Raj Thackeray : 9 तास चौकशी, फक्त हात जोडून राज ठाकरे रवाना

कोहिनूर मिल खरेदीप्रकरणी (Kohinoor Square) मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना ईडीने नोटीस बजावली आहे. या प्रकरणी आज सकाळी 10.30 च्या सुमारास राज ठाकरे  चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात जाणार आहेत.

Raj Thackeray : 9 तास चौकशी, फक्त हात जोडून राज ठाकरे रवाना
Follow us
| Updated on: Aug 22, 2019 | 8:26 PM

मुंबई : तब्बल नऊ तासांच्या चौकशीनंतर राज ठाकरे (Raj Thackeray ED) अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडले. सकाळी 11.30 वाजता सुरु झालेली चौकशी रात्री 8 वाजेपर्यंत चालली. चौकशी Raj Thackeray ED संपल्यानंतर राज ठाकरे बाहेर आले आणि गाडीत बसले. यावेळी त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. राज ठाकरेंचे कुटुंबीय जवळपास दोन तासांपासून बाहेर वाट पाहत होते. सकाळी राज ठाकरेंना सोडण्यासाठी आलेले कुटुंबीय बाजूच्याच हॉटेलमध्ये थांबले.

कोहिनूर मिल खरेदीप्रकरणी (Kohinoor Square) मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना ईडीने नोटीस बजावली आहे. सध्या राज ठाकरे ईडी चौकशीला सामोरे जात आहे. राज ठाकरे सकाळी 10.30 वाजता कृष्णकुंज या निवासस्थानावरुन निघाले आणि तासाभरात म्हणजेच 11.30 वाजता ईडीच्या कार्यालयात पोहोचले. त्यांच्यासोबत पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा अमित ठाकरे, मुलगी उर्वशी ठाकरे आणि सून मिताली बोरुडे-ठाकरे हेही ईडी कार्यालयात गेले असून ते सर्व ईडीच्या कार्यालयाच्या बाजूला ग्रँड हॉटेल मध्ये थांबले आहेत.

दरम्यान राज ठाकरे ईडीच्या कार्यालयात जाण्यासाठी निघाले असताना त्यांना सोडण्यासाठी मातोश्री कुंदा ठाकरेही दरवाजापर्यंत आल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या डोळ्यात अश्रू दिसत होते.

राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थाना बाहेरही पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. याविरोधात मनसेच्या कार्यकर्त्यांनी बंदची हाक दिली होती. मात्र राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना शांतता राखा, सार्वजनिक मालमत्तेची नासधूस टाळा, सामान्य जनतेला त्रास होणार नाही याची काळजी घ्या, ईडीच्या कार्यालयाजवळ जमू नका, असं आवाहन केल्यानंतर हा बंद मागे घेण्यात आला.

LIVE Updates

[svt-event title=”राज ठाकरेंना पुन्हा बोलवण्याची शक्यता कमी : सूत्र” date=”22/08/2019,7:45PM” class=”svt-cd-green” ] राज ठाकरेंना पुन्हा बोलवण्याची शक्यता कमी, राज ठाकरेंची माहिती आणि कागदपत्रे उद्या पडतळणार, आज राज ठाकरे यांच्या माहितीचे संकलन [/svt-event]

[svt-event title=”काहीवेळात राज ठाकरे बाहेर येण्याची शक्यता” date=”22/08/2019,6:31PM” class=”svt-cd-green” ] राज ठाकरे यांची चौकशी संपण्याची शक्यता, कोणत्याही क्षणी राज ठाकरे बाहेर येऊ शकतात, ईडी कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा [/svt-event]

[svt-event title=”राज ठाकरेंची चौकशी अजून सुरुच” date=”22/08/2019,6:22PM” class=”svt-cd-green” ] गेल्या 7 तासांपासून राज ठाकरेंची चौकशी अजून सुरु आहे. ईडी कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात मनसे कार्यकर्तेही जमले आहे. [/svt-event]

[svt-event title=”इचलकरंजी शहरांत मनसेकडून भाजपविरोधात आंदोलन” date=”22/08/2019,3:36PM” class=”svt-cd-green” ] इचलकरंजी शहरांमध्ये मनसेच्या वतीने निदर्शने, शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ भाजप विरोधात मोठी निदर्शने, मोठ्या प्रमाणात मनसेचे कार्यकर्ते उपस्थित, परिसरात तणावाचे वातावरण [/svt-event]

