नगरच्या 61 गावात लॉकडाऊन, पुणे, नाशिकचं काय होणार? अजित पवारांनी धोका सांगितला

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे सातारा (Satara) दौऱ्यावर असताना आज सकाळी 7.30 वा त्यांनी सातारा येथील शासकीय विश्रामगृहात जिल्ह्याचा आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

नगरच्या 61 गावात लॉकडाऊन, पुणे, नाशिकचं काय होणार? अजित पवारांनी धोका सांगितला
अजित पवार, उपमुख्यमंत्री
Follow us
| Updated on: Oct 04, 2021 | 12:32 PM

सातारा : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे सातारा (Satara) दौऱ्यावर असताना आज सकाळी 7.30 वा त्यांनी सातारा येथील शासकीय विश्रामगृहात जिल्ह्याचा आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

मराठवाडा भागात आद्याप मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पाहणी करायला गेले नाहीत, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्याला अजित पवारांनी उत्तर दिलं. “पाहणी केली म्हणजेच सर्व कळते असे नाही, प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री त्या ठिकाणी गेले आहेत, आजही ते गेले आहेत, मंत्रालयात बसून व्हीसी घेऊन सर्वांशी संपर्क सुरु आहे. शेतक-यांना काय मदत पाहिजेत, त्याचे निर्णय होत आहेत. जयंत पाटील, शंकरराव गडाख, राजेश टोपे, अमित देशमुख, अशोक चव्हाण, धनंजय मुंडे, वर्षा गायकवाड हे सर्व गेले आहे, असं अजित पवारांनी सांगितलं.

आम्ही गेल्यावर प्रोटोकॉलप्रमाणे सर्व शासकिय यंत्रणा आमच्या मागे येते, आख्खा दिवस काम बुडते, तुम्ही गैरसमज पसरवू नका, जिथे पाहणी केली पाहिजेत तेथे केली जाते, असंही अजित पवारांनी दरडावलं.

आजपासून राज्यात शाळा सुरू होत आहेत परंतु अद्याप 18 वर्षाच्या आतील मुलांचे लसीकरण झाले नाही या बाबत अजित पवार यांना विचारले असता, 12 ते 18 वर्षाच्या मुलांचं लसीकरण करावं अशी चर्चा आहे. मात्र अद्याप केंद्राकडून कोणताही निर्णय झालेला नाही. केंद्राचा निर्णय झाल्यावर लसीकरण सुरू करणार आहे” असं अजित पवार यांनी सांगितले. परंतु मुलांना शाळेत पाठवायचे की नाही हा सर्वस्वी निर्णय पालकांचा असून, अद्याप मुलांना शाळेत पाठवण्याची पालकांची मानसिकता दिसत नाही, मुलांना शाळेत पाठवायचे की नाही हा सर्वस्वी अधिकार पालकांचा आहे, असंही त्यांनी नमूद केलं.

अन्यथा पुणे-नाशिकला फटका

नगर जिल्ह्यातील 61 गावांमध्ये लॉकडाऊन करण्यात आला आहे. याबाबत अजित पवार म्हणाले , “पारनेर आणि संगमनेर तालुक्यात अशाप्रकारे परिस्थिती बनायला लागली आहे. पुणे आणि नाशिक जिल्हा या दोन तालुक्यांना लागून आहे. त्यामुळे ही रुग्णसंख्या रोखली पाहिजे, अन्यथा याचा फटका पुणे आणि नाशिकला बसू शकतो”

राजू शेट्टींना उत्तर

FRP बाबत राजू शेट्टी यांनी दिलेल्या इशाऱ्यावर बोलत असताना अजित पवार यांनी सांगितले की, मागच्या वर्षीची रिकव्हरी पाहून हा निर्णय घेतला जातो. तसेच राजू शेट्टी त्यांच्या पद्धतीने त्यांची भूमिका मांडत आहेत. त्या संदर्भात चर्चा करून पुढचा निर्णय घेतला जाईल, असं अजित पवार म्हणाले.

