मुंबई : तब्बल नऊ तासांच्या चौकशीनंतर राज ठाकरे (Raj Thackeray ED) अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडले. सकाळी 11.30 वाजता सुरु झालेली चौकशी रात्री 8 वाजेपर्यंत चालली. चौकशी Raj Thackeray ED संपल्यानंतर राज ठाकरे बाहेर आले आणि गाडीत बसले. यावेळी त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. राज ठाकरेंचे कुटुंबीय जवळपास दोन तासांपासून बाहेर वाट पाहत होते. सकाळी राज ठाकरेंना सोडण्यासाठी आलेले कुटुंबीय बाजूच्याच हॉटेलमध्ये थांबले.
कोहिनूर मिल खरेदीप्रकरणी (Kohinoor Square) मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना ईडीने नोटीस बजावली आहे. सध्या राज ठाकरे ईडी चौकशीला सामोरे जात आहे. राज ठाकरे सकाळी 10.30 वाजता कृष्णकुंज या निवासस्थानावरुन निघाले आणि तासाभरात म्हणजेच 11.30 वाजता ईडीच्या कार्यालयात पोहोचले. त्यांच्यासोबत पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा अमित ठाकरे, मुलगी उर्वशी ठाकरे आणि सून मिताली बोरुडे-ठाकरे हेही ईडी कार्यालयात गेले असून ते सर्व ईडीच्या कार्यालयाच्या बाजूला ग्रँड हॉटेल मध्ये थांबले आहेत.
दरम्यान राज ठाकरे ईडीच्या कार्यालयात जाण्यासाठी निघाले असताना त्यांना सोडण्यासाठी मातोश्री कुंदा ठाकरेही दरवाजापर्यंत आल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या डोळ्यात अश्रू दिसत होते.
राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थाना बाहेरही पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. याविरोधात मनसेच्या कार्यकर्त्यांनी बंदची हाक दिली होती. मात्र राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना शांतता राखा, सार्वजनिक मालमत्तेची नासधूस टाळा, सामान्य जनतेला त्रास होणार नाही याची काळजी घ्या, ईडीच्या कार्यालयाजवळ जमू नका, असं आवाहन केल्यानंतर हा बंद मागे घेण्यात आला.
LIVE Updates
[svt-event title=”राज ठाकरेंना पुन्हा बोलवण्याची शक्यता कमी : सूत्र” date=”22/08/2019,7:45PM” class=”svt-cd-green” ] राज ठाकरेंना पुन्हा बोलवण्याची शक्यता कमी, राज ठाकरेंची माहिती आणि कागदपत्रे उद्या पडतळणार, आज राज ठाकरे यांच्या माहितीचे संकलन [/svt-event]
[svt-event title=”काहीवेळात राज ठाकरे बाहेर येण्याची शक्यता” date=”22/08/2019,6:31PM” class=”svt-cd-green” ] राज ठाकरे यांची चौकशी संपण्याची शक्यता, कोणत्याही क्षणी राज ठाकरे बाहेर येऊ शकतात, ईडी कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा [/svt-event]
[svt-event title=”राज ठाकरेंची चौकशी अजून सुरुच” date=”22/08/2019,6:22PM” class=”svt-cd-green” ] गेल्या 7 तासांपासून राज ठाकरेंची चौकशी अजून सुरु आहे. ईडी कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात मनसे कार्यकर्तेही जमले आहे. [/svt-event]
[svt-event title=”इचलकरंजी शहरांत मनसेकडून भाजपविरोधात आंदोलन” date=”22/08/2019,3:36PM” class=”svt-cd-green” ] इचलकरंजी शहरांमध्ये मनसेच्या वतीने निदर्शने, शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ भाजप विरोधात मोठी निदर्शने, मोठ्या प्रमाणात मनसेचे कार्यकर्ते उपस्थित, परिसरात तणावाचे वातावरण [/svt-event]
