अजित पवार राष्ट्रवादीत नाराज? पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण, म्हणाले…
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार राष्ट्रवादीत नाराज असल्याची चर्चा होती. त्यावर आता अजित पवार यांनी उत्तर दिलंय.
मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) राष्ट्रवादीत नाराज असल्याची चर्चा होती. काल राष्ट्रवादीचं राष्ट्रीय अधिवेशन (NCP)काल पार पडलं. यात अजित पवार बोलले नाहीत. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा होती. त्यावर आता अजित पवार यांनी उत्तर दिलंय. मी नाराज नाही, असं म्हणत त्यांनी चर्चांना पूर्णविराम दिलाय. “कुणीही बोलू नका असं मला सांगितलं नव्हतं. तर तिथं वरिष्ठ नेते होते. त्यामुळे मी बोललो नाही. मी स्वत:हून बोलणं टाळलं”, असंही अजित पवार म्हणाले. अजितदादांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.