महाराष्ट्र काँग्रेसची धुरा मामा-भाच्याच्या हातात

महाराष्ट्र काँग्रेसची संपूर्ण धुरा मामा-भाच्याच्या हातात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. ही मामा-भाच्याची जोडी आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला तारणार का? काँग्रेसला नवी उभारी देणार का? हा प्रश्न विचारला जात आहे.

महाराष्ट्र काँग्रेसची धुरा मामा-भाच्याच्या हातात
Follow us
| Updated on: Jul 13, 2019 | 11:51 PM

मुंबई: महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी काँग्रेस नेते आणि आमदार बाळासाहेब थोरात यांची वर्णी लागली आहे. विशेष म्हणजे बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजीत तांबे हे देखील राजकारणात सक्रीय असून ते महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्र काँग्रेसची संपूर्ण धुरा मामा-भाच्याच्या हातात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. ही मामा-भाच्याची जोडी आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला तारणार का? काँग्रेसला नवी उभारी देणार का? हा प्रश्न देखील या निमित्ताने विचारला जात आहे.

बाळासाहेब थोरात यांची महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड होण्याआधीपासून ते अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारणीवर (AICC) सदस्य म्हणूनही कार्यरत आहेत. बाळासाहेब थोरात हे अहमदनगर जिल्ह्यातील काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आहेत. थोरात हे गांधी कुटुंबीयांचे निष्ठावंत आणि निकटवर्तीयही मानले जातात. काही दिवसांपूर्वी संगमनेरमध्ये सभा घेतल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी थोरातांच्या निवासस्थानी मुक्कामही केला होता. शिवाय एकत्र प्रवास केला होता. तेव्हापासूनच लोकसभा निवडणुकीनंतर त्यांच्यावर विधानसभेपूर्वी प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देणार असल्याची चर्चा होती.

दरम्यान, बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे हे देखील राहुल गांधींच्या निकटवर्तीयांमधील मानले जातात. मागील काळात सत्यजीत तांबे यांनी महाराष्ट्र युवक काँग्रेसची जबाबदारी स्वीकारल्यापासून महाराष्ट्र पिंजून काढला आहे. वेळोवेळी केलेल्या आक्रमक आंदोलनांसाठीही ते ओळखले जातात.

देशपातळीवर तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल करत असताना महाराष्ट्राच्या पातळीवर सत्यजीत तांबे यांनी बाजू सांभाळली होती. सत्यजीत तांबे यांनी राहुल गांधींचे मुद्दे खेडोपाडी पोहोचवण्यासाठी ‘चलो पंचायत’ अभियान राबवले होते. या अंतर्गत त्यांनी राज्याच्या कानाकोपऱ्यातील तरुणांशी संवाद साधला होता.

राहुल गांधींचा नेमका कोणत्या घराणेशाहीला विरोध?

राहुल गांधी यांनी अनेकदा आपला घराणेशाहीला विरोध असल्याचे म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर त्यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत आग्रहीपणे राजीनामा दिला आणि त्यावर ठाम राहिले. हा निर्णय घेण्यामागे त्यांचा काँग्रेसवरील घराणेशाहीचा डाग पुसण्याचा प्रयत्न असल्याचेही बोलले गेले. मात्र, केंद्रातील घराणेशाही नाकारल्याचे दाखवत असतानाच राज्यात मात्र, एकाच कुटुंबात काँग्रेसची मोठी आणि महत्त्वाची पदे दिल्याने राहुल गांधींचा नेमका कोणत्या घराणेशाहीला विरोध आहे, असाही प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.