“भाजपमध्ये गेलेल्या अनेकांचे आम्हाला फोन, राजकारणात बेरजेचं राजकारण महत्त्वाचं”
राजकारणात बेरजेचं राजकारण फार महत्त्वाचं आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी केलं (Jayant Patil on NCP rebellion Leaders).
सांगली : भाजपमध्ये गेलेल्या अनेक नेत्यांनी आम्हाला फोन करुन संपर्क केला आहे. महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी बेरजेचं राजकारण सुरु केलं. राजकारणात बेरजेचं राजकारण फार महत्त्वाचं आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी केलं (Jayant Patil on NCP rebellion Leaders). ते सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे बोलत होते. मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच इस्लामपूरमध्ये आलेल्या जयंत पाटील यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. तसेच जंगी मिरवणुकही काढण्यात आली (Jayant Patil on NCP rebellion Leaders).
जयंत पाटील म्हणाले, “देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच निवडणुकीनंतर इतकं मोठ राजकारण घडलं आहे. टीव्ही लावला की जनतेला सकाळी एक, दुपारी दुसरं आणि रात्री तिसरंच राजकारण बघायला मिळालं. पण जनतेचं मत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचं आणि काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी एकत्र येण्याचं होतं. त्यामुळे तशा राजकीय घडामोडी घडल्या.”
“2024 मध्ये राष्ट्रवादी हा राज्यातील एक नंबरचा पक्ष होईल”
राष्ट्रवादीचा 50 आमदारांचा आकडा पूर्ण केल्यावर आम्हाला सोबत घेतल्याशिवाय कोणीही सरकार स्थापन करु शकणार नव्हतं. त्याप्रमाणेच झालं. 2024 मध्ये राष्ट्रवादी हा राज्यातील एक नंबरचा पक्ष होईल, असा प्रयत्न करू, असंही जयंत पाटील यांनी सांगितलं.
“कर्जमाफीच्या आधी राज्याच्या तिजोरीची स्थिती बघावी लागणार”
सत्ता आल्यावर लगेच दुसऱ्याच दिवशी कर्जमाफी बाबत विचारणा होते आहे. मात्र या बाबत थोडा वेळ द्यावा लागेल. राज्याची तिजोरी स्थिती बघावी लागणार आहे, मात्र थोड्या दिवसात आम्ही योग्य निर्णय घेणारच आहे, अस ही यांनी सांगितलं.