लोकसभेसाठी महाराष्ट्रात तीन टप्प्यात मतदान?
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकांच्या तारखा कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची चिन्हं आहेत. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात मतदानाची शक्यता आहे. महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात तीन टप्प्यात मतदान होण्याची शक्यता आहे. राजधानी दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक होत आहे. या बैठकीनंतर लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने दोन दिवसांपूर्वीच जम्मू काश्मीरमधील आढावा घेतला होता. त्यानंतर निवडणूक आयोग […]
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकांच्या तारखा कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची चिन्हं आहेत. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात मतदानाची शक्यता आहे. महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात तीन टप्प्यात मतदान होण्याची शक्यता आहे. राजधानी दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक होत आहे. या बैठकीनंतर लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे.
निवडणूक आयोगाने दोन दिवसांपूर्वीच जम्मू काश्मीरमधील आढावा घेतला होता. त्यानंतर निवडणूक आयोग तारखा जाहीर करणार असल्याच्या चर्चांना वेग आला. महाराष्ट्रात तर विधानसभा आणि लोकसभा निवडणुका सोबतच होतील अशी चर्चा सुरु होती. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच या सर्व चर्चा फेटाळत विधानसभा आणि लोकसभा निवडणुका सोबत होणार नसल्याचं सांगितलं.
महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड या तिन्ही राज्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्यांच्या दरम्यान संपणार आहे. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीनंतर दोन-तीन महिन्यात या निवडणुका अपेक्षित असतात.
महाराष्ट्र :
महाराष्ट्रात भाजप-शिवसेना आणि इतर मित्रपक्षांचं सरकार आहे. या मध्ये भाजपच्या आमदारांची संख्या जास्त असल्याने, राज्य सरकारमध्ये अर्थात भाजपचं वर्चस्व आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या रुपाने मुख्यमंत्रीही भाजपचाच आहे.
2014 साली महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल कसा होता?
भारतीय जनता पार्टी : 122
शिवसेना : 63
काँग्रेस : 42
राष्ट्रवादी काँग्रेस : 41
बहुजन विकास आघाडी : 3
शेतकरी कामगार पक्ष : 3
ऑल इंडिया मजलिसे-इत्तेहादुल मुस्लिमीन (MIM) : 2
भारिपा बहुजन महासंघ : 1
मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी : 1
महाराष्ट्र नवनिर्माण सेना : 1
राष्ट्रीय समाज पक्ष : 1
समाजवादी पार्टी : 1
अपक्ष : 7
संबंधित बातम्या
विधानसभा आणि लोकसभा एकत्र होणार का? मुख्यमंत्री म्हणतात…
राज्यात 2019 ला सत्ताबदल झाल्यास अशोक चव्हाणच मुख्यमंत्री?
सर्व्हे: युद्ध आणि निवडणुकीचा इतिहास, एअर स्ट्राईकचा फायदा होणार?
राज ठाकरेंची पवारांशी चर्चा, मनसे लोकसभा लढणार नाही- सूत्र
तयारीला लागा, लोकसभेसोबतच महाराष्ट्र विधानसभा निवडणूक : सूत्र