विदर्भातील सात जागांसाठी एकूण 60 ते 62 टक्के मतदानाचा अंदाज

नागपूर : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात नागपूर, रामटेक, वर्धा, चंद्रपूर, भंडारा-गोंदिया तसेच गडचिरोली-चिमूर या लोकसभा मतदारसंघात शांततेत मतदान पार पडलं. सायंकाळी 5 वाजेपर्यंत नागपूर लोकसभा मतदारसंघात 53.13 टक्के, वर्धा लोकसभा मतदारसंघात 55.36 टक्के, चंद्रपूर – 55.97 टक्के, रामटेक – 55.61 टक्के, भंडारा-गोंदिया – 60.05 टक्के तर गडचिरोली-चिमूर मतदार संघात 61 टक्के मतदान झालं. लोकसभेच्या […]

विदर्भातील सात जागांसाठी एकूण 60 ते 62 टक्के मतदानाचा अंदाज
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:02 PM

नागपूर : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात नागपूर, रामटेक, वर्धा, चंद्रपूर, भंडारा-गोंदिया तसेच गडचिरोली-चिमूर या लोकसभा मतदारसंघात शांततेत मतदान पार पडलं. सायंकाळी 5 वाजेपर्यंत नागपूर लोकसभा मतदारसंघात 53.13 टक्के, वर्धा लोकसभा मतदारसंघात 55.36 टक्के, चंद्रपूर – 55.97 टक्के, रामटेक – 55.61 टक्के, भंडारा-गोंदिया – 60.05 टक्के तर गडचिरोली-चिमूर मतदार संघात 61 टक्के मतदान झालं.

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरु असल्यामुळे सकाळी 7 ते 6 वाजेपर्यंत झालेल्या मतदानाच्या अंतिम टक्केवारीची माहिती पोलिंग पार्टीद्वारे संपूर्ण माहिती विधानसभा मतदारसंघनिहाय गोळा करण्यात येत आहे.

मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी

नागपूर : 58 टक्के

रामटेक : 58 ते 60 टक्के

चंद्रपूर : 65 ते 68 टक्के

गडचिरोली-चिमूर : 70 ते 72 टक्के

भंडारा-गोंदिया : 69 ते 71 टक्के

वर्धा : 65 टक्के

यवतमाळ-वाशिम : 60 ते 62 टक्के

LIVE UPDATES :

  • विदर्भातील 5 वाजेपर्यंतचं मतदानवर्धा : 55.36% रामटेक : 51.72% नागपूर : 53.13% भंडारा-गोंदिया : 60.50% गडचिरोली-चिमूर : 61.33% चंद्रपूर : 55.97% यवतमाळ-वाशीम : 53.97% एकूण : 55.78%
  • वर्धा : 43.90%रामटेक : 44.50%नागपूर : 41.25%भंडारा-गोंदिया : 49.05%गडचिरोली चिमूर : 57.00%चंद्रपूर : 46.30%

    यवतमाळ-वाशीम :43.35%

    टोटल : 46.13%

  • रामटेक लोकसभा मतदारसंघात दुपारी एक वाजेपर्यंत 32.16 टक्के मतदान
  • यवतमाळमध्ये ‘चला हवा येऊ द्या’ फेम प्रसिद्ध अभिनेते अंकुर वाढवे यांनी पुसद या मूळ गावी मतदानाचा हक्क बजावला
  • गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात मतदानाची वेळ संपली, संवेदनशील मतदारसंघ असल्याने 7 ते 3 वाजेपर्यंत मतदानाची वेळ, तीन वाजून गेल्याने मतदान प्रक्रिया थांबवली
  • दुपारी एक वाजेपर्यंत किती मतदान?
  • नागपूर लोकसभा मतदारसंघमतदान- 1 वाजेपर्यंतपुरूष- ३,२०,६०७महिला- २,७२,८३७इतर- २एकूण मतदान- ५,९३,४४६टक्केवारीपुरूष- २९.२४ टक्केमहिला- २५.६५ टक्केइतर- २.६० टक्केएकूण- २७.४७ टक्के
  • वर्ध्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 30.22 टक्के मतदान
  • भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत 33.40 % मतदान 
  • ईव्हीएम बिघाडाबाबत 39 तक्रारी