[svt-event title=”पुणे : मनसेतर्फे मावळ तालुक्यात ईडी विरोधात अनोखे निदर्शन” date=”22/08/2019,3:33PM” class=”svt-cd-green” ] पुणे : मनसेतर्फे मावळ तालुक्यात ईडी विरोधात अनोखे निदर्शन, राज ठाकरेंच्या विरोधातील ईडीची कारवाई सुडबुद्धीने केल्याच्या निषेधार्थ मावळ-कार्ला याठिकाणी फुगेसोड आंदोलन [/svt-event]
[svt-event title=”उल्हानगरात मनसे कार्यकर्त्यांची ईडी विरोधात निदर्शन ” date=”22/08/2019,3:27PM” class=”svt-cd-green” ] उल्हासनगर : मनसे कार्यकर्त्यांचा ईडी विरोधात निदर्शनं करण्याचा प्रयत्न, विठ्ठलवाडी पोलिसांनी मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले, लालचक्की चौकात मनसेकडून काळे कपडे घालत निदर्शनं करण्याचा प्रयत्न, शहराध्यक्ष बंडू देशमुख, उपजिल्हाध्यक्ष प्रदीप गोडसे यांच्यासह अनेक मनसे कार्यकर्ते ताब्यात [/svt-event]
[svt-event title=”अंजली दमानिया यांच्या टीकेला मनसेचे उत्तर” date=”22/08/2019,2:03PM” class=”svt-cd-green” ]
#RajThackeray LIVE : अंजली दमानिया यांच्या टीकेला मनसेचे उत्तर, कौटुंबिक वात्सल्य, कौटुंबिक नाती आणि कौटुंबिक प्रेम हे आमचे संस्कार आहेत, अंजली दमानिया यांना हे कळणार नाही : मनसे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदारhttps://t.co/Z87lacGGvi #RajThackeray @mnsadhikrut @YKilledar pic.twitter.com/OTBPkRpTEc
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 22, 2019
[svt-event title=”राज ठाकरे यांचा मुखवटा लावून ठाण्यातील मनसे कार्यकर्त्यांकडून सरकारचा निषेध” date=”22/08/2019,2:01PM” class=”svt-cd-green” ] ठाणे : कोपरी पाचपाखाडी विभाग अध्यक्ष महेश कदम आणि कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांचा मुखवटा लावून सरकारचा निषेध, मनसैनिकांनवर अघोषित आणीबाणी लादत असल्याचा केला आरोप, महेश कदम नौपाडा पोलिसांच्या ताब्यात [/svt-event]
[svt-event title=”कोल्हापूर मनसे कार्यकर्त्यांच्या घोषणा, जीवाची बाजू लावू पण राज ठाकरेंवर कारवाई होऊ देणार नाही” date=”22/08/2019,1:59PM” class=”svt-cd-green” ] कोल्हापूर मनसेच्या वतीने सरकारचा निषेध, शिवाजी चौकात सरकार विरोधात घोषणाबाजी , जीवाची बाजू लावू पण राज ठाकरेंवर कारवाई होऊ देणार नाही, काळे कपडे घालून करून नोंदवला निषेध, आत्मदहन केलेल्या ठाण्यातील मनसे कार्यकर्ता प्रवीण चौगुलेला श्रद्धांजली वाहिली [/svt-event]
[svt-event title=”कल्याणमधील मनसे पदाधिकारी कोलशेवाडी पोलिसांच्या ताब्यात,” date=”22/08/2019,1:46PM” class=”svt-cd-green” ]
#RajThackeray LIVE : कल्याण : कल्याण पूर्वेतील मनसे पदाधिकाऱ्यांनी कोलशेवाडी पोलिसांनी घेतले ताब्यात, माजी नगरसेवक अनंता गायकवाड, उपशहर प्रमुख योगेश गव्हाणे यासह दोन पदाधिकाऱ्यांना घेतले ताब्यातhttps://t.co/Z87lacGGvi #mns #RajThackeray @mnsadhikrut
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 22, 2019
[svt-event title=”मनसे समर्थकांचा बीड – अंबेजोगाई महामार्गावर रास्ता रोको” date=”22/08/2019,1:45PM” class=”svt-cd-green” ]
#RajThackeray LIVE : बीड: मनसे समर्थकांचा बीड – अंबेजोगाई महामार्गावर रास्ता रोको, केजमध्ये मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन, भाजप सरकार विरोधी घोषणाबाजी करत मनसे कार्यकर्त्यांचा निषेधhttps://t.co/Z87lacGGvi #mns #RajThackeray @mnsadhikrut
