आधी लग्न लोकशाहीचं…मुंडावळ्या बांधून नवरी मतदानाला!

वाशिम: अकोला लोकसभा मतदारसंघातील शिरपूर येथील रश्मी देशमुख यांचं आज लग्न आहे. मात्र आज मतदान असल्याने आधी मतदान आणि नंतर लग्न असा निर्णय घेऊन, रश्मी देशमुख यांनी स्थानिक कोंडबा तात्या ढवळे विद्यालय शिरपूर येथे आपला मतदानाचा हक्क बजावला. देशाला सक्षम करण्यासाठी प्रत्येकाने आपलं अमूल्य मतदान करावं, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. मतदान हे करायलाच हवं. […]

आधी लग्न लोकशाहीचं...मुंडावळ्या बांधून नवरी मतदानाला!
Follow us
| Updated on: Dec 07, 2020 | 11:41 AM

वाशिम: अकोला लोकसभा मतदारसंघातील शिरपूर येथील रश्मी देशमुख यांचं आज लग्न आहे. मात्र आज मतदान असल्याने आधी मतदान आणि नंतर लग्न असा निर्णय घेऊन, रश्मी देशमुख यांनी स्थानिक कोंडबा तात्या ढवळे विद्यालय शिरपूर येथे आपला मतदानाचा हक्क बजावला.

देशाला सक्षम करण्यासाठी प्रत्येकाने आपलं अमूल्य मतदान करावं, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. मतदान हे करायलाच हवं. तो आपला हक्क आहे. कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, असंही त्या म्हणाल्या.

अकोला लोकसभेसाठी वाशिम जिल्ह्यातील रिसोड विधानसभा क्षेत्रात 3 लाख 4 हजार 127 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

दुसऱ्या टप्प्यातील होणाऱ्या अकोला लोकसभेसाठी वाशिम जिल्ह्याच्या रिसोड विधानसभा क्षेत्राचा समावेश आहे. विधानसभा क्षेत्रातील रिसोड आणि मालेगांव तालुक्यामध्ये 222 गावांमधील 334 केंद्रांवर मतदान पार पडत आहे. यामध्ये 2 सखी केंद्र राहणार असून 3 लाख 4 हजार 127 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये 2 हजार 170 दिव्यांग मतदारांचा समावेश आहे.

अकोला लोकसभा मतदार संघात भाजपचे विद्यमान खासदार संजय धोत्रे विरुद्ध वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यात लढत होत आहे. याशिवाय काँग्रेसकडून हिदायत पटेल हे रिंगणात आहेत.

अकोला लोकसभा मतदार संघात एकूण सहा विधानसभा मतदार संघ येतात. यातील मूर्तिजापुर हा विधानसभा मतदारसंघ अनुसूचीत जातीसाठी राखीव आहे. अकोला हा प्रकाश आंबेडकर यांचा बालेकिल्ला. जिल्हा परिषदांपासून महानगरपालिकेपर्यंत इथे प्रकाश आंबेडकरांच्या भारीप बहुजन महासंघाचीच सत्ता आहे. मात्र 1998 आणि 99 चा अपवाद वगळता लोकसभेला आंबेडकरांना इथून विजय मिळवता आलेला नाही. सलग तीनवेळा इथून भारतीय जनता पक्षाचे खासदार संजय धोत्रे विजयी झाले आहेत.

लोककसभा निवडणुकीसाठी 11 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर, आज अर्थात 18 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यातील पार पडत आहे. महाराष्ट्रातील 10 लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात मतदान होत आहे. दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात 1 कोटी 85 लाख 46 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावतील. या टप्प्यात एकूण 179 उमेदवार असून 20 हजार 716 मतदान केंद्र आहेत, तर त्यापैकी सुमारे 2100 मतदान केंद्रांचे लाईव्ह वेबकास्ट होणार आहे.

संबंधित बातम्या 

प्रकाश आंबेडकर यांची मालमत्ता किती? उत्पन्नाचे साधन काय?   

स्पेशल रिपोर्ट : अकोल्यात संजय धोत्रेंवर प्रकाश आंबेडकर भारी पडणार?  

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.