[svt-event title=”पुणे : मनसेतर्फे मावळ तालुक्यात ईडी विरोधात अनोखे निदर्शन” date=”22/08/2019,3:33PM” class=”svt-cd-green” ] पुणे : मनसेतर्फे मावळ तालुक्यात ईडी विरोधात अनोखे निदर्शन, राज ठाकरेंच्या विरोधातील ईडीची कारवाई सुडबुद्धीने केल्याच्या निषेधार्थ मावळ-कार्ला याठिकाणी फुगेसोड आंदोलन [/svt-event]

[svt-event title=”उल्हानगरात मनसे कार्यकर्त्यांची ईडी विरोधात निदर्शन ” date=”22/08/2019,3:27PM” class=”svt-cd-green” ] उल्हासनगर : मनसे कार्यकर्त्यांचा ईडी विरोधात निदर्शनं करण्याचा प्रयत्न, विठ्ठलवाडी पोलिसांनी मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले, लालचक्की चौकात मनसेकडून काळे कपडे घालत निदर्शनं करण्याचा प्रयत्न, शहराध्यक्ष बंडू देशमुख, उपजिल्हाध्यक्ष प्रदीप गोडसे यांच्यासह अनेक मनसे कार्यकर्ते ताब्यात [/svt-event]

[svt-event title=”अंजली दमानिया यांच्या टीकेला मनसेचे उत्तर” date=”22/08/2019,2:03PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राज ठाकरे यांचा मुखवटा लावून ठाण्यातील मनसे कार्यकर्त्यांकडून सरकारचा निषेध” date=”22/08/2019,2:01PM” class=”svt-cd-green” ] ठाणे : कोपरी पाचपाखाडी विभाग अध्यक्ष महेश कदम आणि कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांचा मुखवटा लावून सरकारचा निषेध, मनसैनिकांनवर अघोषित आणीबाणी लादत असल्याचा केला आरोप, महेश कदम नौपाडा पोलिसांच्या ताब्यात [/svt-event]

[svt-event title=”कोल्हापूर मनसे कार्यकर्त्यांच्या घोषणा, जीवाची बाजू लावू पण राज ठाकरेंवर कारवाई होऊ देणार नाही” date=”22/08/2019,1:59PM” class=”svt-cd-green” ] कोल्हापूर मनसेच्या वतीने सरकारचा निषेध, शिवाजी चौकात सरकार विरोधात घोषणाबाजी , जीवाची बाजू लावू पण राज ठाकरेंवर कारवाई होऊ देणार नाही, काळे कपडे घालून करून नोंदवला निषेध, आत्मदहन केलेल्या ठाण्यातील मनसे कार्यकर्ता प्रवीण चौगुलेला श्रद्धांजली वाहिली [/svt-event]

[svt-event title=”कल्याणमधील मनसे पदाधिकारी कोलशेवाडी पोलिसांच्या ताब्यात,” date=”22/08/2019,1:46PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मनसे समर्थकांचा बीड – अंबेजोगाई महामार्गावर रास्ता रोको” date=”22/08/2019,1:45PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सर्वसामान्यांनी याविरोधात आवाज उठवायला हवा : अभिनेत्री आणि काँग्रेस नेत्या उर्मिला मातोंडकर” date=”22/08/2019,1:35PM” class=”svt-cd-green” ] राज ठाकरे आणि पी चिदंबरम यांची चौकशी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यासारखी आहेत, सर्वसामान्यांनी याविरोधात आवाज उठवायला हवा, देशात सर्वसामान्य आणि असामान्य व्यक्तीबाबत असं घडतंय : अभिनेत्री आणि काँग्रेस नेत्या उर्मिला मातोंडकर [/svt-event]