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 22, 2019
[svt-event title=”सर्वसामान्यांनी याविरोधात आवाज उठवायला हवा : अभिनेत्री आणि काँग्रेस नेत्या उर्मिला मातोंडकर” date=”22/08/2019,1:35PM” class=”svt-cd-green” ] राज ठाकरे आणि पी चिदंबरम यांची चौकशी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यासारखी आहेत, सर्वसामान्यांनी याविरोधात आवाज उठवायला हवा, देशात सर्वसामान्य आणि असामान्य व्यक्तीबाबत असं घडतंय : अभिनेत्री आणि काँग्रेस नेत्या उर्मिला मातोंडकर [/svt-event]
[svt-event title=”ED ची चौकशी म्हणजे राजकीय दबाव तंत्र : खासदार सुप्रिया सुळे” date=”22/08/2019,1:31PM” class=”svt-cd-green” ] ED ची चौकशी म्हणजे राजकीय दबाव तंत्र आहे. जो कोणी आवाज उचलतो त्याचा आवाज दडपण्याचा प्रयत्न या सरकारचा आहे. अशावेळी परिवारच मागे उभा राहतो. त्यामुळे त्यांच्यावर कोणीही त्यावर टीका करु नये, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार जिवंत आहेत. म्हणूनच उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंची बाजू घेतली : खासदार सुप्रिया सुळे [/svt-event]
[svt-event title=”पुण्यातील मनसे कार्यकर्त्यांकडून EDiot Hitler पोस्टर्स घेऊन सरकारचा निषेध ” date=”22/08/2019,11:46AM” class=”svt-cd-green” ]
#RajThackeray LIVE : EDiot Hitler ची चळवळ मुंबईपाठोपाठ आता पुण्यातही, ज्या मनसे कार्यकर्त्यांना पुणे पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत, त्यांनी हातात वादग्रस्त EDiot Hitler पोस्टर्स घेऊन निषेध व्यक्त केलाhttps://t.co/Z87lacGGvi #mns #RajThackeray @mnsadhikrut
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 22, 2019
[svt-event title=”राज ठाकरेंचे कुटुंब ईडीच्या कार्यालयाच्या बाजूला ग्रँड हॉटेल मध्ये थांबली आहे” date=”22/08/2019,11:41AM” class=”svt-cd-green” ] राज ठाकरेंचे कुटुंब ईडीच्या कार्यालयाच्या बाजूला ग्रँड हॉटेल मध्ये थांबली आहे, पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा अमित ठाकरे, सून मिताली बोरुडे-ठाकरे तिघेही ग्रँड हॉटेलमध्ये थांबले आहेत [/svt-event]
[svt-event title=”राज ठाकरे ईडीच्या चौकशीसाठी रवाना” date=”22/08/2019,11:35AM” class=”svt-cd-green” ]
Mumbai: Maharashtra Navnirman Sena (MNS) Chief Raj Thackeray arrives at office of the Enforcement Directorate, to appear before it, in connection with a case pertaining to alleged irregularities related to Infrastructure Leasing and Financial Services (IL&FS)loan to Kohinoor CTNL pic.twitter.com/VfgINaQwLD
— ANI (@ANI) August 22, 2019
[svt-event title=” राज ठाकरे ईडी कार्यालयात दाखल” date=”22/08/2019,11:32AM” class=”svt-cd-green” ]
LIVE – राज ठाकरे ईडी कार्यालयात दाखल https://t.co/eIKj4Eop7R pic.twitter.com/usIAWUo7cl
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 22, 2019
[svt-event title=”राज ठाकरे ईडी कार्यालयात थोड्याच वेळात पोहोचणार” date=”22/08/2019,11:22AM” class=”svt-cd-green” ]
#RajThackeray LIVE : राज ठाकरे ईडी कार्यालयात थोड्याच वेळात पोहोचणारhttps://t.co/Z87lacGGvi #mns #RajThackeray @mnsadhikrut pic.twitter.com/ZHhwB0DTHw