  • आई आणि पत्नीसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरातील धरमपेठ येथील मतदान केंद्रावर पोहोचले
  • सकाळी 11 वाजेपर्यंत कुठे किती मतदान?
  • नागपुरात ज्या ज्या मतदार केंद्रांवर उशिराने मतदान सुरु झालं, त्या त्या मतदान केंद्रांवर मतदानाची वेळ वाढवून द्यावी, काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे यांची मागणी
  • गडचिरोली : ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांनी धानोरा तालुक्यातील चातगाव येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला
  • नागपुरात सकाळी 11 वाजेपर्यंत 20 टक्के मतदान
  • नागपूर : भाजप खासदार डॉ. विकास महात्मे यांनी सायकलवर जाऊन मतदान केलं
  • यवतमाळ–वाशिममध्ये सकाळी 11 वाजेपर्यंतची 12.06 टक्के मतदान
  • यवतमाळचे पालकमंत्री मदन येरावार यांनी सहकुटुंब अणे महिला महाविद्यालयात मतदानाचा हक्क बजावला
  • केंद्रीय मंत्री स्मृती इराणी अमेठीतून उमेदवारी अर्ज भरण्याआधी देवाचरणी लीन
  • महाराष्ट्रात सकाळी 9 वाजेपर्यंत कुठे किती मतदान?
  • चंद्रपुरात सकाळी 9 वाजेपर्यंत 5.35 टक्के मतदान
  • वर्ध्यात सकाळी 9 वाजेपर्यंत 7.32 टक्के मतदान
  • भंडारा-गोंदियात 9 वाजेपर्यंत 9 टक्के मतदान
  • गडचिरोली-चिमूरमध्ये 9 वाजेपर्यंत8 .05 टक्के मतदान
    • नितीन गडकरींनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला

  • यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात सकाळी 9 वाजेपर्यंत 6.31 % मतदान
  • वर्धा – काँग्रेस उमेदवार चारुलता टोकस यांनी मतदानाचा हक्क बजावला
  • भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रात सकाळी 7 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत 9 टक्के मतदान
  • यवतमाळमधील कळंब तालुक्यातील कोठा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मतदान केंद्रावर मशीनमध्ये बिघाड
  • मतदानापूर्वी काँग्रेस उमेदवार नाना पटोले देवाच्या दारी, नागपुरातून पटोलेंचं गडकरींना आव्हान
  • ज्येष्ठ समाजसेवक विकास आमटे मतदानाचा हक्क बजावला
  • यवतमाळमध्ये काँग्रेसचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांनी दारव्हा तालुक्यातील आपल्या मूळगावी हरु येथे मतदान केलं
  • जगातील सर्वात बुटकी महिला ज्योती आमगेने मतदानाचा हक्क बजावला
  • भंडारा शहराजवळील कारधा येथील बूथ क्रमांक 170 येथे बंद पडलेली ईव्हीएम सुरु
  • भाजपचे बंडखोर आणि अपक्ष उमेदवार पी.बी. आडे यांनी मतदानाचा हक्क बजावला
  • गोंदियातल्या रामनगर मतदान केंद्रातील बूथ क्र. 276 वर मतदान सुरु होण्याआधीच व्हीव्हीपॅट मशीनमध्ये बिघाड
  • भंडारा शहराजवळील कारधा येथील बूथ क्रमांक 170 येथील ईव्हीएम बंद
  • भंडारा गोंदियाचे भाजप उमेदवार सुनील मेंढेंकडून बहिरगेश्वर मंदिरात महादेवाचे दर्शन घेऊन मतदान
  • यवतमाळ शहरातील महात्मा फुले नगरपरिषद माध्यमिक विद्यालयातील मतदान केंद्रावर ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड
  • नागपुरात सकाळापासून मतदानाला गर्दी, दुपारच्या उन्हाचा विचार करता सकाळीच मतदान करण्याकडे कल
  • चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात मतदानाला सुरुवात, पहिला मतदार विजय बुक्कावार यांनी मताचा हक्क बजावला
  • रामटेकमध्ये मतदानाला सुरुवात, मतदान केंद्रांवर चोख पोलिस बंदोबस्त
  • सर्व मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावा, मोठ्या संख्येने मतदान करा – पंतप्रधान नरेंद्र मोदी
  • सरसंघचालक मोहन भागवत यांचं नागपुरात मतदान
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि भैय्याजी जोशी नागपुरात मतदान केंद्रावर पोहोचले

महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यात एकूण 116 उमेदवार असून 14 हजार 919 मतदान केंद्र आहेत. तर 1 कोटी 30 लाख 35 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावतील. यंदा पहिल्या टप्प्यातील सुमारे 1400 मतदान केंद्रांचे लाईव्ह वेबकास्ट होणार असून त्यामध्ये संवेदनशील मतदान केंद्रांचादेखील समावेश आहे. राज्यात सर्वाधिक 30 उमेदवार नागपूर मतदार संघात असून सर्वात कमी 5 उमेदवार गडचिरोली-चिमूर मतदार संघात आहे.

