सुजय विखेंना स्वत:साठीच मतदान करता येणार नाही

अहमदनगर : सध्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. नगरच्या दक्षिण लोकसभा मतदारसंघात युतीचे सुजय विखे पाटील आणि आघाडीचे संग्राम जगताप यांच्यात चुरशीची लढत होणार आहे. नगरमध्ये लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात म्हणजे उद्या 23 एप्रिल मतदान पार पडणार आहे. नगरमध्ये होणाऱ्या या मतदानासाठी सुजय विखेंना मात्र मतदान करता येणार नाही. कारण […]

सुजय विखेंना स्वत:साठीच मतदान करता येणार नाही
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:00 PM

अहमदनगर : सध्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. नगरच्या दक्षिण लोकसभा मतदारसंघात युतीचे सुजय विखे पाटील आणि आघाडीचे संग्राम जगताप यांच्यात चुरशीची लढत होणार आहे. नगरमध्ये लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात म्हणजे उद्या 23 एप्रिल मतदान पार पडणार आहे. नगरमध्ये होणाऱ्या या मतदानासाठी सुजय विखेंना मात्र मतदान करता येणार नाही. कारण सुजय विखेंसह त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचे मतदान दुसऱ्या मतदारसंघात आहे.

अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या नगरच्या दक्षिण लोकसभा मतदारसंघातून भाजच्या तिकिटावर काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र डॉ. सुजय विखे पाटील रिंगणात उतरले आहेत. तर त्यांना आव्हान देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार संग्राम जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यात म्हणजे उद्या 23 एप्रिलला नगरमध्ये मतदान होणार आहे. मात्र सुजय विखे पाटील हे या ठिकाणचे उमेदवार असूनही त्यांना मतदान करता येणार नाही. कारण त्यांचे मतदान शिर्डीमधील राहता या मतदारसंघात आहे. त्यामुळे त्यांना 29 एप्रिलला म्हणजे चौथ्या टप्प्यात मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. सुजय विखे पाटील यांच्यासह त्यांची पत्नी धनश्री विखे पाटील, सुजय विखेंचे वडील आणि विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, तसेच त्यांची आई आणि झेडपी अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील यांना मतदान करता येणार नाही.  यामुळे सुजय विखेंना चार मत गमवावी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. लोकसभा निवडणुकींच्या दोन टप्प्यातील मतदान पार काही दिवसांपूर्वी पार पडले आहे. त्यानंतर उद्या 23 एप्रिलला लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी महाराष्ट्रातील 14 जागांचा समावेश आहे. जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या 14 जांगावर उद्या मतदान पार पडणार आहे. या टप्प्यात 2 कोटी 57 लाख 89 हजार 738 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. या टप्प्याकडे सर्वात तुल्यबळ लढती म्हणून पाहिले जात आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.