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 22, 2019
[svt-event title=”राज ठाकरे दादरवरुन सिद्धिविनायक मंदीर, प्रभादेवी, सासमिरा, वरळी, हाजी अली या मार्गे ईडी कार्यालयाकडे रवाना” date=”22/08/2019,11:11AM” class=”svt-cd-green” ] राज ठाकरे कृष्णकुंजवरुन सिद्धिविनायक मंदीर, प्रभादेवी, सासमिरा, वरळी, हाजीअली, पेडर रोड, जसलोक रुग्णालय, बाबुलनाथ मंदीर, विल्सन कॉलेज, मरीन लाईन्स, आझाद मैदान, सीएसटी स्टेशन, पंचम पुरीवाला, शेर-ए-पंजाब, ग्रँड हॉटेल या मार्गे ईडी कार्यालयाकडे पोहोचले, ईडी कार्यालयाबाहेर छावणीचे स्वरुप [/svt-event]
[svt-event title=”राज ठाकरे सहकुटुंब सहपरिवार ED च्या चौकशीला निघालेत का सत्यनारायणाच्या पूजेला?” date=”22/08/2019,11:08AM” class=”svt-cd-green” ]
#RajThackeray LIVE : राज ठाकरे सहकुटुंब सहपरिवार ED च्या चौकशीला निघालेत का सत्यनारायणाच्या पूजेला?बायको, मुलगा, सून, मुलगी आणि बहीण? सगळे मिळून माहिती देणार का? काय हा drama? का सहानुभूती गोळा करण्याचा हा प्रयत्न : अंजली दमानियाhttps://t.co/Z87lacGGvi #RajThackeray @mnsadhikrut
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 22, 2019
[svt-event title=”राज ठाकरे ईडी कार्यालयाकडे रवाना” date=”22/08/2019,10:40AM” class=”svt-cd-green” ]
LIVETV राज ठाकरे ईडी कार्यालयाकडे रवाना https://t.co/eIKj4Eop7R #RajThackeray pic.twitter.com/jqb3lAq4V0
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 22, 2019
[svt-event title=”राज ठाकरे ईडी कार्यालयाकडे रवाना” date=”22/08/2019,10:38AM” class=”svt-cd-green” ]
LIVETV राज ठाकरे ईडी कार्यालयाकडे रवाना https://t.co/eIKj4Eop7R #RajThackeray pic.twitter.com/Nu59zee4Aq
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 22, 2019
[svt-event title=”राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, पुत्र अमित ठाकरे आणि सून मिताली ठाकरेही ईडीच्या कार्यालयात जाण्यासाठी कृष्णकुंजच्या बाहेर” date=”22/08/2019,10:36AM” class=”svt-cd-green” ]
#RajThackeray LIVE : राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, पुत्र अमित ठाकरे आणि सून मिताली ठाकरेही ईडीच्या कार्यालयात जाण्यासाठी कृष्णकुंजच्या बाहेरhttps://t.co/Z87lacGGvi #mns #RajThackeray @mnsadhikrut pic.twitter.com/YBoTF1zJ3g
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 22, 2019
[svt-event title=”राज ठाकरेंच्या घराबाहेर- कृष्णकुंजवर प्रचंड पोलीस बंदोबस्त, थोड्याच वेळात राज ठाकरे ईडी कार्यालयाकडे जाणार” date=”22/08/2019,10:35AM” class=”svt-cd-green” ]
LIVETV राज ठाकरेंच्या घराबाहेर- कृष्णकुंजवर प्रचंड पोलीस बंदोबस्त, थोड्याच वेळात राज ठाकरे ईडी कार्यालयाकडे जाणार https://t.co/eIKj4Eop7R pic.twitter.com/c745tUG2m0
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 22, 2019
[svt-event title=”मनसे नेते बाळा नांदगावकर आणि अनिल शिदोरे कृष्णकुंजवर दाखल ” date=”22/08/2019,10:34AM” class=”svt-cd-green” ]
#RajThackeray मनसे नेते बाळा नांदगावकर आणि अनिल शिदोरे कृष्णकुंजवर दाखल @mnsadhikrut
