भाजपची आज पहिली यादी, महाराष्ट्रातील 7 नावं?

नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी आपल्या उमेदवाराची पहिली यादी आज जाहीर करण्याची शक्यता आहे. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी, सदानंद गौडा यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीबाबत भाजपच्या संसदीय समितीची आज बैठक होत आहे. या बैठकीनंतर आज संध्याकाळपर्यंत भाजप आपल्या 100 उमेदवारांची घोषणा […]

भाजपची आज पहिली यादी, महाराष्ट्रातील 7 नावं?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:17 PM

नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी आपल्या उमेदवाराची पहिली यादी आज जाहीर करण्याची शक्यता आहे. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी, सदानंद गौडा यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीबाबत भाजपच्या संसदीय समितीची आज बैठक होत आहे. या बैठकीनंतर आज संध्याकाळपर्यंत भाजप आपल्या 100 उमेदवारांची घोषणा करु शकतं. यामध्ये आंध्र प्रदेश, कर्नाटकसह उत्तर प्रदेशातील महत्त्वाच्या जागांचा समावेश असेल.

महाराष्ट्रातील 7 नावे

भाजपच्या पहिल्या यादीत महाराष्ट्रातील 7 नावांचा समावेश जवळपास निश्चित मानला जात आहे. यामध्ये नागपूरमधून नितीन गडकरी , चंद्रपूर – हंसराज अहिर, गडचिरोली-चिमूर – अशोक नेते, भंडारा – गोंदिया – परिणय फुके किंवा रचना गहाणे,  वर्धा – रामदास तडस, जालना – रावसाहेब दानवे, बीड – प्रीतम मुंडे यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.

वारासणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: निवडणूक लढण्याची औपचारिक घोषणा करु शकतात. सूत्रांच्या मते, पहिल्या यादीत पहिल्या टप्प्यातील उमेदवारांच्या नावांची घोषणा होऊ शकते. 11 एप्रिलला 91 जागांवर मतदान होणार आहे.

राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर, पार्थ पवार, अमोल कोल्हेंना उमेदवारी

काँग्रेसची तिसरी यादी दुसरीकडे काँग्रेसने आपली तिसरी उमेदवार यादी जाहीर केली. तेलंगणातून आठ, आसाममधून पाच, मेघालयातून दोन, उत्तर प्रदेश सिक्किम आणि नागालँडमधून प्रत्येकी एक-एक उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आलं. मेघालयचे माजी मुख्यमंत्री मुकूल संगमा यांना तूरा लोकसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आलं आहे.

त्याआधी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी 21 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये महाराष्ट्रातील पाच उमेदवारांचा समावेश आहे. नागपुरातून नाना पटोले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यासोबतच गडचिरोली, मुंबई उत्तर मध्य, दक्षिण मुंबई आणि सोलापूर या मतदारसंघांसाठीही उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.

निवडणुकीच्या तारखा जाहीर

केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी 10 मार्चला लोकसभा निवडणूक 2019 च्या तारखा जाहीर केल्या. लोकसभेच्या 543 जागांसाठी 7 टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. 11, 18, 23, 29 एप्रिल, तर 6, 12 आणि 19 मे रोजी अशा सात टप्प्यात मतदान होईल. देशभरातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी याबाबतची घोषणा केली.

लोकसभा निवडणूक : तुमच्यासाठी 5 अत्यंत महत्त्वाच्या बातम्या

महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात 11 एप्रिल 2019 रोजी पहिलं मतदान होईल. महाराष्ट्रातील 48 जागांसाठी चार टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला 7 जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला 10 जागांसाठी, तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला 14 जागांसाठी आणि चौथा टप्प्यात 29 एप्रिलला 17 जागांसाठी मतदान होणार आहे.

संबंधित बातम्या 

वंचित बहुजन आघाडीची 37 उमेदवारांची पहिली यादी जाहीर 

 गडकरींविरुद्ध नाना पटोलेच लढणार, काँग्रेसकडून 21 उमेदवारांची यादी जाहीर   

राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर, पार्थ पवार, अमोल कोल्हेंना उमेदवारी

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.