[svt-event title=”ED ची चौकशी म्हणजे राजकीय दबाव तंत्र : खासदार सुप्रिया सुळे” date=”22/08/2019,1:31PM” class=”svt-cd-green” ] ED ची चौकशी म्हणजे राजकीय दबाव तंत्र आहे. जो कोणी आवाज उचलतो त्याचा आवाज दडपण्याचा प्रयत्न या सरकारचा आहे. अशावेळी परिवारच मागे उभा राहतो. त्यामुळे त्यांच्यावर कोणीही त्यावर टीका करु नये, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार जिवंत आहेत. म्हणूनच उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंची बाजू घेतली : खासदार सुप्रिया सुळे [/svt-event]

[svt-event title=”पुण्यातील मनसे कार्यकर्त्यांकडून EDiot Hitler पोस्टर्स घेऊन सरकारचा निषेध ” date=”22/08/2019,11:46AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राज ठाकरेंचे कुटुंब ईडीच्या कार्यालयाच्या बाजूला ग्रँड हॉटेल मध्ये थांबली आहे” date=”22/08/2019,11:41AM” class=”svt-cd-green” ] राज ठाकरेंचे कुटुंब ईडीच्या कार्यालयाच्या बाजूला ग्रँड हॉटेल मध्ये थांबली आहे, पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा अमित ठाकरे, सून मिताली बोरुडे-ठाकरे तिघेही ग्रँड हॉटेलमध्ये थांबले आहेत [/svt-event]

[svt-event title=”राज ठाकरे ईडीच्या चौकशीसाठी रवाना” date=”22/08/2019,11:35AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=” राज ठाकरे ईडी कार्यालयात दाखल” date=”22/08/2019,11:32AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राज ठाकरे ईडी कार्यालयात थोड्याच वेळात पोहोचणार” date=”22/08/2019,11:22AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राज ठाकरे दादरवरुन सिद्धिविनायक मंदीर, प्रभादेवी, सासमिरा, वरळी, हाजी अली या मार्गे ईडी कार्यालयाकडे रवाना” date=”22/08/2019,11:11AM” class=”svt-cd-green” ] राज ठाकरे कृष्णकुंजवरुन सिद्धिविनायक मंदीर, प्रभादेवी, सासमिरा, वरळी, हाजीअली, पेडर रोड, जसलोक रुग्णालय, बाबुलनाथ मंदीर, विल्सन कॉलेज, मरीन लाईन्स, आझाद मैदान, सीएसटी स्टेशन, पंचम पुरीवाला, शेर-ए-पंजाब, ग्रँड हॉटेल या मार्गे ईडी कार्यालयाकडे पोहोचले, ईडी कार्यालयाबाहेर छावणीचे स्वरुप [/svt-event]

[svt-event title=”राज ठाकरे सहकुटुंब सहपरिवार ED च्या चौकशीला निघालेत का सत्यनारायणाच्या पूजेला?” date=”22/08/2019,11:08AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राज ठाकरे ईडी कार्यालयाकडे रवाना” date=”22/08/2019,10:40AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राज ठाकरे ईडी कार्यालयाकडे रवाना” date=”22/08/2019,10:38AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, पुत्र अमित ठाकरे आणि सून मिताली ठाकरेही ईडीच्या कार्यालयात जाण्यासाठी कृष्णकुंजच्या बाहेर” date=”22/08/2019,10:36AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राज ठाकरेंच्या घराबाहेर- कृष्णकुंजवर प्रचंड पोलीस बंदोबस्त, थोड्याच वेळात राज ठाकरे ईडी कार्यालयाकडे जाणार” date=”22/08/2019,10:35AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मनसे नेते बाळा नांदगावकर आणि अनिल शिदोरे कृष्णकुंजवर दाखल ” date=”22/08/2019,10:34AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पुण्यातील मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांच्या नोटिसा” date=”22/08/2019,9:43AM” class=”svt-cd-green” ] पुण्यातील मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांच्या नोटिसा, राज ठाकरेंची ईडीकडून होणाऱ्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची नोटीस , खबरदारी म्हणून पुणे पोलिसांच्या मनसे कार्यकर्त्यांचा नोटिसा, पुणे मनसे कार्यलयाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त [/svt-event]