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 22, 2019
[svt-event title=”पुण्यातील मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांच्या नोटिसा” date=”22/08/2019,9:43AM” class=”svt-cd-green” ] पुण्यातील मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांच्या नोटिसा, राज ठाकरेंची ईडीकडून होणाऱ्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची नोटीस , खबरदारी म्हणून पुणे पोलिसांच्या मनसे कार्यकर्त्यांचा नोटिसा, पुणे मनसे कार्यलयाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त [/svt-event]
[svt-event title=”मुंबईत अनेक ठिकाणी जमावबंदी ” date=”22/08/2019,9:39AM” class=”svt-cd-green” ]
BREAKING – मुंबईतील एमआरए मार्ग पोलीस ठाणे, आझाद मैदान पोलीस ठाणे , दादर पोलीस ठाणे आणि मरिन ड्राईव्ह या पोलीस ठाण्याच्या हद्दीत कलम 144 ( जमावबंदी) लागू #RajThackeray pic.twitter.com/dmB5iQdGzt
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 22, 2019
[svt-event title=”राज ठाकरे यांच्या समर्थनार्थ मनसेच्या कार्यकर्त्यांनी EDiots Hitler असं लिहिलेले काळ्या रंगाचे टी-शर्ट घातले आहे” date=”22/08/2019,9:38AM” class=”svt-cd-green” ]
#RajThackeray LIVE : राज ठाकरे यांच्या समर्थनार्थ मनसेच्या कार्यकर्त्यांनी EDiots Hitler असं लिहिलेले टी-शर्ट घातले आहे. हेच टी-शर्ट घातल्यामुळे संदीप देशपांडे पोलिसांच्या ताब्यातhttps://t.co/Z87lacGGvi #mns #RajThackeray @mnsadhikrut pic.twitter.com/cfp6OVVxDW
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 22, 2019
[svt-event title=”बेस्ट बसेसची तोडफोड होऊ नये यासाठी जाळ्या लावल्या” date=”22/08/2019,9:22AM” class=”svt-cd-green” ]
#RajThackeray LIVE : बेस्ट बसच्या सुरक्षेसाठी जाळ्या लावण्यात आल्या आहेत, बेस्ट बसेसची तोडफोड होऊ नये यासाठी जाळ्या लावण्यात आल्या आहेतhttps://t.co/Z87lacGGvi #mns #RajThackeray @mnsadhikrut pic.twitter.com/OnYfKA173z
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 22, 2019
[svt-event title=”पोलिसांची कारवाई संयमी असेल, शांतता राखावी- दीपक केसरकर” date=”22/08/2019,9:14AM” class=”svt-cd-green” ]
#RajThackeray : गृहराज्य मंत्री दीपक केसरकर आणि बाळा नांदगावकर लाईव्ह –
पोलिसांची कारवाई संयमी असेल, शांतता राखावी- केसरकर
मनसैनिक सुद्धा शांतता राखतील – नांदगावकर
https://t.co/eIKj4Eop7R @mnsadhikrut pic.twitter.com/D8PNX1e91l
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 22, 2019
[svt-event title=”टीका टिपण्णी वैचारिक असते, त्याला त्याच पद्धतीने उत्तरे द्यावी : बाळा नांदगावकर” date=”22/08/2019,9:14AM” class=”svt-cd-green” ]
#RajThackeray : गृहराज्य मंत्री दीपक केसरकर आणि बाळा नांदगावकर लाईव्ह –
हा फक्त चौकशीचा भाग आहे, तो नियमानुसार असतो, सर्वांनी शांतता पाळावी – केसरकर
आम्ही शांतता बाळगतो, तुम्ही पण पाळा, टीका टिपण्णी वैचारिक असते, त्याला त्याच पद्धतीने उत्तरे द्यावी – नांदगावकर pic.twitter.com/Bi1EqoNVAS
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 22, 2019
[svt-event title=”सर्वांनी शांतता पाळावी : गृहराज्य मंत्री दीपक केसरकर” date=”22/08/2019,9:13AM” class=”svt-cd-green” ]
