डावी-उजवी विचारधारा म्हणजे काय रे भाऊ? या विचारधारा आल्या कशा? जनक कोण?

मुंबईः काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेची बैठकव्यवस्था बदलणार असे जाहीर केले आणि त्याचप्रमाणे संसदेतील बैठक व्यवस्था करण्यात आली. नरेंद्र मोदी यांनी अशी सूचना दिली की, प्रश्न उत्तराचा काळ असेल तेव्हा सत्तापक्षातील जो नेता प्रश्नाचे उत्तर देईल ते आपल्या जागेवरच बसेल आणि उत्तर देईल. पंतप्रधान (Prime Minister) नरेंद्र मोदी यांच्या या घटनेमध्ये त्या जुन्या […]

डावी-उजवी विचारधारा म्हणजे काय रे भाऊ? या विचारधारा आल्या कशा? जनक कोण?
left right
Follow us
| Updated on: Feb 05, 2022 | 8:27 AM

मुंबईः काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेची बैठकव्यवस्था बदलणार असे जाहीर केले आणि त्याचप्रमाणे संसदेतील बैठक व्यवस्था करण्यात आली. नरेंद्र मोदी यांनी अशी सूचना दिली की, प्रश्न उत्तराचा काळ असेल तेव्हा सत्तापक्षातील जो नेता प्रश्नाचे उत्तर देईल ते आपल्या जागेवरच बसेल आणि उत्तर देईल. पंतप्रधान (Prime Minister) नरेंद्र मोदी यांच्या या घटनेमध्ये त्या जुन्या काळातील डावी विचारसरणी आणि उजवी विचारसरणी (Left-Right thinking) या घटनेचा आणि आताच्या या घटनेचा तसा थेट संबंध नाही. , या निमित्ताने आपल्याला इतकी माहिती मिळते की, भारतीय संसदेत सत्ताधारी पक्ष सभापतींच्या उजवीकडे आणि विरोधी पक्ष डावीकडे बसतो. ही घटना मुख्यत्वेकरून त्या घटनेने प्रेरित आहे ज्यानी आधुनिक लोकशाही सुरू केली, ज्याला आपण फ्रेंच क्रांती (French Revolution) म्हणून ओळखतो त्या घटनेमुळे.

1979 मध्ये फ्रान्सच्या राष्ट्रीय संसद दोन विभागात विभागली गेली. त्यामध्ये एक गट लोकशाही व्यवस्थेची मागणी करत होता तर दुसरा गट राजेशाहीचे समर्थन करत होता. या मागणीने ज्यावेळी आंदोलनाची तयारी केली त्यावेळी तत्कालीन सम्राट असलेल्या सोळाव्या लुईने राष्ट्रीय सभेची बैठक बोलवली. लुईच्या या सभेला फ्रान्समध्ये राहणाऱ्या समाजातील प्रत्येक घटकातील एक प्रतिनिधी उपस्थित होता.

…आणि राजकीय विचारधारेची विभागणी झाली

या बैठकीत सम्राटाच्या समर्थकांना सम्राटाच्या उजव्या बाजूला आणि क्रांतीच्या समर्थकांना डावी बाजूला बसण्यास सांगितले. त्यामुळे राजकीय विचारधारेच्या औपचारिक विभागणीची सुरुवात लुईच्या या बैठकव्यवस्थेपासूनच झाली असे मानले जाते. त्यावेळी राजेशाहीचे समर्थन करणाऱ्यांना उजवी विचारसरणी आणि राजेशाहीला विरोध करणाऱ्या वर्गाला डाव्या विचारसरणीचे मानले जावू लागले.

डावी आणि उजवी विचारसरणी

फ्रेंचमधील राष्ट्रीय सभेमध्ये डाव्या उजव्या बाजूला बसणारे लोक श्रीमंत, व्यावसायिक आणि धार्मिक होते, तर डाव्या बाजूला बसणारे लोक सामान्य नागरिक होते. यावेळी सम्राटाच्या उजव्या बाजूला बसलेले होते ते म्हणजेच उजव्या विचारसरणीचे लोक होते, ते राजेशाही आणि प्रस्थापित सामाजिक-आर्थिक परंपरांचे पुरस्कर्ते होते. उजव्या विचारसरणीचे लोक आपली संपत्ती आणि प्रतिष्ठा सोडायला तयार नव्हते. तसेच सम्राटाच्या डाव्या बाजूला बसलेले म्हणजे डाव्या विचारसरणीचे लोक सामाजिक समानता आणि नागरिकांचे हक्क त्यांचे त्यांना बहाल करण्याची मागणी करत होते. या कारणामुळेच डाव्या विचारसरणीच्या लोकांना समाजवादी म्हटले जाते.

उजव्या विचारसरणीचा या बदलांना विरोध असल्याने नंतर त्यांना पारंपरिक विचारसरणीचे आणि बदलाच्या समर्थकांना डावे पुरोगामी म्हटले गेले.

फान्सची विचारसरणी जगभर पोहचली

काळाबरोबर ही डावी, उजवी ही विचारसरणी फ्रान्सच्या बाहेर पडून जगातील अनेक देशात पोहचली. मात्र प्रत्येक देशातील डाव्या उजव्या विचारसरणीची संकल्पना वेगवेगळी आहे. डाव्या उजव्या विचारसरणीची संकल्पना व्यापकपणे सांगायची झाली तर, हे वर्गीकरण भांडवलशाही व्यवस्थेतील बदलांना संघटना किंवा राजकीय पक्ष किती प्रमाणात समर्थन करते यावर आधारित आहे. हिच डावी-उजवी संकल्पना युरोपमध्ये कार्ल मार्क्स आणि फ्रेडरिक एन्जेल्ससारख्या विचारवंत लेखकांनी विचारधारा आणि सिद्धांताच्या आधारे ही संकल्पना स्पष्ट करून सांगितली. कार्ल्स मार्क आणि एन्जेल्सने या दोघांनी जेव्हा कम्युनिस्टांचा जाहिरनामा प्रसिद्ध केला तेव्हा भांडवलशाहीच्या उणिवा सांगून त्यांनी सगळ्या जगातील कामगारांना त्याविरुद्ध एकजूट होण्याचे आवाहन केले, त्यामुळेच डाव्यांना पुन्हा कम्युनिस्ट म्हटले जाऊ लागले.

आज डावे उदारमतवादी, समानता, धर्मनिरपेक्षता तर उजव्या विचारसरणीचे लोक अधिकार, व्यक्तिवाद आणि धार्मिक कट्टरतेचे समर्थन करतात. मात्र, शेवटी हा वाद सामाजिक समता आणि विषमतेचा आहे.

संबंधित बातम्या

Mega Block | ठाणे-दिवा नव्या मार्गिकेच्या कामासाठी आज मध्यरात्रीपासून 72 तासांचा मेगाब्लॉक, 350 लोकल रद्द

मोठी बातमी! 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटातील मोस्ट वाँटेड आरोपी अबू बकरला यूएईतून अटक

Video | हा पिक्चरचा सीन नाही, पण पिक्चरच्या सीनपेक्षा कमीही नाही! कांदिवलीत प्लॅटफॉर्मवरच चोर-पोलिसाचा थरार

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.