मुख्यमंत्र्यांचा सन्मान वाढवूया, भाजपला खड्यासारखे बाजूला करुया, शरद पवारांचा निर्धार
महाराष्ट्रात आघाडीचे सरकार आहे. कुणीही काही म्हटले तरी सामंजस्यपणाने सरकार चालविले जात आहे. दिल्लीवरुन या सरकारला रोज त्रास दिला जात आहे. अनेक गोष्टींवरुन त्रास दिला जातो, असं शरद पवार म्हणाले.
सोलापूर : येत्या स्थानिक संस्थांच्या निवडणुकांत भाजपला खड्यासारखे बाजूला करुया, असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. ते सोलापुरात कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. “हे सरकार टिकवायचे आहे. मुख्यमंत्र्यांचा सन्मान वाढवायचा आहे. हे राज्य चुकीच्या हातात द्यायचं नाही. त्यांचा (भाजपचा) अनुभव चांगला नाही. या देशातील 60 टक्के पेक्षा लोक काळ्या मातीचे इमान राखतो. शेतकऱ्याचे हिताचे समर्थन आहे, त्याला आपली साथ आहे. शेतीमालाच्या किमतीसंबधी दिल्लीच्या बॉर्डरवर एक वर्ष आंदोलन आहे. शेतकरी रस्त्यावर घरदार सोडून बसलाय. एक वर्षांपासून आंदोलन मात्र कुणी ढुंकून पाहत नाही, असा हल्लाबोल शरद पवारांनी केला.
केंद्राकडून राज्याला रोजचा त्रास
महाराष्ट्रात आघाडीचे सरकार आहे. कुणीही काही म्हटले तरी सामंजस्यपणाने सरकार चालविले जात आहे. दिल्लीवरुन या सरकारला रोज त्रास दिला जात आहे. अनेक गोष्टींवरुन त्रास दिला जातो. केंद्र सरकार इकडचा कर गोळा करते, मात्र राज्याचा वाटा केंद्र सरकार देत नाही. आज देऊ, उद्या देऊ असं केलं जात आहे, असं शरद पवार म्हणाले.
अतिवृष्टीचे पैसे द्यायला इकडे पैसे नाहीत. मात्र केंद्र सरकार पैसे आज देतो, उद्या देतो करते. मी मंत्री असताना गुजरातमध्ये निधी देऊ नका, असे म्हणत होते. मी मात्र देश चालवायचे आहे,संकुचितपण न ठेवता मदत केली. गुजरातमध्ये मी पक्ष बघितला नाही, तिथल्या लोकांशी बांधिलकी ठेवली. इथे मात्र राज्यात परिस्थिती वेगळी आहे. येत्या स्थानिक संस्था मध्ये भाजपला खड्यासारखे बाजूला करूया, असा निर्धार शरद पवारांनी केला.
ऊस घातला की साखर तयार झाली असं होत नाही
शरद पवारांनी काय केले असा प्रश्न एकाने केला. मी साखर कारखानदार नाही. तुमचे मत असेल तर मी त्यासाठी आग्रह धरेन. एकरकमी रक्कम द्या असा एक शब्द निघालाय. ऊस गेला की रक्कम द्या असं म्हणतात. ऊस घातला की साखर तयार झाली आणि ती विकली जाते असे होत नाही. कारखान्यात वर्षानुवर्षे साखर पडून राहते. गुजरातमध्ये पहिला, दुसरा, तिसरा हप्ता केल्यामुळे शेतकऱ्यांना फायद्याचा. एक रकमीमध्ये शेतकऱ्याचे हीत किती आहे हे पहिले पाहिजे 12 हजार कोटींचा दंड साखर कारखान्यांना भरायला पाहिजे, असं शरद पवार म्हणाले.
VIDEO: शरद पवार यांचं भाषण
संबंधित बातम्या
माझ्या ‘त्या’ विधानामुळे अजित पवारांवर IT छापे, शरद पवारांचा सोलापुरात दावा
जे आम्हाला सोडून गेले, त्यांची जनतेने सुट्टी केली; शरद पवारांचा पक्षांतर करणाऱ्यांना टोला