#RajThackeray : गृहराज्य मंत्री दीपक केसरकर लाईव्ह –
हा फक्त चौकशीचा भाग आहे, तो नियमानुसार असतो, सर्वांनी शांतता पाळावी https://t.co/eIKj4Eop7R @mnsadhikrut pic.twitter.com/37NlEemMZT
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 22, 2019
[svt-event title=”बहु भी कभी सास बनती है – बाळा नांदगावकर ” date=”22/08/2019,9:12AM” class=”svt-cd-green” ]
#RajThackeray : मनसे नेते बाळा नांदगावकर लाईव्ह – राजकारण फार काळ टिकत नाही, बहु भी कभी सास बनती है – नांदगावकर https://t.co/eIKj4Eop7R @mnsadhikrut pic.twitter.com/0lD2Zi9BoE
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 22, 2019
[svt-event title=”मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष रवी मोरे हेही पोलिसांच्या ताब्यात” date=”22/08/2019,9:11AM” class=”svt-cd-green” ]
#RajThackeray : संदीप देशपांडे यांच्यानंतर मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष रवी मोरे हेही पोलिसांच्या ताब्यात, ठाण्यातील कोपरी पोलिसांनी घेतलं ताब्यात https://t.co/Z87lacGGvi #mns #RajThackeray @mnsadhikrut
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 22, 2019
[svt-event title=”कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा : बाळा नांदगावकर” date=”22/08/2019,9:11AM” class=”svt-cd-green” ]
#RajThackeray : मनसे नेते बाळा नांदगावकर लाईव्ह – कार्यकर्त्यांमध्ये असंतोष आहे, ते साहेबांवरील प्रेम आहे, पण कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा – नांदगावकर https://t.co/eIKj4Eop7R @mnsadhikrut pic.twitter.com/TcZmDOOPvL
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 22, 2019
[svt-event title=”आम्ही लोकशाही मार्गानेच सामोरे जाऊ : बाळा नांदगावकर ” date=”22/08/2019,9:10AM” class=”svt-cd-green” ]
#RajThackeray : मनसे नेते बाळा नांदगावकर लाईव्ह – पक्षादेशाप्रमाणे आम्ही ईडीच्या चौकशीला शांततेने सामोरे जाऊ, लोकशाही मार्गाने नोटीस पाठवलीय, आम्ही लोकशाही मार्गानेच सामोरे जाऊ – नांदगावकर https://t.co/eIKj4Eop7R @mnsadhikrut pic.twitter.com/gqcjzZqXND
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 22, 2019
[svt-event title=”आम्ही ईडीच्या कार्यालयाकडे जाणार नाही : बाळा नांदगावकर” date=”22/08/2019,9:10AM” class=”svt-cd-green” ]
#RajThackeray : मनसे नेते बाळा नांदगावकर लाईव्ह – आम्ही ईडीच्या कार्यालयाकडे जाणार नाही, आम्ही साहेबांच्या घराजवळच थांबणार आहोत, आम्ही राज ठाकरेंचे आदेश पाळणार https://t.co/eIKj4Eop7R @mnsadhikrut pic.twitter.com/JgLRbyI5LK
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 22, 2019
[svt-event title=”मुबंई पुणे एक्सप्रेस वे वरील वाहतुकीवर कोणताही परिणाम नाही” date=”22/08/2019,8:57AM” class=”svt-cd-green” ] मुबंई पुणे एक्सप्रेस वे वरील वाहतुकीवर कोणताही परिणाम नाही, खालापुर टोलनाक्यावर कोणताही अतिरिक्त पोलीस बंदोबस्त नाही, मात्र मुंबईकडे येणाऱ्या लेनची संख्या 5, तर पुण्याकडे जाणाऱ्या लेनची संख्या 8 केली आहे, मनसेचे झेडें असलेल्या वाहनांचा अभाव [/svt-event]