अजित पवार यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे

सातारा जिल्ह्यातील सर्व नुकसानाची माहिती घेतली, सर्व पैसे आले आहेत. पिकांचे पैसे आद्याप आलेले नाहीत. उद्या मुंबईत सर्वांची बैठक घेऊन पैसे कसे देता येतील याची मीटिंग घेऊ

– नव्याने सातारा सिव्हील हॉस्पिटल करण्याकरिता जागा नाही, एक एकर नवीन जागा देण्याबाबत सातारा जिल्हाधिकारी यांना सांगितले आहे.

-शाळा सुरु झाल्या लसीकरणाचे काय- मुलांना लसीकरण करण्याबाबत देश पातळीवर आद्याप आदेश नाहीत. नवीन वॅक्सीन असेल ते योग्य आयोग्य याचे रिसर्च होईल मंग ठरेल, केंद्राचे आदेश आले की लसीकरण केले जाईल

-शाळा सुरु झाल्या मात्र आजही पालकांची मानसिकता दिसत नाही मुलांना शाळेत पाठवण्याची. पालकांनी मुलांना शाळेत पाठवावे, दिवाळी संपल्यांनतर मुलांना शाळेत पाठवावे तोपर्यंत आंदाज येईल. असा विचार करणारा एक वर्ग आहे. मुलांना शाळेत पाठवायचे की नाही हा सर्वस्वी अधिकार पालकांचा आहे.

-पुनर्वसन कसे केले जाणार आहे- माती एवढी आली की गावही म्हणत आहेत इथे पुनर्वसन करु नका, पाच लाख कबुल केले होते, ते दिले आहेत, केंद्र सरकारने मदत जाहिर केली होती मात्र आद्याप आलेली नाही. पाटण तालुक्यात आज पाहणी करायला केंद्रातील लोक आले आहेत.

-पुनर्वसनाचा आराखडा चांगला केला आहे. जागा खरेदी करावी लागणार आहे, निधी आलेला नाही. तो निधी देण्याचा प्रयत्न केला जाईल

-अहमदनगर येथे 61 गावात लॉकडाऊन तिसरी लाट ??? – कंट्रोलमध्ये आले नाही तर फटका बसू शकतो, म्हणून आम्ही गांभीर्याने घेतले, म्हणून गाव बंदी केली, बाहेर ही जायचे नाही आणि आतही जातही जायचे नाही, म्हणून ही खबरदारी म्हणून राज्य सरकारने घेतली,

-नेत्यांना दिवाळी गोड करू देणार नाही असे राजू शेट्टी म्हणालेत – मागच्या वर्षीची रिकवरी काय आहे हे पाहून आपण एफआरपी देतो, एक टक्का साखर वाढली तर 10 कीलोनी टनामागे 300 रुपयांचा फरक पडतो, असे वाटते, गुजरात मध्ये तीन टप्यात पैसे दिले जातात, त्यामुळे गुजरात राज्यातील शेतक-यांना 500 ते 600 रुपये टनाला जास्त भाव मिळतो, पोत तयार झाले की 1 रुपये वॅज सुरु होते, हे वॅज शेतक-यांच्याच पैशा -15 तारखेला कारखाने सुरु होतायत, दहा कोटी रुपयांची साखर पडून आहे, म्हणजे दररोज रोज दहा लाख रुपये वॅज सुरु आहोते, याचा बुलदंड पडतो, आर्थीक प्रश्न आहेत, चर्चा सुरु आहेत, शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे त्याचंया पध्दतीने सागंतायत त्या बाबत चर्चा करुन निर्णय घेता येईल

संबंधित बातम्या 

कोरोना गेला म्हणता म्हणता नगरमध्ये धोक्याची घंटा, 61 गावांमध्ये लॉकडाऊन

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.