सोशल मीडियात चर्चा होत आहे.
मुंबई : यंदा महाराष्ट्रात दोन दसरा मेळावे पार पडले. शिवाजी पार्कवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा पार पडला. तर, BCK मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळावा घेतला. ठाकरे आणि शिंदेंपैकी कुणाचं भाषण चांगलं झालं, यावरुन सोशल मीडियात चर्चा होत आहे. मात्र या दोन्ही नेत्यांच्या शिवाय इतर अनेक नेत्यांची भाषण चर्चेत राहिली आहेत.
शिवाजी पार्कवर शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांच्या भाषणाने दसरा मेळाव्याची सुरुवात झाली. तर, याच मेळाव्यातील शिवसेना सुषमा अंधारे यांचे भाषण लक्षवेधी ठरले. तर, भास्कर जाधव यांनीही अत्यंत विखारी भाषण केले.
शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात गुलाबराव पाटील यांची तोफ धडाडली. शहाजू बापू पाटील यांनी देखील आपल्या खास गावरान शैलीत भाषण केले.
दोन्ही गटाच्या नेत्यांनी एकमेकांच्या नकला करत टीकेची झोड उठवली. यामुळे या नेत्यांची भाषण चांगलीच गाजली आहेत आणि चर्चेत देखील आहेत.