[svt-event title=”मुंबईत अनेक ठिकाणी जमावबंदी ” date=”22/08/2019,9:39AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राज ठाकरे यांच्या समर्थनार्थ मनसेच्या कार्यकर्त्यांनी EDiots Hitler असं लिहिलेले काळ्या रंगाचे टी-शर्ट घातले आहे” date=”22/08/2019,9:38AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बेस्ट बसेसची तोडफोड होऊ नये यासाठी जाळ्या लावल्या” date=”22/08/2019,9:22AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पोलिसांची कारवाई संयमी असेल, शांतता राखावी- दीपक केसरकर” date=”22/08/2019,9:14AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”टीका टिपण्णी वैचारिक असते, त्याला त्याच पद्धतीने उत्तरे द्यावी : बाळा नांदगावकर” date=”22/08/2019,9:14AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सर्वांनी शांतता पाळावी : गृहराज्य मंत्री दीपक केसरकर” date=”22/08/2019,9:13AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बहु भी कभी सास बनती है – बाळा नांदगावकर ” date=”22/08/2019,9:12AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष रवी मोरे हेही पोलिसांच्या ताब्यात” date=”22/08/2019,9:11AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा : बाळा नांदगावकर” date=”22/08/2019,9:11AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”आम्ही लोकशाही मार्गानेच सामोरे जाऊ : बाळा नांदगावकर ” date=”22/08/2019,9:10AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”आम्ही ईडीच्या कार्यालयाकडे जाणार नाही : बाळा नांदगावकर” date=”22/08/2019,9:10AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुबंई पुणे एक्सप्रेस वे वरील वाहतुकीवर कोणताही परिणाम नाही” date=”22/08/2019,8:57AM” class=”svt-cd-green” ] मुबंई पुणे एक्सप्रेस वे वरील वाहतुकीवर कोणताही परिणाम नाही, खालापुर टोलनाक्यावर कोणताही अतिरिक्त पोलीस बंदोबस्त नाही, मात्र मुंबईकडे येणाऱ्या लेनची संख्या 5, तर पुण्याकडे जाणाऱ्या लेनची संख्या 8 केली आहे, मनसेचे झेडें असलेल्या वाहनांचा अभाव [/svt-event]

[svt-event title=”मनसे नेते संदीप देशपांडे यांची पोलिसांकडून धरपकड, ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे, संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया” date=”22/08/2019,8:47AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोहिनूर स्क्वेअर प्रकरणी आज उन्मेष जोशी आणि राजन शिरोडकर यांची चौकशी नाही” date=”22/08/2019,8:41AM” class=”svt-cd-green” ] कोहिनूर मिल खरेदीप्रकरणी आज फक्त राज ठाकरेंची चौकशी, उन्मेष जोशी आणि राजन शिरोडकर यांची आज ईडी चौकशी नाही [/svt-event]

[svt-event title=”ईडी चौकशीला जाण्यापूर्वी मनसेचे काही नेते राज ठाकरेंना भेटण्याची शक्यता ” date=”22/08/2019,8:31AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”ईडी कार्यालयात पोलिसांचा चोख बंदोबस्त” date=”22/08/2019,8:27AM” class=”svt-cd-green” ] दक्षिण मुंबईतील फोर्ट परिसरातील ईडी कार्यालयात चोख पोलीस बंदोबस्त, आजूबाजूला कार्यकर्त्यांनी गर्दी करु नये म्हणून सर्वत्र बॅरिकेट्स लावल्या, तसेच लालबाग पूलावरही पोलिसांचा बंदोबस्त [/svt-event]

[svt-event title=”संदीप देशपांडे पोलिसांच्या ताब्यात” date=”22/08/2019,8:26AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मनसे नेते संदीप देशपांडे यांना पोलिसांना ताब्यात घेतले.” date=”22/08/2019,7:48AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दादरच्या शिवसेना भवन परिसरात चोख पोलीस बंदोबस्त” date=”22/08/2019,8:25AM” class=”svt-cd-green” ] शिवसेना भवन समोरच कोहिनूर स्क्वेअर ही बिल्डींग आहे, याच ठिकाणीच्या खरेदीप्रकरणी राज ठाकरे यांना ईडीची नोटीस, दादर, शिवाजी पार्क, शिवसेना भवन या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा कडकोट बंदोबस्त [/svt-event]

