कधी अंडाफेक, तर कधी बूट फेकला, केजरीवालांवर आतापर्यंत 12 हल्ले
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर पुन्हा एकदा हल्ला झालाय. नवी दिल्ली मतदारसंघातील मोती नगरमध्ये रोड शो सुरु असताना एका तरुणाने ओपन जीपमध्ये चढून केजरीवालांच्या कानशिलात लगावली. यानंतर अज्ञात तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरु करण्यात आली आहे. हा तरुण दिल्लीतील 33 वर्षीय स्पेअर पार्ट विक्रेता असल्याचं बोललं जातंय. केजरीवालांवर हल्ला […]
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर पुन्हा एकदा हल्ला झालाय. नवी दिल्ली मतदारसंघातील मोती नगरमध्ये रोड शो सुरु असताना एका तरुणाने ओपन जीपमध्ये चढून केजरीवालांच्या कानशिलात लगावली. यानंतर अज्ञात तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरु करण्यात आली आहे. हा तरुण दिल्लीतील 33 वर्षीय स्पेअर पार्ट विक्रेता असल्याचं बोललं जातंय. केजरीवालांवर हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्यांच्यावर होणाऱ्या हल्ल्यांची यादी मोठी आहे.
18 ऑक्टोबर 2011 रोजी लखनौमध्ये केजरीवालांवर जितेंद्र नावाच्या व्यक्तीने चप्पल फेकली होती. हा व्यक्ती टीम अण्णाचा सदस्य असल्याचं सांगण्यात आलं होतं.
2013 मध्ये हरियाणातील भिवानीमध्ये एका व्यक्तीने केजरीवालांवर शाईफेक केली.
5 मार्च 2014 रोजी अहमदाबादमध्ये केजरीवालांच्या गाडीवर दगडफेक झाली.
25 मार्च 2014 रोडी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान वाराणसीत काही लोकांनी केजरीवालांवर शाईफेक केली. याच रॅलीत त्यांच्यावर अंडीही फेकण्यात आली होती.
28 मार्च 2014 रोजी हरियाणातील एका व्यक्तीने केजरीवालांच्या कानशिलात लगावली. हा व्यक्ती समाजसेवक अण्णा हजारे यांचा समर्थक असल्याचं सांगण्यात आलं. केजरीवाल यांना स्वतंत्रपणे पक्षाची स्थापना केल्याचा राग मनात धरुन हा हल्ला करण्यात आला होता.
4 एप्रिल 2014 रोजी दक्षिण दिल्लीतील दक्षिणपुरीमध्ये एका व्यक्तीने केजरीवालांच्या पाठीवर मारलं होतं. हा युवक अगोदर केजरीवालांच्याच पक्षात होता.
8 एप्रिल 2014 रोजी दिल्लीतील सुल्तानपुरी भागात एका रिक्षा चालकाने केजरीवालांना कानशिलात लगावली होती. पण नंतर केजरीवाल या रिक्षाचालकाच्या घरी पुष्पगुच्छ घेऊन गेले आणि त्याची समजूत काढली. यानंतर या रिक्षाचालकाने केजरीवालांची माफीही मागितली होती.
26 डिसेंबर 2014 रोजी दिल्लीतील एका रॅलीत अंडी फेकण्यात आली.
जानेवारी 2016 मध्ये केजरीवालांवर शाईफेक करण्यात आली. एका तरुणीने हा हल्ला केला होता. दिल्लीत सम-विषम फॉर्म्युला लागू झाल्यानंतर त्याचं जेव्हा सेलिब्रेशन केलं जात होतं, नेमका तेव्हाच हा हल्ला करण्यात आला.
एप्रिल 2016 मध्ये सम-विषम स्टिकर्सबाबतच्या स्टिंगवर प्रश्न विचारले जात होते, तेव्हाच वेद प्रकाश नावाच्या एका तरुणाने केजरीवालांना बूट फेकून मारला होता.
20 नोव्हेंबर 2018 मध्ये मुख्यमंत्री केजरीवालांवर दिल्ली सचिवालयात एका व्यक्तीने मिरची पूड फेकली होती. या व्यक्तीने केजरीवालांचा चष्मा हिसकावून डोळ्यात मिरची पूड टाकण्याचा प्रयत्न केला. पण हा हल्ला वेळीच रोखण्यात आला.