पुण्यात 50 टक्क्यांपेक्षाही कमी मतदान, विधानसभा मतदारसंघनिहाय आकडेवारी
पुणे : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान 23 एप्रिलला पार पडलं. यात महाराष्ट्रात सर्वात कमी 50 टक्के मतदानाची नोंद पुण्यात झाली. विशेष म्हणजे 2014 मध्ये पुण्यात 54.14 टक्के मतदानाची नोंद झाली होती. पुणे जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा क्षेत्रांच्या मतदानाची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली. या आकडेवारीनुसार, पुण्यातील विधानसभा मतदारसंघात केवळ 49.84 टक्के मतदान झाले आहे. […]
पुणे : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान 23 एप्रिलला पार पडलं. यात महाराष्ट्रात सर्वात कमी 50 टक्के मतदानाची नोंद पुण्यात झाली. विशेष म्हणजे 2014 मध्ये पुण्यात 54.14 टक्के मतदानाची नोंद झाली होती. पुणे जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा क्षेत्रांच्या मतदानाची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली. या आकडेवारीनुसार, पुण्यातील विधानसभा मतदारसंघात केवळ 49.84 टक्के मतदान झाले आहे.
पुणे जिल्ह्यात मावळ, पुणे, बारामती, शिरुर हे चार लोकसभा मतदारसंघ आहेत. या प्रत्येक लोकसभा मतदारसंघात प्रत्येकी सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. पुणे लोकसभा मतदारसंघात वडगाव शेरी, शिवाजीनगर, कोथरुड, पर्वती, पुणे कंन्टोमेंट, कसबा हे सहा मतदारसंघ आहेत.
पुण्यातील विधानसभानिहाय मतदानाची आकडेवारी नुकतीच जाहीर करण्यात आली. यात वडगाव शेरी – 46.41 टक्के , शिवाजीनगर – 46.94 टक्के , पुणे कॅन्टोमेंट – 48.79, पर्वती – 52.07 टक्के , कोथरुड – 50.26 टक्के, कसबा – 55.88 टक्के मतदान झाले. पुणे लोकसभा मतदारसंघात एकूण 20 लाख 75 हजार 39 मतदार आहेत. त्यातील केवळ 10 लाख 34 हजार 154 मतदारांनीच मतदानाचा हक्क बजावला.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात पुण्यात अत्यंत कमी मतदान पाहायला मिळाले. मतदान सुरु झाल्यापासून पुणे लोकसभा मतदारसंघात अत्यंत धीम्या गतीने मतदान सुरु होते. काल संध्याकाळी पाचपर्यंत पुण्यात केवळ 44 टक्के मतदानाची नोंद झाली होती.
2014 मध्ये पुण्यात 54.14 टक्के मतदानाची नोंद झाली होती. त्या तुलनेत यंदा पुण्यात कमी मतदान झाल्याचं पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे स्पष्ट करण्यात आले.
पुणे लोकसभा निवडणूक
दरम्यान पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपकडून गिरीश बापट, तर काँग्रेसकडून मोहन जोशी रिंगणात आहेत. या दोघांमध्ये कोण बाजी मारतं ते 23 मेला निकालावेळी स्पष्ट होईल.