Mumbai : मोठी बातमी, किरीट सोमय्यांप्रमाणे त्यांचे पुत्र नील सोमय्यांनाही कोर्टाचा दिलासा
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्याप्रमाणे आता त्यांचे पुत्र नील सोमय्या यांनाही उच्च न्यायालयाचा दिलासा मिळाला आहे. आयएनएस विक्रांत मदतनिधी घोटाळा प्रकरणात तूर्तास कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश न्यायालयानने मुंबई पोलीसांना आदेश आहेत.
मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या (Bjp Kirit Somaiya) यांच्याप्रमाणे आता त्यांचे पुत्र नील सोमय्या (Neel Somaiya) यांनाही उच्च न्यायालयाचा (Bombay High Court) दिलासा मिळाला आहे. आयएनएस विक्रांत मदतनिधी घोटाळा प्रकरणात तूर्तास कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश न्यायालयानने मुंबई पोलीसांना आदेश आहेत. पोलीस चौकशीला हजर राहत तपासांत सहकार्य करण्याचे नील सोमय्यांना न्यायालयाकडून निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, अटक झाल्यास 50 हजारांच्या जामीनावर सुटका करण्याचे निर्देशही त्याचवेळी न्यायालयाने दिले आहेत. एप्रिल 25 ते 28 दरम्यान सकाळी 11 ते दुपारी 2 वाजता तपास अधिकाऱ्यांपुढे चौकशीला निल सोमय्यांना हजर रहावे लागणार आहे.
नील सोमय्यांनाही कोर्टाचा दिलासा
Bombay High Court grants anticipatory bail to Neil Somaiya, son of BJP leader Kirit Somaiya, in the INS Vikrant corruption case.
— ANI (@ANI) April 20, 2022
नेमकं प्रकरण काय?
खासदार संजय राऊत यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली होती. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यावेळी किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्यांचा मुद्दा पुढं आणला होता. नील सोमय्या आणि पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी राकेश वाधवान यांचे संबंध असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्यानंतर नील सोमय्या यांनी अटकपूर्व जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. नील सोमय्यांवर आरोप केल्यानंतर त्या प्रकरणाची कागदपत्रं मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे देणार असल्याचं राऊत यांनी म्हटलं होतं. “बाप बेटे जेल जाएंगे”, संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत केलेल्या आरोपांनंतर नील सोमय्या यांनी अटक टाळण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. ‘निकॉन इन्फ्रा’ च्या माध्यमातून अनेक ठिकाणी जमिनी बाजारभावापेक्षा कमी दरात मिळवल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता.
काय आहे नेमका आरोप?
2013-14 साली भारतीय संरक्षण खात्याची आयएनएस विक्रांत हे जहाज भंगारात काढले जाणार होते. त्यावेळी त्यात संऱक्षण खात्याचे संग्रहालय व्हावे, अशी मागणी पुढे आली. हे संग्रहालय उभे करण्यासाठी राज्य सरकारला 200 कोटी रुपये उभे करून देण्यासाठी किरीट सोमय्या यांनी जनतेकडून निधी जमा केला. त्या वेळी जवळपास 57 कोटी रुपये जमा झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र ही रक्कम अद्याप राज्य सरकारकडे जमा झालेली नाही, असा आरोप संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर केला आहे. त्यावेळी लाखो मुंबईकरांनी देशभावनेपोटी सढळ हाताने दान केले. हा लोकभावनेशी, देशभावनेशी खेळ असल्याचा आरोप करत किरीट सोमय्या यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली.
इतर बातम्या
Nashik Water Storage: नाशिकमध्ये झळा तीव्र; जिल्ह्यात फक्त 76 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा
Skin | घामामुळे त्वचेची चमक नाहीशी झाली आहे? मग हे खास फेसपॅक त्वचेला लावा आणि रिझल्ट पाहा!
Belgaon Rain : बेळगावात अवकाळी पावसाचा तडाखा, अंगावर झाड कोसळून एकाचा मृत्यू