Loksabha Election 2024 | मुंबईतील ‘हे’ खासदार साधणार का विजयाची हॅट्ट्रिक? काय आहेत समीकरणे?

ठाकरे गट, शिंदे गट, भाजप आणि कॉंग्रेस यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. शिवसेनेते आता दोन गट पडले आहेत. मुंबईतील काही आमदार, नगरसेवक यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना साथ दिलीय. त्यामुळे ठाकरे पुन्हा मुंबईवर आपला करिष्मा दाखविणार का?

Loksabha Election 2024 | मुंबईतील 'हे' खासदार साधणार का विजयाची हॅट्ट्रिक? काय आहेत समीकरणे?
MUMBAI LOKSABHA NEWImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Feb 29, 2024 | 2:02 PM

महेश पवार, मुंबई | 28 फेब्रुवारी 2024 : मुंबईतील सहा लोकसभा मतदार संघ आहेत. यातील एक मतदारसंघ सोडल्यास अन्य पाच मतदारसंघ असे आहेत की येथील विद्यमान खासदारांना हॅट्ट्रिक साधण्याची संधी आहे. मात्र, या मतदार संघातील मतदार या खासदारांना पुन्हा निवडून देणार की बदल घडविणार याची उत्सुकता आहे. याचे कारण म्हणजे बदललेली राजकीय समीकरणे. हे पाचही मतदार संघ असे आहेत की ज्यामुळे ठाकरे गट, शिंदे गट, भाजप आणि कॉंग्रेस यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. शिवसेनेते आता दोन गट पडले आहेत. मुंबईतील काही आमदार, नगरसेवक यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना साथ दिलीय. त्यामुळे ठाकरे पुन्हा मुंबईवर आपला करिष्मा दाखविणार का याची लिटमस टेस्टही या निवडणुकीच्या निमित्ताने होणार आहे.

बहुचर्चित दक्षिण मुंबई मतदारसंघ

पहिला मतदारसंघ आहे बहुचर्चित दक्षिण मुंबई. ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत हे या मतदार संघातून दोन वेळा निवडून आले आहेत. 2014 च्या आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अरविंद सावंत यांनी काँग्रेसचे मिलिंद मुरली देवरा यांचा पराभव केला होता. देवरा यांना शिंदे गटाकडून राज्यसभेवर पाठविण्यात आल्याने ही जागा आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर लढविण्याची शक्यता आहे.

दक्षिण मुंबईतील सहा विधानसभा मतदारसंघापैकी भाजपकडे 2, शिवसेना ठाकरे गट 2 आणि कॉंग्रेस, शिवसेना शिंदे गट प्रत्येकी 1 असे बलाबल आहे. कॉंग्रेस आमदार अमीन पटेल हे देवरा समर्थक मानले जातात. त्यामुळे दक्षिण लोकसभा मतदारसंघात सध्या तरी भाजपचे पारडे जड दिसत आहे. हॅट्ट्रिकची संधी असणारे अरविंद सावंत या मतदार संघात आपली जादू चालविणार का? हा प्रश्न आहे.

हे ही वाचा | Lok Sabha Election 2024 | ठाकरे, शिंदे की भाजप? मुंबईकर कोणासोबत, काय आहेत राजकीय गणिते?

मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघ

दुसरा मतदार संघ म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत जवळचे सहकारी पण शिंदे गटात गेलेले खासदार गजानन किर्तीकर यांचा मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघ. 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत गजानन किर्तीकर यांनी कॉंग्रेसचे दिग्गज नेते, माजी खासदार अनुक्रमे गुरुदास कामत आणि संजय निरुपम यांचा पराभव केला. गजानन किर्तीकर हे मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटात आहेत.

महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये या मतदार संघावर कॉंग्रेसने आपला दावा सांगितला आहे. तर, गजाजन किर्तीकर यांचा पराभव करण्यासाठी ठाकरे गट उत्सुक आहे. त्यामुळेच या जागेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातील सहा आमदारांपैकी तीन आमदार ठाकरे गटाचे आहेत. तर तीन आमदार भाजपचे आहेत. त्यामुळे येथे काटे की टक्कर असणार आहे.

