PHOTO : रामच नाही तर रावणासह रामायण आणि महाभारतातील ‘या’ पात्रांचाही भाजप प्रवेश

रामायणात रावणाची भूमिका करणाऱ्या अभिनेत्यापासून अगदी महाभारतातील कलाकारांनीही भाजप प्रवेश केलेला आहे.

PHOTO : रामच नाही तर रावणासह रामायण आणि महाभारतातील 'या' पात्रांचाही भाजप प्रवेश
लंकेपासून कित्येक किलोमीटर दूर अयोध्येला 20 दिवसात कसे पोहोचले प्रभू राम
Follow us
| Updated on: Mar 19, 2021 | 7:34 PM

नवी दिल्ली : दुरदर्शनवर1987 मध्ये प्रसारित होणारी रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेत भगवान राम यांची भूमिका करणाऱ्या अरुण गोविल यांनी नुकताच (18 मार्च) भाजपमध्ये प्रवेश केलाय. पश्चिम बंगालसह 5 राज्यांमधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेला त्यांचा हा प्रवेश महत्त्वाचा मानला जातोय. त्यामुळे बंगालमध्ये भाजप ‘जय श्रीराम’च्या घोषणेसह ममता बॅनर्जींच्या दुर्गेचा सामना करणार आहे. असं असलं तरी रामायणातील हे पहिलं पात्र नाही ज्याने भाजपमध्ये प्रवेश केलाय. रामायणात रावणाची भूमिका करणाऱ्या अभिनेत्यापासून अगदी महाभारतातील कलाकारांनीही भाजप प्रवेश केलेला आहे. यातील अनेकजण विधानसभा आणि लोकसभा निवडणुकाही लढलेत, तर काहींना राज्यसभेवर पाठवण्यात आलंय (List of actors and actresses from Ramayan and Mahabharat join BJP entered in Politics).

रामायण मालिकेतील रामाचं पात्र करणाऱ्यांसह इतर कोणते कलाकार भाजपमध्ये?

सीता

रामायणात सीतेची भूमिका करणाऱ्या अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी खूप आधीच भाजपमध्ये प्रवेश करत आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केलीय. त्यांनी 1991 मध्ये भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढली आणि जिंकल्याही. त्यांनी गुजरातमधील वडोदरा मतदारसंघातून तत्कालीन काँग्रेस नेते रंजीत सिंह प्रताप सिंह गायकवाड यांचा पराभव केला होता.

रावण

रामायणात रावणाचं पात्र करणाऱ्या अरविंद त्रिवेदी यांनी देखील 1991 मध्ये भाजपमध्ये प्रवेश करत गुजरातमधील साबरकांठा येथून लोकसभा निवडणूक लढवली. त्यांनी जनता दलाचे (गुजरात) मगनभाई मणिभाई पटेल यांचा जवळपास 36 हजार मतांनी पराभव केला होता. यानंतर 2002 मध्येही त्यांनी पुन्हा निवडणुकीत विजय मिळवला. 2002 मध्ये त्यांना सेंसॉर बोर्डाच्या प्रमुखपदी नियुक्त करण्यात आलं.

हनुमान

रामायण मालिकेत हनुमानाची भूमिका करणाऱ्या अभिनेते दारा सिंह यांनी जाहीर भाजप प्रवेश केलेला नाही. मात्र, त्यांना भाजपने 2003 मध्ये राज्यसभेवर पाठवलं होतं. 2012 मध्ये त्यांचं निधन झालं.

महाभारत मालिकेतील कोणती पात्रं भाजपमध्ये?

कृष्ण

रामायण मालिकेसोबतच महाभारत मालिकेतील कलाकारांनीही भाजप प्रवेश केलाय. त्यात महाभारतात भगवान कृष्णाची भूमिका करणारे अभिनेते नीतीश भारद्वाज यांनी खूप आधीच भाजप प्रवेश केला होता. त्यांनी 1996 च्या निवडणुकीत झारखंडमधील जमशेदपूर येथून निवडणूक लढवली होती. यानंतर त्यांनी 1999 मध्ये मध्यप्रदेशमधील राजगड मतदारसंघातून निवडणूक लढवली. मात्र, या ठिकाणी काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांचे भाऊ लक्ष्मण सिंह यांनी त्यांचा पराभव केला. यानंतर त्यांच्या पदरी राजकारणात निराशाच आली.

द्रौपदी

महाभारतात द्रौपदीची भूमिका करणाऱ्या अभिनेत्री रूपा गांगुली यांना सध्या भाजपने राज्यसभेवर पाठवलेलं आहे. पश्चिम बंगालच्या 2016 मधील विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्या बंगालमधील उत्तर हावडा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढल्या, मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर भाजपने त्यांना 2016 मध्ये राज्यसभेवर पाठवले. त्या भाजपच्या आक्रमक आणि वक्तृत्वशील नेत्या म्हणून ओळखल्या जातात.

युधिष्ठिर

महाभारतात पांडवांच्या भावांपैकी युधिष्ठिरची भूमिका करणाऱ्या गजेंद्र चौहान यांनी 2004 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. यानंतर भाजपने त्यांना 2015 मध्ये पुण्याची प्रसिद्ध चित्रपट संस्था फिल्म अँड टेलिविजन इंस्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (FTII) अध्यक्षपदी नियुक्त केले. यावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी या नियुक्तीला जोरदार विरोध केला होता.

हेही वाचा : 

दूरदर्शनला अच्छे दिन, रामायण-महाभारत कार्यक्रमामुळे देशात दूरदर्शन पहिल्या स्थानावर

Ramayan : रामायण मालिकेने टीआरपीचं गणित बदललं, पुन्हा एकदा इतिहास रचला

Taimur Ali Khan | ‘रामायण’ बघायला आवडते, ‘पापा’ सैफकडून तैमूरच्या खास गोष्टी शेअर!

व्हिडीओ पाहा :

List of actors and actresses from Ramayan and Mahabharat join BJP entered in Politics

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.