Video: अमृता फडणवीसांचा आणखी एक व्हीडिओ, म्हणाल्या….

अमृता फडणवीस यांनी एक खास व्हिडीओ शेअर करत महिला दिनाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. (‘Let Women Fulfill Their Desires’, Amruta Fadnavis shares a video on the occasion of Women's Day)

Video: अमृता फडणवीसांचा आणखी एक व्हीडिओ, म्हणाल्या....
Follow us
| Updated on: Mar 07, 2021 | 2:34 PM

मुंबई : सध्या सर्वत्र महिला दिनाची लगबग सुरू आहे. 8 मार्चला जागतिक महिला दिवस साजरा केला जातो. या निमित्त का होईना आपल्या जवळच्या महिलांचा आदर सन्मान केला जातो. समाजात स्त्रीचं एक वेगळं महत्व आहे ते पटवून देणारा हा दिवस असतो. (‘Let Women Fulfill Their Desires’, Amruta Fadnavis shares a video on the occasion of Women’s Day)

महिला दिनानिमित्त अमृता फडणवीस यांनी शेअर केला व्हिडीओ

कधी गाणी, कधी राजकारण तर कधी लूक्समुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एक खास व्हिडीओ शेअर करत महिला दिनाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. अगदी टापटीप आणि मराठमोळ्या अंदाजात साज करुन त्यांनी हा व्हिडीओ रेकॉर्ड करत सोशल मीडियावर शेअर केला आहे.

वाचा काय म्हणाल्या अमृता फडणवीस

‘दरवर्षीच महिला दिन साजरा केला जातो. या दिवसाला प्रत्येक व्यक्तीच्या मनात स्त्रीविषयी एक वेगळी आत्मियता निर्माण होते आणि यावर्षीदेखील असं होणार. मात्र मला एक महत्त्वाचं बोलायचं आहे. महाराष्ट्रात आज स्त्री सुरक्षितता, स्त्री सशक्तीकरण आणि स्त्री प्रगती याबाबतीत खूप काही बोललं जातं आहे. पण एकीकडे असं होत असताना दुसरीकडे मात्र स्त्रीवरील अत्याचार वाढताना दिसत आहेत. स्त्रीयांवर होणारे बलात्कार, घाण प्रकारे होणारी ट्रोलिंग, स्त्रीयांच्या होत असलेल्या आत्महत्त्या हे प्रचंड वाढलं आहे.’

पुढे त्या म्हणाल्या, ‘मला हेच सांगायचं आहे की, स्त्रीयांच्याबाबतीत तुम्ही जे बोलता, त्यांच्याशी कसे वागता याकडे तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे. आता पुरोगामी महाराष्ट्रात काही बदल घडवून आणायचा असेल तर तो तुम्हीच घडवून आणू शकता. स्त्रीला तिच्या इच्छा पूर्ण करायच्या असतील तर तुम्ही तिचा साथ द्या, त्यांना मागे ओढू नका… तुम्हाला महिला दिनाच्या शुभेच्छा… ’

मिस्टर फडणवीस नेहमीच अमृता यांच्या पाठीशी

एका मुलाखती दरम्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते अमृता फडणवीस यांच्या प्रत्येक निर्णयात साथ देतात असं सांगितलं होतं. ‘तिला गाणी गायला आवडतात आणि मी तिला तिचे निर्णय घेण्याची मुभा देतो. ट्रोलिंग काय होत राहणार..’ अशा शब्दात त्यांनी अमृता फडणवीस यांना साथ दिली होती.

संबंधित बातम्या

आजी-आजोबा गाणं गात भिक्षा मागायचे, पहिल्याच स्टेज परफॉर्मन्सवेळी ड्रेस नव्हता; वाचा, आनंद शिंदेंची फिनिक्स भरारी!

Happy Birthday Anupam Kher : अनेक आव्हानं आणि समस्यांवर मात, वाचा अभिनेते अनुपम खेर यांच्या आयुष्यातील संघर्ष

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.