सुनील तटकरेंना जीवे मारण्याची धमकी, पत्रात नगरमधील व्यक्तीचं नाव

रायगड : राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगडचे उमेदवार सुनील तटकरे यांना एका निनावी पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी आली आहे. विशेष म्हणजे धमकी देणाऱ्याच्या घराच्या पत्त्यासह माहिती पत्रात नमूद करण्यात आली आहे. शिरूर येथील पोस्ट ऑफिसमधून सुनील तटकरेंच्या नावाने एक पत्र म्हसळा पोस्ट ऑफिसमध्ये आलं. पत्रावर राष्ट्रवादी कार्यालय म्हसळा येथील पत्ता असल्याने हे पत्र राष्ट्रवादीच्या म्हसळा कार्यालयात पोस्ट […]

सुनील तटकरेंना जीवे मारण्याची धमकी, पत्रात नगरमधील व्यक्तीचं नाव
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:14 PM

रायगड : राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगडचे उमेदवार सुनील तटकरे यांना एका निनावी पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी आली आहे. विशेष म्हणजे धमकी देणाऱ्याच्या घराच्या पत्त्यासह माहिती पत्रात नमूद करण्यात आली आहे. शिरूर येथील पोस्ट ऑफिसमधून सुनील तटकरेंच्या नावाने एक पत्र म्हसळा पोस्ट ऑफिसमध्ये आलं. पत्रावर राष्ट्रवादी कार्यालय म्हसळा येथील पत्ता असल्याने हे पत्र राष्ट्रवादीच्या म्हसळा कार्यालयात पोस्ट करण्यात आलं. राष्ट्रवादी अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष नाजीम हासवारे यांनी हे पत्र उघडून पाहिल्यानंतर उपस्थितांना धक्काच बसला.

पत्रामध्ये धमकी देणाऱ्याच्या नावाचा आणि पत्त्याचाही उल्लेख आहे. अहमदनगर जिल्ह्यातील वडगाव तांदळी या गावातील सातपुते बाळासाहेब भाऊसाहेब ही व्यक्ती गुन्हेगार प्रवृत्तीची असून पूर्ववैमन्यसातून काही लोकांच्या मदतीने सुनील तटकरेंना ठार मारणार असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. सुनील तटकरे हे आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी, शेकाप आणि काँग्रेस आघाडीतर्फे रायगड-रत्नागिरी मतदारसंघाचे उमेद्वार असल्याने या निनावी पत्राकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.

या प्रकरणी सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरुण म्हसळा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष समीर बनकर यांनी म्हसळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सुनील तटकरे यांना आलेल्या धमकीचे गांभीर्य लक्षात घेत म्हसळा पोलिसांनी त्वरीत एक टीम तयार करुन पत्रात नमूद केलेल्या ठिकाणी रवाना केली आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.