राहुल शेवाळे यांचा दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ

मुंबई महानगरपालिका स्थायी समितीचे चार वेळा अध्यक्षपद भूषविणारे राहुल शेवाळे यांना शिवसेनेने 2014 मध्ये पहिल्यांदा खासदारकीच्या स्पर्धेत उतरविले. कॉंग्रेसचे दिग्गज नेते एकनाथ गायकवाड यांचा पराभव करून शेवाळे लोकसभेत गेले. शिवसेनेने त्यांच्यावर विश्वास दाखवीत 2019 मध्ये पुन्हा संधी दिली. त्याही वेळेस ते विजयी झाले. मात्र, शेवाळे यांनीही शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शेवाळे यांचा पराभव करण्यासाठी ठाकरे गटाने जोरदार तयारी सुरु केलीय. खुद्द उद्धव ठाकरे या मतदारसंघावर बारीक लक्ष ठेवून आहेत.

दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी (अजितदादा गट) शिंदे गटाचे प्रत्येकी 1, भाजपचे 2 तर कॉंग्रेस आणि ठाकरे गटाचे प्रत्येकी 1 आमदार आहेत. शिंदे गटाकडून राहुल शेवाळे यांचे नाव निश्चित आहे. मात्र, जागावाटपामध्ये या जागेवर कॉंग्रेस आणि ठाकरे गटानेही दावा सांगितल्याने तिढा निर्माण झाला आहे.

हे ही वाचा : प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी ठरणार किंगमेकर? कुणाला धक्का, कुणाला फायदा?

भाजपसाठी सर्वात महत्वाचा मतदारसंघ उत्तर मध्य मुंबई

भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांची कन्या पूनम महाजन या उत्तर मध्य मुंबईच्या विद्यमान खासदार आहेत. हा मतदारसंघ पूर्वी कॉंग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. 2014 पूर्वी ही लोकसभा जागा काँग्रेसकडे होती. पण, 2014 मध्ये मोदी लाटेत पूनम महाजन यांनी कॉंग्रेसच्या प्रिया दत्त यांचा पराभव करून मोठा विजय मिळवला. तर, 2019 मध्येही त्यांनी प्रिया दत्त यांचा पराभव केला.

मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघांतर्गत 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीने पाच जागा जिंकल्या होत्या. मात्र, वांद्रे पूर्वमधून काँग्रेसचे जीशान सिद्दीकी यांनी आता राष्ट्रवादी (अजितदादा) गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला. याचा फायदा आगामी लोकसभा निवडणुकीत पूनम महाजन यांनाच होणार आहे.

भाजपचा बालेकिल्ला उत्तर मुंबई

भाजप नेते राम नाईक यांच्यानंतर गोपाल शेट्टी यांनी भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणार उत्तर मुंबई हा गड नेहमीच आपल्या ताब्यात ठेवण्यात यश मिळविले आहे. अभिनेता गोविंदा यांनी कॉंग्रेसमधून याच मतदार संघातून निवडणूक लढविली होती आणि ते जिंकलेही होते. हीच खेळी कॉंग्रेसने 2019 च्या निवडणुकीत खेळली होती. अभिनेर्त्री उर्मिला मातोंडकर यांना कॉंग्रेसने उमेदवारी दिली होती. मात्र, गोपाल शेट्टी यांनी त्यांचा पराभव केला. या लोकसभा मतदार संघात भाजपचेच प्राबल्य आहे. येथील सहा विधानसभा मतदार संघापैकी तीन आमदार भाजपचे, शिंदे गटाचे दोन तर कॉंग्रेसचा एक आमदार आहे. त्यामुळे गोपाल शेट्टी हे येथून विजयाची हॅट्ट्रिक साधण्यासाठी सज्ज झाले आहेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.