सदाभाऊ खोत विधानपरिषदेचा अर्ज मागे घेणार, विश्वसनीय सूत्रांची माहिती

सदाभाऊ खोत विधानपरिषदेचा अर्ज मागे घेणार असल्याची माहिती आहे. विश्वसनीय सूत्रांकडून ही माहिती मिळतेय

सदाभाऊ खोत विधानपरिषदेचा अर्ज मागे घेणार, विश्वसनीय सूत्रांची माहिती
Follow us
| Updated on: Jun 12, 2022 | 11:33 AM

मुंबई : सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) विधानपरिषदेचा अर्ज मागे घेणार असल्याची माहिती आहे. विश्वसनीय सूत्रांकडून ही माहिती मिळतेय. उमा खापरे यांचा उमेदवारी अर्ज कायम राहिला तर सदाभाऊ आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याची माहिती मिळतेय. आज विधानपरिषदेच्या 6 व्या जागेसंदर्भात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) आज घेणार निर्णय आहेत. जर पक्षाकडून उमेदवारी कायम ठेवली तर अपक्ष म्हणून सदाभाऊ माघार घेणार आहेत. आज देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज निर्णय होणार आहे. विश्वसनीय सूत्रांनी टीव्ही 9 मराठीला ही माहिती दिली आहे.

सदाभाऊ खोत अर्ज मागे का घेणार?

सदाभाऊ खोत विधान परिषदेचा उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याची माहिती आहे. सध्या भाजपचे पाच अधिकृत उमेदवार रिंगणात आहेत. भाजपचं संख्याबळ पाहता पाच उमेदवार निवडून आणतानाच त्यांना कसरत करावी लागणार आहे. अश्यात जर सदाभाऊंना अपक्ष उमेदवारी देऊन त्यांना भाजपने पाठिंबा दिला तर त्यांच्यासाठी ही तारेवरची कसरत असेल. त्यामुळे रिस्क न घेण्याच्या उद्देशाने सदाभाऊ आपला अर्ज मागे घेण्याची शक्यता आहे.

जर या परिस्थितीत भाजपच्या एका अधिकृत उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला तर सदाभाऊंचा मार्ग सोपा होऊ शकतो. उमा खापरे अर्ज मागे घेतील असं बोललं जातंय. याच सगळ्या संदर्भात देवेंद्र फडणवीस आज निर्णय घेणार आहेत. फडणवीसींच्या निर्णयानंतर सदाभाऊंचं राजकीय भवितव्य ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा

राज्यसभेपोठोपाठ सध्या विधानपरिषद निवडणुकीचं वारं वाहतंय. 8 जूनला भाजपने आपल्या विधानपरिषदेच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात प्रवीण दरेकरांसह प्रसाद लाड, उमा खापरे, श्रीकांत भारतीय, राम शिंदे यांची उमेदवारी जाहीर केली. पण यात पंकजा मुंडेंना डावलण्यात आलं. तर उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्यावेळी सदाभाऊ खोत यांना भाजपने पाठिंबा दिला. मध्यंतरीच्या काळात सदाभाऊ खोत यांनी आणि गोपीचंद पडळकरांनी बरीच आंदोलनं केली. एसटी संपाच्या वेळीही त्यांनी आझाद मैदानावर जात संपाला पाठिंबा दिला होता. त्याचंच हे फळ असल्याचं बोललं जातंय.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.