[svt-event title=”राज ठाकरेंच्या घराबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त” date=”22/08/2019,8:19AM” class=”svt-cd-green” ] मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी कृष्णकुंजवर बाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, कृष्णकुंज या दोन्ही गेटच्या बाहेर पोलीस तैनात, दादरमध्य सर्वत्र बॅरिकेट्स आणि नाकाबंदी लावण्यात आली आहे [/svt-event]

[svt-event title=”राज ठाकरे सकाळी 10.30 वाजता ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी जाणार” date=”22/08/2019,8:17AM” class=”svt-cd-green” ] कोहिनूर मिल खरेदीप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज ईडी चौकशी, सकाळी 10.30 वाजता राज ठाकरे ईडीच्या कार्यालयात उपस्थित राहण्याची शक्यता, त्यापूर्वी मनसेचे नेते राज ठाकरेंना भेटण्याची शक्यता [/svt-event]

उन्मेष जोशी आणि राजन शिरोडकर यांचीही चौकशी

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे सुपुत्र उन्मेष जोशी, राज ठाकरे आणि त्यांचे निकटवर्तीय राजन शिरोडकर या प्रकरणात ईडीच्या रडारवर आहेत. उन्मेष जोशी यांची सोमवार, मंगळवार, बुधवार असे सलग तीन दिवस ईडी कार्यालयात आठ-आठ तास चौकशी करण्यात आली होती. तर शिरोडकरांचीही जोशींसोबत मंगळवारी आणि बुधवारी असे दोन दिवस सलग आठ तास चौकशी झाली होती.

कोहिनूर स्क्वेअर टॉवर

कोहिनूर सीटीएनलमध्ये आयएल अॅण्ड एफएस ग्रुपचं कर्ज आणि 860 कोटींच्या गुंतवणुकीचा ईडी तपास करत आहे. ही कंपनी मुंबईत कोहिनूर स्क्वेअर टॉवर्स उभारत आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा मुलगा उन्मेश जोशी यांनी ही कंपनी सुरु केली होती. कोहिनूर मिल क्रमांक 3 विकत घेण्यामध्ये राज ठाकरे यांची भूमिका होती, यासाठीच ते ईडीच्या रडारवर होते.

काय आहे नेमकं प्रकरण?

कोहिनूर सीटीएनएल (Kohinoor CTNL) ही उन्मेष जोशी (Unmesh Joshi) यांच्या मालकीची कंपनी आहे. उन्मेष जोशी, राज ठाकरे आणि त्यांचे निकटवर्तीय राजन शिरोडकर हे 2008 पर्यंत ‘कोहिनूर CTNL’ कंपनीचे शेअर होल्डर (भागीदार) होते. त्यांनी कोहिनूर मिल नंबर 3 ही जागा 2003 मध्ये लिलाव पद्धतीने 421 कोटींना खरेदी केली होती.

या जमिनीवर ‘कोहिनूर स्क्वेअर’ ही बहुमजली इमारत उभारण्यात येत आहे. या कंपनीत सरकारी क्षेत्रातील कंपनी इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियर सर्व्हिसेसद्वारे (आयएल अँड एफएस – IL&FS) 225 कोटी रुपयांची गुंतवणूक केली.

मात्र 2008 मध्ये IL&FS ने मोठं नुकसान सहन करत आपले 225 कोटी रुपयांचे सर्व शेअर्स केवळ 90 कोटींना कोहिनूर CTNL ला देऊन टाकले. त्याचवेळी राज ठाकरेंनीही आपले सर्व शेअर कंपनीला विकले आणि ते कंपनीतून बाहेर पडले.

आपले शेअर्स दिल्यानंतरही IL&FS या सरकारी कंपनीने उन्मेष जोशींच्या कोहिनूर सीटीएनएल कंपनीला अडव्हान्स लोन अर्थात आगाऊ कर्ज दिलं. ते कर्जही कोहिनूर सीटीएनएल कंपनी भागवू शकली नाही.

वर्ष 2011 मध्ये कोहिनूर सीटीएनएलने आपली काही मालमत्ता विकून 500 कोटी रुपयांचं कर्ज भागवण्यासाठी IL&FS सोबतच्या करारावर सह्या केल्या. या करारानंतरही IL&FS या कंपनीने पुन्हा कोहिनूर सीटीएनएल कंपनीला आणखी 135 कोटी रुपयांचं कर्ज दिलं.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.