[svt-event title=”मनसे नेते संदीप देशपांडे यांची पोलिसांकडून धरपकड, ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे, संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया” date=”22/08/2019,8:47AM” class=”svt-cd-green” ]
LIVE : मनसे नेते संदीप देशपांडे यांची पोलिसांकडून धरपकड, ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे, संदीप देशपांडे यांची प्रतिक्रियाhttps://t.co/Z87lacGGvi #mns #RajThackeray
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 22, 2019
[svt-event title=”कोहिनूर स्क्वेअर प्रकरणी आज उन्मेष जोशी आणि राजन शिरोडकर यांची चौकशी नाही” date=”22/08/2019,8:41AM” class=”svt-cd-green” ] कोहिनूर मिल खरेदीप्रकरणी आज फक्त राज ठाकरेंची चौकशी, उन्मेष जोशी आणि राजन शिरोडकर यांची आज ईडी चौकशी नाही [/svt-event]
[svt-event title=”ईडी चौकशीला जाण्यापूर्वी मनसेचे काही नेते राज ठाकरेंना भेटण्याची शक्यता ” date=”22/08/2019,8:31AM” class=”svt-cd-green” ]
LIVE : कोहिनूर मिल खरेदीप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज ईडी चौकशी, राज ठाकरेंच्या निवासस्थानी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, सकाळी 10.30 वाजता राज ठाकरे ईडीच्या कार्यालयात उपस्थित राहणार, त्यापूर्वी मनसेचे काही नेते राज ठाकरेंना भेटण्याची शक्यता #RajThackeray #kohinoor pic.twitter.com/cA9JgR1BZU
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 22, 2019
[svt-event title=”ईडी कार्यालयात पोलिसांचा चोख बंदोबस्त” date=”22/08/2019,8:27AM” class=”svt-cd-green” ] दक्षिण मुंबईतील फोर्ट परिसरातील ईडी कार्यालयात चोख पोलीस बंदोबस्त, आजूबाजूला कार्यकर्त्यांनी गर्दी करु नये म्हणून सर्वत्र बॅरिकेट्स लावल्या, तसेच लालबाग पूलावरही पोलिसांचा बंदोबस्त [/svt-event]
[svt-event title=”संदीप देशपांडे पोलिसांच्या ताब्यात” date=”22/08/2019,8:26AM” class=”svt-cd-green” ]
#LIVE : राज ठाकरेंची ईडी चौकशी, संदीप देशपांडे पोलिसांच्या ताब्यात, संदीप देशपांडे यांनी काळ्या रंगाचे टी-शर्टवर EDiots Hitler असे लिहीले आहे, हे टी शर्ट देशपांडे यांनी काढावे अशी पोलिसांनी सूचना, मात्र टी शर्ट काढण्यास देशपांडेंचा नकार #RajThackeray pic.twitter.com/hfSsCqftjz
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 22, 2019
[svt-event title=”मनसे नेते संदीप देशपांडे यांना पोलिसांना ताब्यात घेतले.” date=”22/08/2019,7:48AM” class=”svt-cd-green” ]
LIVE : कोहिनूर मिल खरेदीप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज ईडी चौकशी, मनसे नेते संदीप देशपांडे यांना पोलिसांना ताब्यात घेतले, शिवसेना भवनाच्या समोरच्या बीट चौकीमध्ये संदीप देशपांडे यांना ठेवण्यात आले आहे, मनसे पदाधिकाऱ्यांची पोलिसांकडून धरपकड #mns #RajThackeray pic.twitter.com/kUGZrg6bpZ
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 22, 2019
[svt-event title=”दादरच्या शिवसेना भवन परिसरात चोख पोलीस बंदोबस्त” date=”22/08/2019,8:25AM” class=”svt-cd-green” ] शिवसेना भवन समोरच कोहिनूर स्क्वेअर ही बिल्डींग आहे, याच ठिकाणीच्या खरेदीप्रकरणी राज ठाकरे यांना ईडीची नोटीस, दादर, शिवाजी पार्क, शिवसेना भवन या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा कडकोट बंदोबस्त [/svt-event]