वाचा – महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात ‘या’ लक्षवेधी लढती  

वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर आणि यवतमाळ-वाशिम या सात मतदार संघामध्ये मतदान होणार आहे. त्यासाठी 44 हजार ईव्हीएम यंत्र (बॅलेट युनिट आणि सेंट्रल युनिट) आणि 20 हजार व्हीव्हीपॅट यंत्र देण्यात आले आहेत. सुमारे 73 हजार 837 कर्मचारी मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आले आहेत, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली.

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, उन्हापासून बचावासाठी सावलीची व्यवस्था, प्रत्येक विधानसभा मतदान केंद्रात सखी मतदान केंद्र अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

गडचिरोलीत 7 ते 3 पर्यंतच मतदान

गडचिरोली- चिमूर, गोंदिया या लोकसभा मतदार संघातील  दुर्गम भागात असणाऱ्या आमगाव, आरमोरी, गडचिरोली, अहेरी आणि अर्जुनी मोरगाव या विधानसभा मतदार संघात मतदानाची वेळ सकाळी 7 ते दुपारी 3 अशी आहे.

मतदान लाईव्ह

यंदा सुमारे 10 टक्के मतदान केंद्रांवरील मतदान प्रक्रियेचे लाइव्ह वेबकास्ट केले जाणार असून जिल्हा निवडणूक अधिकारी, राज्यस्तरावर मुख्य निवडणूक अधिकारी आणि केंद्रीय निवडणूक अधिकारी हे लाइव्ह वेबकास्ट पाहतील.

पहिल्या टप्प्यात मतदान होणारे मतदार संघ :

  • वर्धा- 2026 मतदान केंद्र (एकूण मतदार 17 लाख 41 हजार).
  • रामटेक – 2364 मतदान केंद्र (एकूण मतदार 19 लाख 21 हजार)
  • नागपूर – 2065 मतदान केंद्र, (एकूण मतदार 21 लाख 60 हजार),
  • भंडार-गोंदिया – 2184 मतदान केंद्र (एकूण मतदार 18 लाख 8 हजार)
  • गडचिरोली-चिमूर – 1881 मतदान केंद्र (एकूण मतदार 15 लाख 80 हजार)
  • चंद्रपूर – 2193 मतदान केंद्र (एकूण मतदार 19 लाख 8 हजार)
  • यवतमाळ-वाशिम – 2206 मतदान केंद्र (एकूण मतदार 19 लाख 14 हजार)

15 पेक्षा जास्त उमेदवार तसेच मतदान यंत्रावरील ‘नोटा’ पर्याय यामुळे अशा मतदान केंद्रांवर 2 बॅलेट युनिट बसविण्यात येतात. त्यासोबत 1 कंट्रोल युनिट असते. पहिल्या टप्प्याकरिता 26 हजार बॅलेट युनिट आणि 18 हजार कंट्रोल युनिट देण्यात आले असून 20 हजार व्हीव्हीपॅट यंत्र उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

मतदान करण्यासाठी मतदाराचे नाव मतदार यादीत असणे गरजेचे आहे. त्याशिवाय मतदान करता येणार नाही. निवडणूक आयोगाच्या ओळखपत्राशिवाय अन्य अकरा प्रकारच्या ओळखपत्रांपैकी कोणतेही एक ओळखपत्र दाखवून मतदान करता येईल.

मतदानासाठी आवश्यक 11 दस्तावेज

मतदानासाठी भारत निवडणूक आयोगाचे ओळखपत्र नसेल आणि मतदार यादीत नाव असेल तर अशा वेळी अन्य अकरा प्रकारे आयोगाने ग्राह्य केलेल्या ओळखपत्रांच्या माध्यमातून मतदारास आपला हक्क बजावता येईल.

मतदान ओळखपत्र नसेल तर हे ओळखपत्र चालेल

  • पासपोर्ट (पारपत्र),
  • वाहन चालक परवाना,
  • छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र (राज्य/केंद्र शासन, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपन्यांचे ओळखपत्र),
  • छायाचित्र असलेले बँकांचे पासबूक,
  • पॅनकार्ड,
  • राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर)
  • अंतर्गत महसूल निर्मिती निर्देशांक (रेव्हेन्यू जनरेशन इंडेक्स) द्वारे दिलेले स्मार्टकार्ड,
  • मनरेगा कार्यपत्रिका,
  • कामगार मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा स्मार्टकार्ड,
  • छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज,
  • खासदार/आमदार/विधानपरिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र
  • आधारकार्ड यांचा समावेश आहे.

संबंधित बातम्या

तुमच्याकडे मतदान ओळखपत्र नाही, मग हे करा…  

मुंबईत सहा जागांसाठी तब्बल 156 उमेदवार रिंगणात   

महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात ‘या’ लक्षवेधी लढती 

'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?.
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ.
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी.