अपयशाची जबाबदारी घेणं हे नेतृत्त्वाने शिकलं पाहिजे : नितीन गडकरी
पुणे : कोणत्याही विषयावर बिनधास्त बोलणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यश आणि अपयशावर पुन्हा एकदा मनमोकळेपणाने भाष्य केलंय. यशाचे अनेक दावेदार असतात, पण अपयशाची जबाबदारी घेणं हे नेतृत्त्वाने शिकलं पाहिजे, असं मत गडकरी यांनी व्यक्त केलं आहे. पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात गडकरी बोलते होते. “हा देश विचित्र आहे. कुठलंही […]
पुणे : कोणत्याही विषयावर बिनधास्त बोलणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यश आणि अपयशावर पुन्हा एकदा मनमोकळेपणाने भाष्य केलंय. यशाचे अनेक दावेदार असतात, पण अपयशाची जबाबदारी घेणं हे नेतृत्त्वाने शिकलं पाहिजे, असं मत गडकरी यांनी व्यक्त केलं आहे.
पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात गडकरी बोलते होते.
“हा देश विचित्र आहे. कुठलंही काम करायचं असेल तर कामं बंद केली जातात. अपयशाची जबाबदारी घ्यायला नेतृत्वाने शिकलं पाहिजे. यशाचे बाप अनेक असतात, पण अपयश अनाथ असतो. अपयश आल्यावर कमिटी बसते, तर विजयावर आनंद व्यक्त केला जातो. मात्र अपयशाची जबाबदारी घ्यायला नेतृत्वाने शिकलं पाहिजे, असं सूचक विधान केंद्रीय रस्ते आणि वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केलं. साखर कारखान्यांना कर्ज देऊ नका, अंसही आवाहन त्यांनी केलं.
चांगले काम करणाऱ्याच्या पाठीशी सरकारने उभं राहिलं पाहिजे, मग तो कुठल्याही पक्षाचा असो. वाईट काम करणारा आपला जरी असला तरी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. काँग्रेस सत्तेत असताना भाजपच्या संस्थांवर कारवाई केली जाते, भाजप सत्तेत आल्यावर काँग्रेसच्या संस्थांवर कारवाई केली जाते, हे थांबवलं पाहिजे, असं गडकरी म्हणाले.
गडकरी यांचं विधान सूचक आहे. भाजपने नुकताच तीन राज्यांमध्ये सपाटून मार खाल्लाय. एरवी विजयानंतर पत्रकार परिषदा घेऊन जनतेचे आभार माननारे भाजपाध्यक्ष अमित शाह पराभवानंतर गायब झाले होते. गडकरी यांचा निशाणा कुणावर माहित नसलं तरी वेळ मात्र अचूक साधली आहे.
दरम्यान, या कार्यक्रमात राज्य सहकारी बँकेचे प्रशासकीय अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सहकार क्षेत्रातील योगदानबद्दल शिलाताई काळे यांना जीवनगौरव देऊन सन्मान करण्यात आला. सहकारमंत्री सुभाष देशमुख, शिखर बँकेचे प्रशासकीय अध्यक्ष विद्याधर अनास्कर तसेच सहकारी बँकिंग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.