[svt-event title=”राज ठाकरेंच्या घराबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त” date=”22/08/2019,8:19AM” class=”svt-cd-green” ] मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी कृष्णकुंजवर बाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, कृष्णकुंज या दोन्ही गेटच्या बाहेर पोलीस तैनात, दादरमध्य सर्वत्र बॅरिकेट्स आणि नाकाबंदी लावण्यात आली आहे [/svt-event]
[svt-event title=”राज ठाकरे सकाळी 10.30 वाजता ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी जाणार” date=”22/08/2019,8:17AM” class=”svt-cd-green” ] कोहिनूर मिल खरेदीप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज ईडी चौकशी, सकाळी 10.30 वाजता राज ठाकरे ईडीच्या कार्यालयात उपस्थित राहण्याची शक्यता, त्यापूर्वी मनसेचे नेते राज ठाकरेंना भेटण्याची शक्यता [/svt-event]
उन्मेष जोशी आणि राजन शिरोडकर यांचीही चौकशी
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे सुपुत्र उन्मेष जोशी, राज ठाकरे आणि त्यांचे निकटवर्तीय राजन शिरोडकर या प्रकरणात ईडीच्या रडारवर आहेत. उन्मेष जोशी यांची सोमवार, मंगळवार, बुधवार असे सलग तीन दिवस ईडी कार्यालयात आठ-आठ तास चौकशी करण्यात आली होती. तर शिरोडकरांचीही जोशींसोबत मंगळवारी आणि बुधवारी असे दोन दिवस सलग आठ तास चौकशी झाली होती.
कोहिनूर स्क्वेअर टॉवर
कोहिनूर सीटीएनलमध्ये आयएल अॅण्ड एफएस ग्रुपचं कर्ज आणि 860 कोटींच्या गुंतवणुकीचा ईडी तपास करत आहे. ही कंपनी मुंबईत कोहिनूर स्क्वेअर टॉवर्स उभारत आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा मुलगा उन्मेश जोशी यांनी ही कंपनी सुरु केली होती. कोहिनूर मिल क्रमांक 3 विकत घेण्यामध्ये राज ठाकरे यांची भूमिका होती, यासाठीच ते ईडीच्या रडारवर होते.
काय आहे नेमकं प्रकरण?
कोहिनूर सीटीएनएल (Kohinoor CTNL) ही उन्मेष जोशी (Unmesh Joshi) यांच्या मालकीची कंपनी आहे. उन्मेष जोशी, राज ठाकरे आणि त्यांचे निकटवर्तीय राजन शिरोडकर हे 2008 पर्यंत ‘कोहिनूर CTNL’ कंपनीचे शेअर होल्डर (भागीदार) होते. त्यांनी कोहिनूर मिल नंबर 3 ही जागा 2003 मध्ये लिलाव पद्धतीने 421 कोटींना खरेदी केली होती.
या जमिनीवर ‘कोहिनूर स्क्वेअर’ ही बहुमजली इमारत उभारण्यात येत आहे. या कंपनीत सरकारी क्षेत्रातील कंपनी इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियर सर्व्हिसेसद्वारे (आयएल अँड एफएस – IL&FS) 225 कोटी रुपयांची गुंतवणूक केली.
मात्र 2008 मध्ये IL&FS ने मोठं नुकसान सहन करत आपले 225 कोटी रुपयांचे सर्व शेअर्स केवळ 90 कोटींना कोहिनूर CTNL ला देऊन टाकले. त्याचवेळी राज ठाकरेंनीही आपले सर्व शेअर कंपनीला विकले आणि ते कंपनीतून बाहेर पडले.
आपले शेअर्स दिल्यानंतरही IL&FS या सरकारी कंपनीने उन्मेष जोशींच्या कोहिनूर सीटीएनएल कंपनीला अडव्हान्स लोन अर्थात आगाऊ कर्ज दिलं. ते कर्जही कोहिनूर सीटीएनएल कंपनी भागवू शकली नाही.
वर्ष 2011 मध्ये कोहिनूर सीटीएनएलने आपली काही मालमत्ता विकून 500 कोटी रुपयांचं कर्ज भागवण्यासाठी IL&FS सोबतच्या करारावर सह्या केल्या. या करारानंतरही IL&FS या कंपनीने पुन्हा कोहिनूर सीटीएनएल कंपनीला आणखी 135 कोटी रुपयांचं कर्ज दिलं.